Welfare Schemes : बांधकाम कामगारांसाठी ही आहे केंद्र सरकारची नवीन योजना , आजच ऑनलाईन अर्ज करा ……..!
Welfare Schemes : शासनाच्या ह्या योजनेतुन ह्या लाभार्थ्यांना दिले जात आहे ३० गृहोपयोगी वस्तुसंच अणि ५ लाख रुपये इतकी रक्कम
राज्य सरकारच्या वतीने फक्त एक रूपया मध्ये ३० गृहोपयोगी वस्तुंचा संच दिला जात आहे.जे लाभार्थीं ह्या ३० गृहोपयोगी वस्तूंच्या संचासाठी आपला अर्ज दाखल करतील त्यांना हे गृहोपयोगी वस्तू संच वाटप केले जाणार आहेत.
येथे आजच ऑनलाईन अर्ज करा ……..!
१ रूपयात ३० गृहोपयोगी वस्तूंचा संच यासाठी छत्रपती संभाजी नगर विभागातील जिल्हे नागपुर विभागातील सर्व जिल्हे यासाठी पात्र देखील ठरले आहेत.
आजच्या लेखात आपण शासनाच्या कोणत्या योजनेतुन ह्या १ रूपयात ३० गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण केले जात आहे? तसेच ह्या वितरण करण्यात आलेल्या वस्तुंच्या संचात कोणकोणत्या वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे ह्या योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा हे देखील आपण जाणून घेणार आहोत.
पंजाब नॅशनल बँक आधार कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंत
वैयक्तिक कर्ज देत आहे, आता ऑनलाइन अर्ज करा ……..!
शासननिर्णय –
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थींकरीता गृहोपयोगी वस्तू संच वितरीत करण्याच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या बँकेत खाती असलेल्या
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार माफ …….!
योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३० गृहोपयोगी वस्तूंचा संच –
शासनाच्या वतीने बांधकाम कामगार योजनेतील पात्र लाभार्थीना १ रूपयात ३० गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटप केले जात आहे.
ह्या योजनेचे नाव आहे गृहोपयोगी वस्तू संच तसेच भांडी संच योजना.
ह्या योजनेअंतर्गत फक्त गृहोपयोगी वस्तूंचा संचच नव्हे तर अडीच हजारांपासून दहा लाख रुपये पर्यंतचा लाभ ह्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिला जात आहे.अनेक लाभार्थीं ह्या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत.
बांधकाम कामगार ह्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ह्या गृहोपयोगी वस्तुंच्या संचात पात्र लाभार्थीना पुढील गृहोपयोगी वस्तू दिल्या जात आहेत.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना विषयी माहिती
- चार ताट
- आठ वाटया
- चार पाण्याचे ग्लास
- पातीले झाकणासोबत
- भात वाटप करण्यासाठी एक मोठा चमचा
- वरण वाटप करण्यासाठी एक मोठा चमचा
- दोन लीटरचा पाण्याचा एक जग
- सात भागचा एक मसाल्याचा डबा
- चौदा इंची सोळा इंची अठरा इंचीचा प्रत्येकी एक डबा झाकणासह
- एक परात
- पाच लीटरचा स्टीलचा प्रेशर कुकर
- स्टीलची एक कढाई
- स्टीलची एक मोठी टाकी झाकण अणि वगराळसह
- इत्यादी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
- शासनाच्या ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास आपल्या मोबाईल कंप्युटर मधील क्रोम ब्राऊझर ओपन करून mahabocw.in असे सर्च करायचे आहे.
- यानंतर आपल्यासमोर ह्या योजनेची वेबसाईट ओपन होईल त्यावर क्लिक करायचे आहे.योजनेचे होम पेज ओपन झाल्यावर इथून आपण योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतो.
- लाभ प्राप्त करण्यासाठी दावा देखील आपणास ह्या पोर्टलच्या माध्यमातुन करता येईल.आपण जी नोंदणी केली आहे ती रिनिव्ह देखील ह्याच पेजवरून आपणास करता येईल.
- तसेच फाॅम अपडेट देखील आपणास ह्याच पेजच्या माध्यमातून करता येईल.अणि ह्याच पेजवरून आपणास आपले प्रोफाईल देखील बघता येईल.
शासनाच्या ह्या योजनेत दिले जाणारे महत्वाचे लाभ –
शासनाच्या ह्या कल्याणकारी योजनेत सामाजिक सुरक्षा म्हणून पहिल्या विवाहासाठी ३० हजार रुपये इतका लाभ आपणास दिला जाईल.
ज्या लाभार्थ्यांनी ह्या योजनेत नोंदणी केली आहे त्यांना मध्यान्ह भोजनची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा,प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा लाभ देखील ह्या योजनेच्या लाभार्थीना दिला जातो.
पुर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजनेचा लाभ देखील ह्या लाभार्थींना दिला जातो.
योजनेअंतर्गत दिले जाणारे शैक्षणिक लाभ –
- ह्या योजनेअंतर्गत फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या फक्त पहिल्या दोन मुलांना लाभ दिला जातो.
- इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति वर्षी अडीच हजार रुपये इतका लाभ दिला जातो.
- इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति वर्षी ५ हजार रुपये इतका लाभ दिला जातो.पण यासाठी ७५ टक्के शाळेत उपस्थिती असणे आवश्यक आहे.
- बांधकाम कामगारांच्या मुलाने इयत्ता दहावी किंवा बारावी मध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले असल्यास त्याला १० हजार रुपये इतका लाभ दिला जातो.
- इयत्ता अकरावी किंवा बारावी मध्ये बांधकाम कामगाराचा मुलगा गेल्यावर प्रति वर्षी १० हजार रुपये इतका लाभ दिला जाईल.
- बांधकाम कामगाराच्या मुलाला पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रति वर्षी २० हजार रुपये इतका लाभ दिला जातो.
- बांधकाम कामगाराचा मुलगा वैद्यकीय पदवी एमबीबीएस एमडी सारखी वैद्यकीय पदवी प्राप्त करत असल्यास त्याला प्रति वर्षी एक लाख रुपये शिक्षणासाठी दिले जातात.
- बांधकाम कामगाराच्या इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असल्यास पहिल्या वर्षासाठी त्याला ६० हजार रुपये दुसरया वर्षासाठी ६० हजार रुपये अणि तिसरया अणि चौथ्या वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपये दिले जातात.
- बांधकाम कामगाराच्या मुलगा एस सीआयटी करत असल्यास त्यासाठी देखील त्याला लाभ दिला जातो.
योजनेअंतर्गत दिले जाणारे इतर महत्वाचे लाभ-
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नीला देखील ह्या योजनेचा लाभ दिला जातो.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीच्या नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये इतका लाभ दिला जातो.सीझर झाले असल्यास त्यासाठी २० हजार रुपये इतका लाभ दिला जातो.
याचसोबत गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी देखील एक लाखापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास एक लाख रुपये मुदत ठेव म्हणून मुलीच्या नावावर जमा केले जातात.
कायमचे किंवा ७५ टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील ह्या योजनेच्या लाभार्थीना दिला जातो.
योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत –
बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तरे देखील दोन लाख रुपये इतकी आर्थिक मदत त्याच्या कुटुंबाला दिली जाते.
अटल कामगार आवास योजनेंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील लाभार्थींना दोन लाख रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास दहा हजार रूपये अंत्यविधीसाठी दिले जातात.यासाठी वय पन्नास ते साठ असणे आवश्यक आहे.
कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा स्त्री कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या विदुर पतीस २४ हजार रुपये पाच वर्षांसाठी प्रती वर्षी दिले जातात.
गृहकर्जावरील सहा लाखापर्यंतची व्याजाची रक्कम दिली जाते किंवा दोन लाख रुपये सबसिडी दिली जाते.सहा लाखापर्यंतचे गृहकर्ज ह्या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे.
योजनेसाठी नोंदणी करायला ठेवण्यात आलेले पात्रतेचे निकष –
अठरा ते साठ ह्या वयोगटातील बांधकाम कामगार ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
मागील बारा महिन्यांत नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार ह्या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
मंडळात योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी फाॅम व्ही भरून खालील दिलेल्या प्रमाणे दस्ताऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य असणार आहे.
वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड
नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा एखाद्या शासकीय कंत्राट दाराकडून आपण प्राप्त करू शकतात.
रहिवासी पुरावा म्हणून रेशनकार्ड किंवा लाईटबील झेरॉक्स
ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड
तीन पासपोर्ट आकाराचे फोटो
योजनेसाठी नोंदणी करण्याची फी –
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नो़ंदणी करायला फक्त एक रूपया इतकी फी भरावी लागते.हया एका रूपयात वरील सर्व लाभ आपण प्राप्त करू शकतो.
योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रीय आहे यांनी आपला विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून द्यायचा आहे.
यानंतर लाभार्थींना गृहोपयोगी वस्तूंचे संच वाटप केले जाणार आहेत.
जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी,सरकारी कामगार अधिकारी योजनेचे समन्वय अधिकारी असतील.
गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटप करताना नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढले जाईल अणि बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेतले जातील.
गृहोपयोगी वस्तू संच वितरणासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधत संच वितरणाचे शिबिर आयोजित केले गेले आहे.
संच वितरीत करण्याची कार्यवाही मंडळाने विहीत केलेल्या कालावधी मध्ये करणे आवश्यक आहे.वस्तु संच पुरवठा करण्याच्या कालावधीत वाढ करण्यासाठी मान्यता द्यायची किंवा नाही हे अधिकार मंडळाकडे राखीव असणार आहेत.
गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटप करण्यासाठी येणारा सर्व खर्च मंडळाकडे जमा असलेल्या निधीतुन केला जात आहे.