Farmer Schemes : कमी व्याजदरात कर्ज ; कठीण काळात ठरते संजीवनी, शेतकऱ्यांनो सरकारची ‘ही’ योजना माहिती आहे का ?

Farmer Schemes : किसान क्रेडिट कार्ड योजनेचा (kisan credit card Yojana) लाभ भारतातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या कर्ज योजनेचा उद्देश आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना: सरकारने शेतकरी आणि गरीबांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकरी आणि गरिबांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करते. अशाच प्रकारची योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना असे या योजनेचे नाव आहे. भारतातील कोणत्याही शेतकऱ्याला याचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या कर्ज योजनेचा उद्देश आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे नक्की काय ?
शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी पैशांची गरज असते. शेतकऱ्याला पीक लावण्यासाठी, खते, बियाणे, पाणी आणि त्याची काळजी घेण्यासाठी पैशाची व्यवस्था करावी लागते. अनेक वेळा शेतकरी सावकार आणि बँकांकडून चढ्या व्याजदराने कर्जही घेतात. अशा स्थितीत पिकांची काढणी न झाल्याने किंवा उत्पादन न झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या कर्ज योजनेला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड म्हणतात. या योजनेंतर्गत शेतकरी 4 टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.