ट्रेण्डिंग

खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव

2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 7900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे… फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 15 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय…2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 11 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 55000 हजाराच्या झालाय, एरवी मोदी निवडून येणे आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 60 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते आज तिचं गाडी 1,10,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं… साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 25 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुंग गिळून गपप आहेत, 2013 ला सोयाबीन 6,000 रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन 7000 रुपये क्विंटल आहेत आणि तैल 145 रुपये लिटर काय चालेले आहे देशात त्या तुलनेत शेती मालाच्या भाव का नाही वाढत आहे शेताला लागणार तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहेसर्व ठिक आहे ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढलं आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणा ने दिले तर बरं होईल किमान शेतकरी जगू शकणार नाही तर पेपर वर आणि गूगल वर दाखववे लागेल शेतकरी नावाची एक अश्या पद्धतीचे जमांत भारतात अस्तित्वात होती.आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे… भरमसाट कर गोळा करून महागाई वाढले आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे … परंतु आज ही 60% जनता खेड्यात आहे 60% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याचा शिवाय शक्य नाही… शहरात बिना कामाचे मेट्रो मोनो बुलेट ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्या पेक्षा देण्या पेक्षा खेड्यात चागल्या दर्जा चा शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे – प्रक्रिया उद्योग – निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.खेड्यातील लोक ज्या सहज प्रमाणे आपल्या एकूण उत्पन्न चा भागातून दान धर्म मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात परंतु खेड्यातील लोक ना जिवंत पणी मारून खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म शेजारील देशाच उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे … नक्की आपण आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला काय देणे लागतो आणि देऊ शकतो, आपल्या आजी आजोबा नी जितकी संपत्ती आपल्या देऊन गेले त्या बदल्यात पुध्याच पिढीला उत्तम सदृढ जगण्या योग्य समाज दिला तरी खूप आहे. शेतकऱ्यांना पाणी, वीज,बियाणे, खते माफक आणि मुबलक प्रमाणात दिली तरच खरं शेतकरी सन्मान होणार आहे. आपला…..सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी…..🙏🏻 शेतकऱ्याच्या कुटुंबाची जगताना होळी होऊ नये हिच किमान अपेक्षा….✍️ एक सुज्ञ शेतकरी पुत्र..,!🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button