Bajar BhavBlogMarathi News

Tur Price Maharashtra 2024:तुरीचे दर मार्च नंतर दहा हजार रुपयांवर जाणार…जाणून घ्या सविस्तर..!

Tur Price Maharashtra 2024  गेले सहा महिने १० हजारांपेक्षा जास्त भावाने विकली गेलेली तूर शेतकऱ्यांचा माल बाजारात यायच्या आधीच भाव कमी झाले. भाव गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी नरमले. आयातही सुरू होईल त्यामुळे तुरीच्या भावावर आणखी दबाव वाढेल, अशी चर्चा आहे. पण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, आयातवाढीवर मर्यादा आहेत आणि मागील हंगामातील शिल्लक साठा मर्यादित आहे. त्यामुळे तुरीच्या भावात मार्चनंतर पुन्हा चांगली वाढ होऊ शकते. बाजारात तूर पुन्हा १० हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचे दर मार्चनंतर दहा हजार रुपयांवर जाणार ? Tur Price Maharashtra 2024

सर्वांत आधी आपण तुरीचा भाव काय आहे आणि भावात किती घट झाली हे पाहावे लागेल. तर तुरीचे भाव नोव्हेंबर महिन्यात सरासरी १० हजारांच्या दरम्यान होते. पण मागील तीन आठवड्यांमध्ये तुरीच्या भावात सतत घट होत गेली. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.
म्हणजेच सरासरी भावात दीड हजारांची घट झाली. काही बाजारात नव्या तुरीला अगदी ७ हजारांपासूनही भाव मिळतोय.
पण सध्या बाजारातील भाव हा ७ हजारांपासून ९ हजारांपर्यंत गुणवत्ता आणि व्हरायटीप्रमाणे आहे.
जी तूर एक महिन्याआधी १२ हजाराने विकली जायची ती तूर आता ९ हजार ५०० रुपयांवर आली.

मग हे भाव का कमी झाले ? Tur Price Maharashtra 2024

त्याचे मुख्य कारण आहे, नव्या मालाची आवक. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक हळूहळू वाढत आहे.
ही आवक आणखी एक महिन्यानंतर जास्त होऊ शकते.
पण नवा माल बाजारात येण्याच्या आधी व्यापारी, स्टॉकिस्ट आपला माल बाहेर काढत आहेत.
तसेच बाजारात आवक वाढेल, शेतकरी पॅनिक सेलिंग करतात यामुळेही भाव कमी होतात.
तसेच आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात सुरू होईल.
नेमकी आपली तूर बाजारात येण्याच्या काळात आयातही सुरू होईल.
तसेच सरकारही बाजारावर लक्ष ठेऊन आहे. या कारणाने भावावर दबाव आला.

भावावर दबाव कधीपर्यंत राहू शकतो?

तुरीची आवक मुख्यतः जानेवारीपासून सुरू होते आणि मार्च महिन्यापर्यंत बाजारात तूर आवकेचा दबाव असतो.
दरवर्षी आपल्याला हा अनुभव येत असतो.
यंदाही याच काळात बाजारातील आवक जास्त राहू शकते, असा अंदाज आहे.
त्यामुळे मार्चपर्यंत तुरीच्या बाजारावर दबाव राहू शकतो. Tur Price Maharashtra 2024 म्हणजेच भावपातळी ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात हरभरा घाटी वरील आळी नियंत्रण कसे करायचे व त्यावरचे

उपाय काय ते जाणून घ्या..

भाव कशामुळे तेजीत राहू शकतात ?

यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. सरकार म्हणते की उत्पादन गेल्यावर्षीच्या पातळीवर राहील. पण शेतकरी आणि उद्योगांच्या मते उत्पादनात मोठी घट आहे.
प्रत्यक्ष उत्पादन गेल्या वर्षीपेक्षाही कमी राहू शकते. दुसरं म्हणजे आयात जास्त वाढणार नाही. Tur Price Maharashtra 2024जागतिक पातळीवर तुरीचे उत्पादन कमी असते.
त्यामुळे भारताला १० लाख टनांपेक्षा जास्त आयात करता येणार नाही, असे आयातदार सांगतात.
तिसरं आणि महत्वाचे म्हणजे मागील हंगामातील तुरीचा शिल्लक स्टॉक नगण्य असेल.
कारण देशात तुरीची टंचाई मागील काही महिन्यांपासून आहे. त्यामुळे नव्या हंगामात तुरीचा मागील स्टॉक नगण्य असेल.
यामुळे सर्व भिस्त नव्या मालावरच राहील.
या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर तुरीच्या भावात तेजी येऊ शकते. शेतकरी यंदा तुरीसाठी १० हजारांचे टार्गेट ठेऊ शकतात, असेही अभ्यासकांनी सांगितले.

यंदा उत्पादन घटले. उत्पादन घटल्यापेक्षा महत्त्वाचे आहे हे आहे की जे काही उत्पादन हाती आले ते किती काळात बाजारात विकले जाते.

त्यामुळे विक्रीचा दबाव राहिला तर बाजारावरही दबाव राहू शकतो.

शंभर टक्के शासकीय अनुदानातून मिळवा मोफत 30 दिवसात निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण..

भाव कधीपासून सुधारू शकतात? देशातील बाजारातील तुरीची आवक

Tur Price Maharashtra 2024 मार्च महिन्यापर्यंत जास्त राहू शकते, असा अंदाज आहे. मार्च महिन्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाईल. आयातहीनंतरच्या काळात मर्यादित होत राहील. बाजारातील आवक कमी झाल्यामुळे दराला आधार मिळू शकतो. मार्चनंतर बाजारात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button