सरकारी योजना

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेविषयी माहिती

आपल्या देशातील सरकार येथील माता अणि तिच्या बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवित असते. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना Indira Gandhi Matritva Sahyog Yojana ही महाराष्ट्र सरकारने गर्भवती तसेच स्तनदा महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी सुरू केलेली अशीच एक महत्वाची योजना आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. ज्या महिलांच्या घरात कोणी कमावता मोठा व्यक्ती नाहीये किंवा ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे अशा महिलांना गरोदरपणापासुन गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपला रोजगार टिकवून ठेवण्यासाठी आपले उत्पन्न कमी होऊ नये यासाठी नियमितपणे आपले काम करत राहावे लागते. ज्यामुळे गर्भवती महिलेच्या वजनात विशेष वाढ घडुन येत नाही.कारण ह्या महिलांना प्रसुतीनंतर शरीर साथ देत नसताना देखील कामाची सुरुवात करावी लागते. ह्यामुळे गर्भवती महिलेचे शरीर पुन्हा पुर्वावस्थेत यायला अडचण निर्माण होतेच शिवाय त्या गर्भवती महिलेला तिच्या नवजात जन्मलेल्या बालकाचे सुरूवातीच्या सहा महिने इतक्या कालावधी पर्यंत स्तनपान देखील व्यवस्थित करता येत नसते. ह्याच करीता गरोदरपणात गर्भवती महिलांना गरोदरपणात विश्रांती प्राप्त व्हावी तसेच त्यांच्या उत्पन्नात कुठलीही घट होऊ नये तसेच त्यांना गरोदरपणात विश्रांती दरम्यान आपल्या बुडलेल्या वेतनाची मजुरीची नुकसानभरपाई देखील प्राप्त व्हावी.

एल आय सी जीवन तरूण योजनेविषयी माहिती LIC Jeevan Tarun Scheme Information in Marathi

तसेच गर्भवती स्तनदा महिलांच्या तसेच तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तसेच आहाराच्या दर्जात सुधारणा व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ही योजना सुरू केली आहे.

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गर्भवती तसेच स्तनदा महिलांना गर्भावस्थेत तसेच स्तनपान कालावधी मध्ये वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम दिली जाते.

याचसोबत गर्भवती तसेच स्तनदा महिलेला पोषक आहार उपलब्ध करून देऊन गर्भवती स्तनदा महिला तसेच तिच्या बाळाची आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी फक्त गर्भवती तसेच स्तनदा महिलेला योजनेअंतर्गत आपल्या नावाची नोंदणी करावी लागते.

यानंतर गर्भवती तसेच स्तनदा महिलेला राज्य शासनाच्या वतीने दोन हप्त्यांत एकुण सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप –

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गर्भवती तसेच स्तनदा महिलांना एकूण दोन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये इतकी लाभाची रक्कम दिली जाते.

गर्भवती तसेच स्तनदा महिलेला पहिल्या प्रसुतीच्या वेळी तीन हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.

यानंतर गर्भवती महिलेचे बाळ सहा महिन्यांचे पुर्ण झाल्यावर मातेला अजुन तीन हजार रुपये दिले जातात.

अशा प्रकारे एकुण दोन टप्प्यांत इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गर्भवती तसेच स्तनदा महिलांना लाभाची रक्कम दिली जाते.

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील गर्भवती तसेच स्तनदा महिलांना गर्भावस्थेत तसेच स्तनपान कालावधी मध्ये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ह्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गर्भवती तसेच स्तनदा महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती दरम्यान बुडालेल्या मजुरीच्या नुकसानभरपाई करीता रोख रक्कम देणे.

गरोदर महिलांच्या आहाराच्या अणि आरोग्याचा दर्जा सुधारणे.

महिलांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणत त्यांचा आर्थिक विकास करणे.

गरोदरपणात महिलांना आपल्या दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागु नये. तसेच कोणाकडुन उधार उसनवारी करावी लागु नये.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेच्या लाभार्थी कोण आहेत?

ह्या योजनेच्या लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गर्भवती तसेच स्तनदा महिला असणार आहेत.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

योजनेअंतर्गत लाभार्थीं महिलेला दिली जाणारी लाभाची रक्कम थेट लाभार्थींच्या बॅक खात्यात डीबीटी दवारे ट्रान्स्फर केली जाते.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेली अर्जाची प्रक्रिया देखील अत्यंत सहज अणि सोपी आहे.

ज्या गर्भवती महिलांची घरीच प्रसुती झाली आहे अशा महिला देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

राज्यातील गर्भवती महिलांच्या जीवनमानात सुधारणा घडुन येईल.

महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना गरोदरपणात आर्थिक साहाय्य प्राप्त होईल.

राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना गरोदरपणात पोषक अणि सकस आहाराचे सेवन करता येईल.

गर्भावस्थेत महिलांना सकस आहार प्राप्त करण्यासाठी कोणाकडुनही पैसे उसणे घ्यावे लागतात नाही किंवा सकस आहारा घेण्यासाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागणार नाही.

गरीब कुटुंबातील महिलांना आपली मजुरी बुडु नये यासाठी गर्भावस्थेत देखील काम करण्याची गरज पडणार नाही.

सरकारच्या ह्या योजनेमुळे रोजंदारीवर काम करत असलेल्या महिलांचा रोज बुडणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ घेत असलेली महिला महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असावी.

ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील गर्भवती महिलांना दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील गर्भवती महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदार महिला गरोदर असणे बंधनकारक आहे.

अर्जदार महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.कारण लाभाची रक्कम थेट लाभार्थींच्या बॅक खात्यात जमा केली जाते.

सर्व सरकारी सार्वजनिक उपक्रमातील केंद्र सरकार तसेच राज्य सरकारी कर्मचारी यांना सहवेतन मातृत्व रजा दिली जाते

त्यामुळे अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • शपथपत्र
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • बॅक खाते तपशील

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार गर्भवती महिलेला ती ज्या आरोग्य केंद्रात स्वताच्या आरोग्याची तपासणी करत आहे तेथे किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जावे लागेल

अणि तेथील आरोग्य सेविकेकडुन तसेच अधिकारी वर्गाकडून योजनेचा अर्ज घेऊन तो भरून आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेकडे तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारीकडे जमा करावा लागेल.

अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक असणार आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button