ट्रेण्डिंग

Maharastra Earthquake : मराठवाड्यात भूकंप ! भूकंपाचा पहिला थरारक व्हिडीओ समोर ……..!

Maharastra Earthquake : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सध्या समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज 19 सेकंदांचे आहे. या 19 सेकंदांत धरणीकंप कैद झालेला आहे.

लाडकी बहिण योजेनेत पुन्हा 12 फार मोठे बदल ,

तात्काळ करा ऑनलाईन अर्ज ……. !

मराठवाडा आणि विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटेच्या भूकंपामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ताज्या माहितीनुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही महिन्यांपूर्वीही मराठवाड्यातील काही भागात असाच भूकंप झाला होता. यानंतर पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या स्थितीचे वर्णन करणारा व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यातून समोर आला आहे. या व्हिडिओवरून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावला जात आहे.

तुम्हाला फक्त 10 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल,

कसे ते येथे जाणून घ्या …!

Maharastra Earthquake

मराठवाडा बुधवारी 10 जुलै रोजी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर तर विदर्भातील वाशीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रत 4.5 रिश्टर स्केल एवढी होती. बुधवारी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button