सरकारी योजना

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना विषयी माहिती

देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत विम्याचा लाभ पोहोचवण्यासाठी शासनाने एक महत्वाची योजना सुरू केली आहे Pradhan Mantri Suraksha Bima Yojana आपल्या भारत देशातील बहुतेक नागरीक असे आहेत जे गरीबीत आपले जीवन व्यतीत करत आहेत.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आपल्या कौटुंबिक गरजा देखील पुर्ण करता येत नाहीये. आज जीवनात कधी काय घडेल हे आपण कोणीच सांगु शकत नाही त्यामुळे आपण आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेचा विचार करणे तसेच विमा पाॅलिसी खरेदी करणे खुप गरजेचे झाले आहे. पण देशातील बहुसंख्य नागरीकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने तसेच विमा पाॅलिसी काढण्यासाठी भरावा लागत असलेला अवाढव्य प्रिमियम भरणे त्यांना शक्य नसते.

यामुळे देशातील सर्वसामान्य गरीब नागरिकांना आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणासाठी विमा पाॅलिसी खरेदी करता येत नाही. विमा पाॅलिसी खरेदी न केल्याने आज देशातील कित्येक नागरिकांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. अशातच एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला अपघातात त्याला अपंगत्व आले तर त्या सर्वसामान्य गरीब नागरिकाला त्याच्या औषधोपचाराचा खर्च स्वता करावा लागतो.कारण त्यांच्याकडे कुठलेही बिमा संरक्षण नसते.

अनुभव पुरस्कार योजना २०२४ विषयी माहिती Anubhav Puraskar Scheme information in Marathi

एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की देशातील ८० टक्के नागरिक हे विम्याच्या लाभापासून आजही वंचित आहेत फक्त २० टक्के जनतेला विम्याचा लाभ प्राप्त होत आहे. म्हणून देशातील विमा धारकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत विम्याचा लाभ पोहोचवण्यासाठी शासनाने एक महत्वाची योजना सुरू केली आहे जिचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा बिमा आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना काय आहे ?

What is Pradhan Mantri Suraksha Bima Yojana ?

ही योजना आपल्या भारत देशातील गरीब तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थिती असलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.

या योजना आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. हया योजनेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये केली होती.

योजनेअंतर्गत भारत देशातील सर्व गरीब आर्थिकदृष्ट्या असक्षम असलेल्या नागरीकांचा अपघाती विमा उतरविण्यात येत असतो.

जेणेकरून विमा धारकाचा अपघातात मृत्यू झाला किंवा त्याला अपघातात अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य प्रदान करता येईल.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?

योजनेअंतर्गत भारत देशातील प्रत्येक नागरिकाला महिन्याला फक्त एक रूपया इतकी विमा रक्कम भरून दोन लाखापर्यंतचा विमा प्राप्त होतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

देशातील सर्वसामान्य गरीब नागरिकांना एक रूपयात दोन लाखापर्यंतचा विमा उपलब्ध करून देणे जेणेकरून देशातील कुठल्याही विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाला किंवा त्याला अपघाताने अपंगत्व आले तर त्याला दोन लाखापर्यंतची आर्थिक मदत प्राप्त होईल.

हे ह्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

योजनेचे लाभार्थी देशातील सर्व गरीब तसेच सर्वसामान्य नागरीक आहेत.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

बिमा योजनेअंतर्गत देशातील सर्व गरीब तसेच सर्वसामान्य नागरीकांना शासनाकडून १ रूपयात दोन लाखापर्यंतचा सुरक्षा बिमा उपलब्ध करून देण्यात येतो.

योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे –

  • नैसर्गिक आपत्ती किंवा खुनामुळे विमा धारकाचा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये इतकी विम्याची रक्कम त्याच्या नाॅमिनीला दिली जाते.
  • अपघात किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे विमाधारकाला स्थायी अपंगत्व आले म्हणजे अपघातात त्याचे डोळे गेले, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाले, किंवा अपघातात एक डोळा,एक पाय, एक हात कायमस्वरूपी निकामी झाला तर त्याला दोन लाखापर्यंतची रक्कम दिली जाते.
  • विमाधारकाला स्थायी आंशिक अपंगत्व आले म्हणजे त्याच्या एका डोळयाची बरी न होणारी हानी झाली, त्याचा एक हात किंवा एक पाय निकामी झाला तर त्याला एक लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त होते.

पण विमा धारकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात त्याची कुठलीही हानी झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर विम्याचा लाभ दिला जाणार नाही. याचसोबत विमा धारकाला आत्महत्या करत असताना स्थायी आंशिक अपंगत्व आले किंवा स्थायी अपंगत्व आले तर त्याला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी तसेच नियम –

अर्जदार भारतीय नागरिक रहिवासी असावा.

फक्त भारतातील नागरीक ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदाराचे वय १६ ते ७० वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

लाभार्थीचे वय ७० पुर्ण झाल्यानंतर त्याला ह्या योजनेचा लाभ दिला जात नाही.

ज्या व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे त्याच्याकडे स्वताचे आधार कार्ड असायला हवे.तसेच अर्जदाराचे बॅकेत सेविंग खाते असायला हवे.

विमा धारकाला विम्याची रक्कम त्याच्या सेविंग अकाऊंट मधून आॅटो डेबिट करण्यासाठी अर्जासोबत एक संमती पत्र जोडावे लागेल.

अर्जदाराचे बॅक अकाऊंट बंद झाल्यावर त्याला ह्या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही.

विम्याची रक्कम १२ रूपये वर्षातुन एकदा ३१ मे ह्या तारखेला वजा केली जाते.

विमा पाॅलिसी रक्कम बारा रूपये वर्षातुन एकदा नाही भरल्यास आपली पाॅलिसी रिनिव्ह होत नाही.

विमा धारकाच्या सेविंग अकाऊंट मध्ये पुरेशी रक्कम नसेल तर त्याची विमा योजना संपुष्टात येऊ शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • जन्म दाखला
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत नोंदणी कशी करायची?

सर्वप्रथम आपल्याला आपले सेविंग अकाऊंट असलेल्या बॅकेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.

अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन बॅकेत जमा करायचा आहे.

यानंतर आपल्या अर्जाची अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते मग सर्व काही व्यवस्थित असल्यास आपल्या बॅक खात्यातून बारा रुपये इतकी रक्कम वजा करण्यात येते.यानंतर आपली विमा सुरक्षा योजना सुरू होते.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button