BlogMarathi NewsPM KISAN NEWS

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीच्या अनुषंगाने उसाचा रस व मळीच्या वापराबाबत जारी केलेल्या नव्या नियमावलीचा भंग

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीच्या अनुषंगाने उसाचा रस व मळीच्या वापराबाबत जारी केलेल्या नव्या नियमावलीचा भंग झाल्यास संबंधित साखर कारखाना किंवा आसवनीच्या विरोधात तत्काळ कारवाई करा, असा आदेश केंद्राने दिला आहे.

इथेनॉल निर्मितीच्या Ethanol Production

अनुषंगाने उसाचा रस व मळीच्या वापराबाबत जारी केलेल्या नव्या नियमावलीचा भंग झाल्यास संबंधित साखर कारखाना किंवा आसवनीच्या विरोधात तत्काळ कारवाई करा, असा आदेश केंद्राने दिला आहे.

इथेनॉल निर्मितीच्या आधीच्या नियमावलीत केंद्राने बदल केले आहेत. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या साखर व खाद्यतेल संचालनालयाचे साखर संचालक श्री. संगीत यांनी १५ डिसेंबरला राज्यातील साखर कारखान्यांना एक पत्र पाठवले होते.
त्यानुसार, ‘कोणत्याही साखर कारखान्याने किंवा आसवनीने रेक्टिफाइड स्पिरिट (आरएस) व एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल (इएनए) तयार करण्यासाठी उसाचा रस किंवा बी हेव्ही मळी वापरता कामा नये,’ Ethanol Productionअसे लेखी आदेश बजावण्यात आलेले आहेत. या पत्रानंतर राज्यातील सर्व प्रकल्पांनी आपआपल्या नियोजनात बदल केलेले आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, साखर व खाद्यतेल संचालनालयाचे अवर सचिव अनिल कुमार स्वारनकर यांनी आता थेट राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. ‘‘केंद्राने यापूर्वीच ‘आरएस’ व ‘इएनए’बाबत आदेश दिलेले आहेत.

या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल यासाठी दक्षता घ्यावी. मात्र, आदेशाचा भंग झाल्यास राज्य उत्पादन शुल्क विषयक कायद्यानुसार तुम्ही तत्काळ कारवाई करा,’’ असे अवर सचिवांनी गुरुवारी (ता. २१) उत्पादन शुल्क आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
सरकारने मोठी घोषणा करत उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.Ethanol Production यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. भारतात कमी पावसामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. इथेनॉलचे उत्पादन सुरू राहिल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 2023-24 मध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात 2024-25 ची शेती अजून सुरू झालेली नाही.

Ration Card New Rules | शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी,
गहू-तांदळाच्या ऐवजी या ५ गोष्टी मिळणार!

इथेनॉल तयार करण्यास केंद्राने मान्यता दिली-

Ethanol Production मळीवर आधारित आसवनी प्रकल्पांनी सी हेव्ही मळीपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे केंद्राने आधी स्पष्ट केलेले होते. मात्र, आता उसाचा रस, पाक व बी हेव्ही मळीपासून मर्यादित प्रमाणात इथेनॉल तयार करण्यास केंद्राने मान्यता दिलेली आहे.
केंद्राने सात डिसेंबरला इथेनॉल निर्मितीच्या नियमावलीत बदल केले होते. त्यानुसार उसाचा रस व बी हेव्ही मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठा वर्ष २०२३-२४ मधील स्थितीचा आढावा तेल विपणन कंपन्यांनी घ्यावा.

सरकार ₹50,000 ते ₹10 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, संपूर्ण योजना आणि
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या?

त्यानंतर आधीच्या कोट्याचे फेरवाटप करावे फेरकरारांबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाला कळवावे, असे ठरलेले होते. तेल कंपन्यांकडून फेरकरारानुसार निश्चित होईल इतकेच इथेनॉल (उसाचा रस व बी हेव्ही मळीपासून तयार केलेले) संबंधित कारखाने व आसवनींनी पुरवावे, असेही निश्चित केले गेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button