ट्रेण्डिंग

Mahatma Phule Jan Arogya yojana : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

Mahatma Phule Jan Arogya yojana : शासनाच्या ह्या योजनेअंतर्गत आता करता येईल देशातील नागरीकांना देशातील कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये मोफत उपचारआपल्या भारत देशातील कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये जाऊन पैसे न भरता देखील आता आपणास मोफत मध्ये स्वतावर उपचार करता येणार आहे.देशातील कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये मोफत उपचार प्राप्त होईल ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना अशक्यच वाटते पण आता ही गोष्ट शक्य होणार आहे.फक्त ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे स्वताचा आरोग्य विमा काढलेला असणे आवश्यक आहे.

कोणत्याही कागदपत्राशिवाय थेट बँक खात्यात

50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ……..!

याबाबतीत एक महत्वाचा निर्णय देखील जनरल इन्शुरन्स काऊंसिलच्या वतीने २४ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आला आहे.जनरल इन्शुरन्स काऊंसिलच्या नुसार ज्या व्यक्तींकडे स्वताचा हेल्थ इन्शुरन्स आहे.ते देशातील कोणत्याही हाॅस्पिटल मध्ये मोफत उपचाराची सुविधा प्राप्त करू शकतात.म्हणजे आता देशातील कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती झाल्यावर तिथे झालेल्या उपचारावर आपणास एक रूपया देखील खर्च करण्याची आवश्यकता असणार नाहीये.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! कृषी पंपांच्या थकीत वीज बिल

माफीचा राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार ?

जनरल इन्शुरन्स काऊंसिल काय आहे?

जनरल इन्शुरन्स काऊंसिल देशातील सर्व सामान्य विमा कंपनींचे प्रतिनिधित्व करते.म्हणजे आज आपल्या भारत देशात जेवढयाही विमा कंपन्या अस्तित्वात आहेत त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे काम जनरल इन्शुरन्स काऊंसिल करते. यात stand alone health insurance, specialized health insurance, reinsurance, foreign reinsurance branches,loyd India इत्यादींचा समावेश आहे. ह्या सर्व कंपन्या insurance regulatory development authority of India अंतर्गत नोंदणीकृत विमा कंपन्या आहेत. जेव्हा आपण एखादा हेल्थ इन्शुरन्स खरेदी करत असतो तेव्हा आपली एक मापक अपेक्षा असते की आपण जो काही मासिक तसेच वार्षिक प्रिमियम भरत आहे. ह्या भरलेल्या प्रिमियमच्या बदल्यात आवश्यकता पडल्यास आपल्याला दवाखान्यात स्वतावर उपचारासाठी पैसे प्राप्त व्हावे.

Guava Leaves benefits |पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे…

हे पैसे प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात पहिला पर्याय आहे reimbursement service अणि दुसरा पर्याय आहे cashless service. प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा काही ठाराविक हाॅस्पिटल सोबत टाय अप झालेला असतो.अणि ह्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीसोबत टाय अप असलेल्या हाॅस्पिटलची यादी प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स धारकाला इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स खरेदी केल्यानंतर दिली जात असते. हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स खरेदी केल्यानंतर आपल्याला दिल्या जाणाऱ्या ह्या हाॅस्पिटलच्या यादीतील ह्या सर्व हाॅस्पिटलला नेटवर्क हाॅस्पिटल असे म्हटले जाते.कारण हे सर्व हाॅस्पिटल हेल्थ इन्शुरन्स कंपनीसोबत जोडलेले असतात. हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला दिल्या जाणाऱ्या हाॅस्पिटलच्या यादीतील कुठल्याही एका हाॅस्पिटल मध्ये जाऊन आपण स्वतावर उपचार केला तर हाॅस्पिटल मध्ये उपचारादरम्यान जे काही बिल होईल ते विमा कंपनीकडून त्या हाॅस्पिटलला दिले जाते.म्हणजे ग्राहकाला आपल्या खिशातुन एक रूपया देखील खर्च करण्याची आवश्यकता नसते.यालाच कॅशलेस सर्विस असे म्हटले जाते.

Pragati Scholarship Scheme प्रगती शिष्यवृत्ती योजनेविषयी माहीती

अणि समजा इन्शुरन्स धारकाने कंपनीकडून देण्यात आलेल्या यादी व्यतीरीक्त इतर कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये स्वतावर उपचार केला तर त्याला त्या नाॅन नेटवर्क हाॅस्पिटल मध्ये स्वताच्या खिशातुन पैसे भरावे लागतात. अणि ह्या दवाखान्यात आलेल्या सर्व उपचाराचे बिल प्राप्त करण्यासाठी विमा धारकाला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन विमा कंपनीकडे पाठवावी लागतात मग विमा कंपनी कडुन ग्राहकाला उपचाराचे पैसे दिले जातात यालाच reimbursement process असे म्हणतात. जीआयसीचे चेअरमन तसेच बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स एमडी तसेच सीईओ तपन सिंगल यांनी याबाबत सांगताना अशी माहिती दिली आहे की हेल्थ इन्शुरन्स खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी फक्त ६३ टक्के हेल्थ इन्शुरन्स धारक कॅशलेस सर्विसचा वापर करत आहेत.

इतर हेल्थ इन्शुरन्स धारक इन्शुरन्स कंपनीच्या नाॅन नेटवर्क हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत त्यामुळे reimbursement process हा पर्याय निवडत आहेत. तसेच २०२१ मधील फोबसच्या एका लेखात असे म्हटले आहे की जवळपास ५१ कोटी भारतीय नागरिकांकडेच हेल्थ इन्शुरन्स आहे. म्हणजे देशातील एकुण लोकसंख्येच्या फक्त ३७ टक्के लोकांकडेच हेल्थ इन्शुरन्स आहे.अदयाप देशातील जवळपास ४० कोटी लोकांना हेल्थ इन्शुरन्स विषयी माहिती देखील नाहीये त्यामुळे ते हेल्थ इन्शुरन्स खरेदी करत नाहीये. याचकरीता जनरल इन्शुरन्स काऊंसिलच्या वतीने कॅशलेस सर्विस सुरू करण्यात आली आहे.यामुळे इन्शुरन्स खरेदी केलेल्या ग्राहकाला इन्शुरन्स कंपनीच्या यादीत नाव नसलेल्या देशातील कुठल्याही नाॅन नेटवर्क हाॅस्पिटल मध्ये देखील मोफत उपचार करता येणार आहे.

याआधी नाॅन नेटवर्क हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत असताना reimbursement करीता इन्शुरन्स खरेदी केलेल्या इन्शुरन्स धारकाला आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करावी लागत होती.ती सबमिट करावी लागत होती

अणि समजा त्यात काही समस्या आली तर ती देखील सोडवावा लागत होती ज्यात इन्शुरन्स धारकाचा खुपच वेळ वाया जात होता.

पण आता cashless facility for every one ही सुविधा सुरू केली आहे.

कॅशलेस सर्विसचे फायदे –

इन्शुरन्स धारक ज्या हाॅस्पिटल मध्ये आपला उपचार करत आहे ते हाॅस्पिटल इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क लिस्ट मधी नसले तरी देखील इन्शुरन्स धारकाला त्या हाॅस्पिटल मध्ये कॅशलेस पद्धतीने उपचाराची सुविधा प्राप्त करता येईल. म्हणजे आता कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी इन्शुरन्स धारकाला पैसे खर्च करावे लागणार नाही. ह्या सुविधेमुळे देशातील नागरिकांचे जीवन सोयीस्कर होणार आहे त्यांना कुठल्याही हाॅस्पिटल मध्ये स्वतावर उपचार करता येईल. ह्या सुविधेमुळे देशातील नागरिक जास्तीत जास्त हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यास प्रोत्साहित होतील. ह्या कॅशलेस सुविधेमुळे इन्शुरन्स कंपनी, हाॅस्पिटल यांना देखील अधिक लाभ प्राप्त होणार आहे.कारण ह्या सुविधेमुळे फसवणुकीच्या प्रकारांना देखील आळा बसेल.

बर्याच वेळा हेल्थ क्लेमचे पैसे प्राप्त करण्यासाठी ग्राहक चुकीच्या गोष्टी करत असतात.जे हाॅस्पिटल इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क मध्ये नाही त्यांच्या सोबत संगणमत करून हे असे प्रकार केले जातात.

पण ह्या सुविधेमुळे इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स धारकाचे उपचाराचे पैसे डायरेक्ट हाॅस्पिटल मध्ये पोहचवतील यामुळे प्रतिपुर्तीची आवश्यकता पडणार नाही.अणि फसवणुकीचे प्रकार देखील होणार नाही.

कॅशलेस सर्विसचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या अटी –

इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस सर्विसचा लाभ घेण्यासाठी इन्शुरन्स धारकापुढे दोन अटी ठेवण्यात आल्या आहेत.

ज्या हाॅस्पिटल मध्ये आपल्याला उपचार घ्यायचा आहे त्याची माहिती इन्शुरन्स धारकाला त्याने इन्शुरन्स काढलेल्या इन्शुरन्स कंपनीस ४८ तास अगोदर द्यावी लागेल.

इन्शुरन्स धारकाला एमरजन्सी मध्ये स्वतावर एखाद्या हाॅस्पिटल मध्ये उपचार करावयाचा आहे अणि अशावेळी त्याला कॅशलेस सर्विस हवी असेल तेव्हा देखील इन्शुरन्स धारकाला आपल्या इन्शुरन्स कंपनीला ४८ तासांच्या आत कळवावे लागेल.

प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या काही अटी शर्ती असतात त्या अटी शर्ती मध्ये बसत असल्यावरच इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला ह्या कॅशलेस सर्विसचा लाभ दिला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button