Solar Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज ! मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार , अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा……..!
Solar Yojana 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यासाठी सरकारने मागणी केल्यास सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया !
अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी 15000 कोटींचा प्रकल्प
शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्या विलग करण्यासाठी आणि सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेलला सौरऊर्जा पंप देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. मोफत विजेची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देण्यात येणार आहेत.