सरकारी योजना

Pragati Scholarship Scheme प्रगती शिष्यवृत्ती योजनेविषयी माहीती

प्रगती शिष्यवृत्ती योजना Pragati Scholarship Scheme ही शासनाच्या वतीने मुलींसाठी सुरू करण्यात आलेली एक विशेष शिष्यवृत्ती योजना आहे.

ही एआयसीटीईची सर्वात महत्वाची अणि प्रसिद्ध शिष्यवृत्ती योजना आहे.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत डिप्लोमा कोर्स करत असलेल्या ५ हजार मुलींना तसेच डिग्री कोर्स करत असलेल्या ५ हजार मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

अणि समजा डिप्लोमा करत असलेल्या मुलींची संख्या कमी असेल तर ही शिष्यवृत्ती डिग्रीचे शिक्षण घेत असलेल्या मुलींना उपलब्ध करून दिली जाते.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरते?

ज्या मुली डिप्लोमा किंवा डिग्रीचे शिक्षण घेत आहेत अशा मुली प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.

प्रगती शिष्यवृत्ती ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त डिप्लोमा किंवा डिग्रीचे शिक्षण घेत असलेल्या मुली अर्ज करू शकतात.डिप्लोमा तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेली मुलांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येत नाही.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर ही प्रगती शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी लागु होते.ही योजना मुलांना लागु होत नाही.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकते?

ज्या मुली एआयसीटीई मान्यताप्राप्त टेक्निकल काॅलेज तसेच संस्थेमधुन तांत्रिक शिक्षण प्राप्त करत आहे किंवा डिग्रीचे शिक्षण घेत आहेत अशा मुली प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतात.

जनरल,एससी,एसटी, ओबीसी अशा कुठल्याही प्रवर्गातील मुलगी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त मुली अर्ज करू शकतात मुलांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार नाही.

एआयसीटीई मान्यताप्राप्त काॅलेज तसेच एखाद्या संस्थेमधुन ज्या मुली डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स करत आहेत अशा मुली ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

ज्या मुलींनी डिग्रीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात तसेच डिप्लोमाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात लिटरल इंट्री द्वारे प्रवेश घेतला आहे अशा मुली ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असलेल्या मुली ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाचवेळी अर्ज करता येईल.

Aam Aadmi Bima Yojana आम आदमी विमा योजनेविषयी माहिती

प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करत असलेल्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे यापेक्षा अधिक मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असु नये.

ज्या विद्यार्थ्यीनीने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षे गॅप दिला आहे अशा विद्यार्थीनीला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार नाही.

दरवर्षी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी आपणास स्काॅलरशिप रिनिव्ह करावी लागते.

अणि स्काॅलरशिप रिनिव्ह करण्यासाठी पासिंग मार्कशीट आॅनलाईन पोर्टलवर अपलोड करावे लागेल.

तसेच हेड ऑफ काॅलेज कडुन लेटर घेऊन ते देखील इथे अपलोड करावे लागेल.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेमध्ये निवड होण्यासाठी मुलीला दहावी बारावी मध्ये चांगली टक्केवारी असते आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी मुलगी याआधी इतर कुठल्याही सरकारी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावी.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम –

योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनीला ५० हजार रुपये इतकी वार्षिक शिष्यवृत्ती प्राप्त होते.

पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या मुलींना चार वर्षांपर्यंत ही शिष्यवृत्ती घेता येईल अणि दुसरया वर्षात प्रवेश घेत असलेल्या मुलीला तीन वर्षे ही शिष्यवृत्ती घेता येईल.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी निवडप्रक्रिया –

प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी मुलींची निवड मेरीट लिस्टच्या आधारावर केली जाते.म्हणजे दहावी बारावी मधील गुणांच्या आधारावर राज्यानुसार एक मेरीट लिस्ट तयार केली जाते.

अणि त्या मेरीट लिस्टच्या आधारावर निवड करून पात्र मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास नॅशनल स्काॅलरशिप पोर्टलवर जायचे आहे.अणि रेजिस्ट्रेशन वर क्लिक करून फ्रेश रेजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर लाॅग इन करायचे आहे.अणि विचारलेली आवश्यक ती माहिती भरायची आहे अणि त्याला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

यानंतर नॅशनल स्काॅलरशिप पोर्टलवर आपल्याला आपण पात्र असलेल्या स्काॅलरशिपची यादी दाखवली जाईल

ज्या स्काॅलरशिप साठी आपण पात्र आहात त्या कुठल्याही एका शिष्यवृत्तीला निवडुन आपण अर्ज करू शकतात.

ज्या मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार त्यांनाच नॅशनल स्काॅलरशिप पोर्टलवर स्काॅलरशिप सजेस्ट केली जाते.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड योजना २०२४ विषयी माहिती Sovereign gold bond 2024 scheme information in Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button