Arogya Yojana : Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana महात्मा फुले जन आरोग्य योजना विषयी माहिती
Arogya Yojana : आज आपल्या महाराष्ट्र राज्यात अशी अनेक गरीब कुटुंब आहेत.ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांना मोठ्या हाॅस्पिटल मध्ये भरती होऊन दर्जेदार उपचाराची सुविधा प्राप्त करता येत नाही.
देशातील हीच परिस्थिती लक्षात घेऊन गरीब कुटुंबांना देखील दर्जेदार उपचाराची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे.
महात्मा ज्योतीराव फुले ह्या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला दीड लाखापर्यंतचे विमा संरक्षण कवच दिले जाते.
ह्या योजनेअंतर्गत गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी पुर्णपणे निशुल्क अणि गुणवत्तापूर्ण सुविधेचा लाभ आपणास दिला जातो.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करा अर्ज
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?
ह्या योजनेचा लाभ पिवळी शिधापत्रिका धारकांना,अंत्योदय अन्न पुर्ण योजना शिधा पत्रिका धारक तसेच एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबाना दिला जाणार आहे.
औरंगाबाद अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपुर विभागातील वर्धा ह्या सर्व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तसेच शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थी, शासकीय आश्रमशाळेतील महिला, शासकीय आश्रमशाळेतील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक देखील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
माहीती तसेच जनसंपर्क कार्यालयाच्या निकषानुसार पत्रकार अणि त्यांचे कुटुंब,कामगार विभागाने निश्चित केलेले इतर बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येते.हया योजनेत महाराष्ट्र राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
Arogya Yojana लाभ घेण्यासाठी अर्जदाराला योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा लागेल.हया अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतील.
● रेशनकार्ड झेरॉक्स
● आधार कार्ड
● वय प्रमाणपत्र
● पासपोर्ट साईज दोन फोटो
● उत्पन्न प्रमाणपत्र
● वैद्यकीय अधिकारीने दिलेले आजाराचे प्रमाणपत्र