BlogGovernment Scheme

Ladli Behna Yojana :लाडली बहना योजना आता महाराष्ट्रातही ? या योजनेबद्दल जाणून घ्या सविस्तर !!

Ladli Behna Yojana : लाडली बहना ही योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराज चौहान यांनी राज्यातील महिला नागरिकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने लाडली बहना योजना 2023 सुरू केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पात्र महिला लाभार्थ्यांना मासिक 1,000 रुपये, एकूण 12,000 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य मिळेल.

योजनेअंतर्गत एकूण 1 कोटी 25 लाख 33 हजार 145 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 कोटी 25 लाख 5 हजार 947 महिला पात्र ठरल्या.

लाडली बहना योजना 2023 नोंदणी :

मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना 2023 सुरू केली आहे, जी राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू  केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये मिळतील.

Ladli Behna Yojana Details :

योजना सांसद लाडली बहना योजना 2023
प्राधिकरण  मध्य प्रदेश सरकार
कुणी लॉंच केली मुख्यमंत्री श्री शिवराज चौहान
कधी लाँच केले 2023
कुणासाठी लागू महिला
पात्रता सर्व विवाहित महिला ज्यांना नोकरी नाही
वयोमर्यादा 23-60 वर्षे
योजनेचे फायदे 1,000 रुपये प्रति महिना
वार्षिक रक्कम 12,000 रु
एमपी लाडली बहना पोर्टल cmladlibahna.mp.gov.in

 

लाडली बहना योजना पात्रता निकष 2023 :

लाडली बहना योजना 2023 साठी पात्रता निकषांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • राज्यातील महिला लाभार्थी पात्र आहेत.
 • केवळ विवाहित महिला अर्जदारांना नोंदणी करण्याची परवानगी आहे.
 • लाडली बहना योजनेसाठी वयोमर्यादा 23 ते 60 वर्षे आहे.
 • महिला करदाते आणि कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या असलेल्या महिला पात्र नाहीत.
 • कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

PM आवास योजनेच्या खात्यात ₹ 250000 जमा होत आहेत,

80 लाख कुटुंबांच्या यादीत तुमचे नाव तपासा.

लाडली बहना योजना 2023 चे फायदे :

लाडली बहना योजना 2023 अनेक फायदे देते, मध्य प्रदेशात सुरू असलेल्या या योजनेचा लाभ सर्व श्रेणीतील महिलांना दिला जात आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, विधवा यांनाही या योजनेंतर्गत लाभार्थी बनवण्यात आले आहे. काही खालीलप्रमाणे या योजनेचे फायदे आहेत :

 • प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात 1,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य जमा केले जाते.
 • यशस्वी नोंदणीनंतर संबंधित बँक खात्यात 12,000 रुपये वार्षिक रक्कम जमा केली जाते.
 • वृद्ध पेन्शन प्राप्तकर्त्यांसाठी अतिरिक्त 400 रु.

Ladli Behna Yojana आवश्यक कागदपत्रे :

लाडली बहना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खलील कागदपत्रे असणे आवश्यक आहे :

 • आधार कार्ड,
 • फोटो,
 • बँक खात्याचा तपशील,
 • मोबाईल क्रमांक आणि
 • मूळ रहिवासी प्रमाणपत्र
 • तसेच जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी, जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना सुरू केली होती. ज्याचा आतापर्यंत सुमारे 1.25 कोटी महिलांना फायदा झाला आहे.या योजनेमुळे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत आले असे म्हणतात. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार आता महाराष्ट्रात ही योजना राबविणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button