Loan Schemes For Farmer : भन्नाट योजना ; शेतकऱ्यांना मिळणार २ कोटींचं कर्ज , ‘असा’ करा अर्ज…!
Loan Schemes For Farmer : सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करत असते. आता सरकारने अशीच एक योजना आणली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन कोटींपर्यंत कर्ज मिळणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट, गोदाम, पॅकेजिंग युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी दिलं (Loan Scheme For Farmers) जातं. या कर्जावरील व्याजात 3 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. या योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते आपण जाणून घेऊ या.
भारतातील कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) कृषी क्षेत्राच्या विकास आणि सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातो. त्याचा मुख्य उद्देश कृषी पायाभूत सुविधांचा (रस्ते, पूल, सिंचन सुविधा, गोदामे ) विकास आणि बांधकामात गुंतवणूक करणं आहे. भारतातील सरकारी आणि खाजगी संस्था कृषी क्षेत्राच्या संरचनात्मक विकासात मदत करण्यासाठी समर्थन देतात.