Government Agricultural scheme : 90% अनुदानावर टार्प आणि अवजारे मिळवा; एका क्लिकवर अर्ज करा !
Government Agricultural schemes : जिल्हा परिषदेमार्फत कृषी अवजारांचे वाटप करण्यासाठी नियमितपणे अर्ज मागविण्यात येतात. यामध्ये विविध प्रकारच्या कृषी अवजारांचा समावेश आहे. रोटाव्हेटर्स, चाफ कटर मशीन, ताडपत्री, तीन एचपी आणि पाच एचपी मोटर्स ही उदाहरणे आहेत. ही सर्व अवजारे शेतकरी त्यांच्या शेतात अधिक उत्पादनासाठी वापरतात. शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना असून त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अर्ज प्रक्रियेत योग्य प्रकारे सहभागी होणे आवश्यक आहे.
येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!
अर्ज प्रक्रिया
जि.प. योजनेंतर्गत अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर करावा लागतो. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून करता येते, परंतु या संदर्भात स्थानिक पंचायत समिती कार्यालयात चौकशी करणे अधिक श्रेयस्कर आहे.