Bajar BhavBlogMarathi News

Laying of Pipelines Act: शेजारचा शेतकरी पाण्याची पाईपलाईन टाकू देत नसेल तर या ठिकाणी करा अर्ज, त्यानंतर कोणीही तुमची पाईपलाईन अडवणार नाही

Laying of Pipelines Act: शेती हा व्यवसाय भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. शेती करायची असेल तर शेतीला भरपूर पाणी पुरवठा असणे आवश्यक आहे. पाण्याखाली शेती असेल तर शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. शेती हा व्यवसाय जमीन आणि पाणी या दोन्हीवर अवलंबून आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधल्या विहिरीला आणि बोरवेलला पुरेसे पाणी नसते. त्यामुळे असे शेतकरी शेतात जवळील नदी किंवा तलाव यातून पाईपलाईन करून आपल्या शेतात पाणी आणतात.

 

अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करताना अनेक अडचणी येतात. त्यांना दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन आणायचे असते परंतु दुसरे शेतकरी पाईपलाईन आणू देत नाहीत. त्यांना ते शेतकरी विरोध करतात. म्हणून पैसे असूनही शेताला पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतामधून कशाप्रकारे आणायचे हे आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.

शेजारील शेतकरी जर पाईपलाईन टाकू देत नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 च्या कलम 49 नुसार तहसीलदारांना अर्ज करावा. तहसीलदारांना अर्ज केल्यानंतर तहसीलदार जाम शेतकऱ्याच्या शेतामधून जायचे आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस पाठवतो. नोटीस पाठवल्यानंतर तहसीलदार त्या शेतकऱ्यांचे विचार घेतात. शेतकऱ्यांचे विचार घेतल्यानंतर शेतकऱ्यांची काही अडचण नसेल तर त्यांना शेतकऱ्यांच्या शेतातून टाकण्यास परवानगी देतात. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button