BlogBusiness

Agri Business : माशांसह बदक पालनाचा व्यवसाय; वर्षाकाठी 5 हजार किलोग्रॅम मासे अन् 20 हजार अंडीच्या उत्पादनातून मालामाल व्हाल..!

agriculture Business : जर तुम्ही शेतीसह काही जोड व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली व्यवसाय आयडिया आहे. मत्स्यपालनासोबतच बदक पालनाचा व्यवसाय तुम्हाला मोठी कमाई करून देईल. अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येईल. तुम्ही नोकरी करत किंवा शेतीसह जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण नवी बिझनेस आयडिया जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय मत्स्यपालनाबरोबरच बदक पालनाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदतही केली जाते. duck farming

हे दोन्ही व्यवसाय (Business) एकमेंकांना पुरक आहेत. तसेच दोन्ही व्यवसाय कमी खर्चात सुरू होणारे व्यवसाय आहेत. या प्रकारच्या व्यवसायामुळे मत्स्यपालनावरील सुमारे ६० टक्के खर्च वाचू शकतो. यासोबतच बदकं (Ducks) तलावातील(Lake) घाण खातात आणि पाणी स्वच्छ करतात. पाण्यात पोहल्याने ते तलावातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढवतात. त्यामुळे माशांची (Fish) वाढ आणि उत्पन्न वाढते. agriculture

E-Car Discount December 2023 : डिसेंबर मध्ये इ-कार वर ४ लाखापर्यंतची सूट, या सूटवर करा आपला फायदा..

माशांसह बदक पालन व्यवसाय कसा सुरू करावा ?

माशांसह बदकांच्या संगोपनासाठी चांगल्या जातीच्या बदकांचे संगोपन करावे. बदक पालनासाठी भारतात असलेल्या बदकांच्या प्रजाती निवडल्या पाहिजेत. यातील काही प्रजातींचे प्रकार खाकी कॅम्पबेल प्रजाती, सिल्हेट मेटे (भारतीय प्रजाती), नागेश्वरी (भारतीय प्रजाती),. आता माशांसाठी तलाव हवा, तर अशा तलावाची निवड जेणेकरून बदकं आणि मासे दोघांना ते उपयोगी राहील. या तलावाची खोली किमान १.५ ते २ मीटर असावी.

तलावामध्ये प्रति हेक्टरी २५० ते ३५० किलो या प्रमाणात चुना वापरावा. तलावाच्या वर कोणत्याही काठावर बदकांसाठी कुंपण वाडा तयार करावा. तलावाला बांबू व लाकडाचे कुंपण करावे. हे तलाव हवेशीर तसेच सुरक्षित असावे. एक हेक्टर क्षेत्रात आपण २५० ते ३०० बदकं पाळू शकतो.

 फक्त ₹10 हजारात घरबसल्या व्यवसाय सुरू करा,

दरमहा 30 हजार

कमवा !

अशाप्रकारे होतो माशांसह बदक पालनाचा फायदा

माशांसह बदक पालनातून वर्षाला ३५०० ते ४००० किलोग्रॅम मासे, १५,००० ते १८,००० अंडी आणि ५०० ​​ते ६०० बदकांचे मांस मिळू शकते. बदकांना दररोज १२० ग्रॅम धान्य देणे गरजेचं असते. परंतु मत्स्यपालनाबरोबर बदक पालन केल्याने तुम्ही ६० ते ७० ग्रॅम धान्य जरी दिले तरी त्यांचा आहार पूर्ण होऊ शकतो.

मत्स्यपालनाबरोबर बदकांचे संगोपन केल्यास तलावात अतिरिक्त खत घालण्याची गरज नसते. बदकं कीटक, वनस्पती, बेडूक इत्यादी खातात, जे माशांसाठी हानिकारक असतात. तलावात बदक पोहत असल्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन पाण्यात मिसळत राहतो. एका हेक्टर तलावात मत्स्यपालनाबरोबर २०० ते ३०० बदकांचं पालन केल्याने त्यांची विष्ठा हे माशांसाठी पुरेसे अन्न असतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button