Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! कृषी पंपांच्या थकीत वीज बिल माफीचा राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार ?
Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलं आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध योजना जाहीर केल्या आहेत. शेतकरी आणि महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाची घोषणा म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 44 लाखांहून अधिक कृषीपंप शेतकऱ्यांना लाभ होणार आहे
महाराष्ट्र विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 44 लाखांहून अधिक कृषी पंप शेतकऱ्यांना होणार आहे.
नमो किसान योजनेच्या बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा,
या यादीतील नाव तपासा, हे देखील 100% पुराव्यासह.
सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे
अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यासाठी सरकारने मागणी केल्यास सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्या विलग करण्यासाठी आणि सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेलला सौरऊर्जा पंप देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. मोफत वीज मागणाऱ्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
एल आयसीच्या ह्या खास योजनेत दरमहा 1800 रूपये गुंतवल्यास
प्राप्त होणार 8 लाखांपर्यंतचे रिटर्न्स
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे Maharashtra Budget 2024
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याचे सांगून राज्यभरात ई-पंचनामा प्रणाली लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरूच राहणार आहे. तर, गावात गोदाम योजना राबविण्यात येत आहे. जुन्या गोदामांचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.