सरकारी योजना

Rajarshi Shahu Maharaj Scholarship राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेविषयी माहीती

आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमाती मधील अनेक गरीब कुटुंबांतील मुलांना पैशांच्या अभावामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. आज आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण करता येत नाहीये. यामुळे आपल्या देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य ठरणारया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यांचा सामाजिक विकास घडुन येत नाहीये. देशातील ह्याच गंभीर समस्येला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्या शिष्यवृत्ती Rajarshi Shahu Maharaj Scholarship योजनेचा आरंभ केला आहे.

आजच्या लेखात आपण राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना काय आहे?

What is Rajarshi Shahu Maharaj Scholarship ?

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही योजना सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी योजना आहे.

शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.हया शिष्यवृत्ती योजनेची जुलै २००३ रोजी करण्यात आली होती.

ह्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या असक्षम अनुसुचित जाती अनुसुचित जमाती मधील विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाते.

Indira Gandhi National Widow Pension Yojana इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना विषयी माहिती

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांतील अनुसुचित जाती मधील इयत्ता अकरावी बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ज्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत ७५ टक्के तसेच त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करत उत्तीर्ण झाले आहेत.अणि त्यांनी इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना दरमहिन्याला तीनशे रूपये दिले जातात.

ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दरमहा तीनशे रूपये प्रमाणे एकुण दहा महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाते.हया दहा महिन्यांच्या कालावधीत अकरावी तसेच बारावी मधील विद्यार्थ्यांना एकुण ३ हजार रुपये दिले जातात.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्यांचे दहावीचे मार्कशीट
  • विद्यार्थ्यांने अकरावी इयत्तेत प्रवेश घेतला असल्याचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे नियम तसेच अटी –

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जाती मधील असावा.

दहावी बारावी पर्यंत विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांने शालांत परीक्षेत ७५ टक्के तसेच त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

राजर्षी शाहू महाराज ही शिष्यवृत्ती योजना फक्त अनुसुचित जाती मधील अकरावी तसेच बारावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागु होते.

ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कुठलीही विशिष्ट अट ठेवण्यात आली नाहीये.

राजर्षी शाहू महाराज ही शिष्यवृत्ती योजना अकरावी बारावी इयत्तेत शिकत असलेल्या अनुसुचित जाती मधील मुलामुलींसाठी आहे.

ही शिष्यवृत्ती फक्त शैक्षणिक वर्षाच्या मर्यादेसाठी म्हणजे दहा महिने इतक्या कालावधी करीता मंजूर केली जात असते.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे.

ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या शिष्यवृत्ती तसेच फ्री शीप योजनेव्यतिरिक्त दिली जाईल.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

राजर्षी शाहू महाराज ह्या शिष्यवृत्ती योजनेमुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वताचे शिक्षण पुर्ण करता येणार आहे.

विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडुन येईल.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना पैशांच्या अभावामुळे आपले शिक्षण सोडावे लागणार नाही तसेच आपल्या शिक्षणासाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागणार नाही.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा आॅनलाईन पदधतीने करावा लागतो ज्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयाच्या चकरा देखील माराव्या लागत नाही.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील गुणवंत हुशार तसेच आर्थिकदृष्ट्या असक्षम असलेल्या गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button