सरकारी योजना

अस्मिता योजनेविषयी माहिती Asmita Yojana Information in Marathi

आपल्या देशातील सरकार देशातील स्त्रियांना आत्मनिर्भर तसेच सक्षम बनवण्यासाठी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते यासाठी सरकार नवनवीन उपक्रम, योजना देखील राबवित असते. आज आपण राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या अशाच एका एका कल्याणकारी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव अस्मिता योजना Asmita Yojana असे आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

आजच्या लेखात आपण अस्मिता योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

अस्मिता योजना काय आहे?

What is Asmita Yojana ?

ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. अस्मिता ह्या योजनेअंतर्गत ज्या महिला ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत त्यांना अणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या अकरा ते एकोणावीस ह्या वयोगटातील किशोरवयीन मुलींना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन वितरीत केले जाते.

अस्मिता योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या महिला तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या अकरा ते एकोणावीस ह्या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबद जागृकता तसेच जाणीव निर्माण करणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याचसोबत ग्रामीण भागातील महिला तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन विषयी जागृकता निर्माण करून त्यांना परवडेल अशा कमी माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे हे देखील ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Indira Gandhi National Widow Pension Yojana इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना विषयी माहिती

अस्मिता योजनेच्या लाभार्थी कोण असतील?

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अस्मिता ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या महिला तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या अकरा ते एकोणावीस ह्या वयोगटातील किशोरवयीन मुली ह्या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत.

अस्मिता योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

Asmita Yojana ह्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला तसेच किशोरवयीन मुलींना परवडेल अशा दरात सॅनिटरी नॅपकिन वितरीत केले जातात.

अस्मिता योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला तसेच किशोरवयीन मुलींचा सामाजिक विकास घडुन येईल.

ग्रामीण भागातील स्त्रियांच्या राहणीमानात,जीवनमानात सुधारणा घडुन येईल.

अस्मिता ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला तसेच अकरा ते एकोणावीस ह्या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन

तसेच वैयक्तिक स्वच्छतेबाबद जाणीव जागृती निर्माण होईल.त्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे तसेच महत्त्व समजुन येईल.

योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला तसेच किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील.

अस्मिता योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

अस्मिता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला तसेच मुलींना आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करायचा आहे यामुळे महिला तसेच मुलींना वाहतुकीचा खर्च करून योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची तेथे चकरा मारण्याची आवश्यकता देखील नसेल.

ह्यामुळे महिला तसेच मुलींच्या अमुल्य वेळ तसेच पैशांची बचत देखील होईल.

अस्मिता योजनेमुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा घडुन येईलच शिवाय त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेची जाणीव देखील निर्माण होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या मुलींसाठी ही योजना अनुदान तत्वावर राबवली जात असते म्हणजे त्यांना २४० मिमी इतक्या आकाराचे आठ नॅपकिन्सचे एक पॅकेट फक्त पाच रुपये इतक्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते.

यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या सर्व अकरा ते एकोणावीस वयोगटातील किशोरवयीन मुलींकडे अस्मिताकार्ड असणे आवश्यक आहे.

याचसोबत ग्रामीण भागातील महिलांना २४० मिमी इतक्या आकाराचा सॅनिटरी नॅपकिन २४ रूपयात

अणि २८० मिमी इतक्या आकाराचे सॅनिटरी नॅपकिन २९ रूपयात वितरीत केले जातात.

अस्मिता योजना ग्रामीण भागातील महिला तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी एक वरदान ठरणार आहे.

अस्मिता योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे नियम –

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button