अस्मिता योजनेविषयी माहिती Asmita Yojana Information in Marathi
आपल्या देशातील सरकार देशातील स्त्रियांना आत्मनिर्भर तसेच सक्षम बनवण्यासाठी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते यासाठी सरकार नवनवीन उपक्रम, योजना देखील राबवित असते. आज आपण राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या अशाच एका एका कल्याणकारी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव अस्मिता योजना Asmita Yojana असे आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.
प्रगती शिष्यवृत्ती योजनेविषयी माहीती
अस्मिता योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे नियम – Asmita Yojana
जिल्हा परिषदेच्या शाळेत नाव नोंदविण्यात आलेल्या सर्व मुलींच्या नावाची यादी मुख्याध्यापक यांची सही घेऊन ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्रात शाळेकडून जमा केली जाते. शाळेत जेवढयाही पात्र मुली आहेत त्या सर्व मुलींची नोंद आपले सेवा केंद्राचे केंद्रप्रमुख यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन करावी लागेल.
यासाठी कुठल्याही मुलीकडुन कोणत्याही प्रकारचे शुल्क फी घेतली जात नसते.
कारण प्रत्येक मुलीच्या रेजिस्ट्रेशन करीता पाच रुपये प्रमाणे रेजिस्ट्रेशन फी शासनाच्या वतीने दिली जाते.
यानंतर रेजिस्ट्रेशन करण्यात आलेल्या मुलींचे एक अस्मिता कार्ड तयार करण्यात येते.व उमेद मार्फत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील किशोरवयीन मुलींना हे अस्मिता कार्ड वितरित केले जाते. हे अस्मिता कार्ड प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या अकरा ते एकोणावीस ह्या वयोगटातील किशोरवयीन मुलींना पाच रूपयात २४० मिमी इतक्या आकाराचे सॅनिटरी नॅपकिन खरेदी करता येईल. पाच रूपयात सॅनिटरी नॅपकिन वितरीत करताना सर्व मुलींना आपले अस्मिता कार्ड दाखवावे लागेल कारण ह्या कार्डवर देण्यात आलेला क्युआर कोड आधी स्कॅन केला जातो
त्याशिवाय पाच रुपये इतक्या सवलतीच्या दरात त्यांना स्वयंसहाय्यता गटाकडुन सॅनिटरी नॅपकिन वितरीत केले जाणार नाही.