Maharashtra Budget : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! कृषी पंपांच्या थकीत वीज बिल माफीचा राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार ?
Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलं आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध योजना जाहीर केल्या आहेत. शेतकरी आणि महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाची घोषणा म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 44 लाखांहून अधिक कृषीपंप शेतकऱ्यांना लाभ होणार आहे
महाराष्ट्र विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 44 लाखांहून अधिक कृषी पंप शेतकऱ्यांना होणार आहे.