Property rights फक्त याच मुलींना मिळणार नाही वडिलांच्या संपत्तीत अधिकार
Property rights नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलींचा हक्क असतो का नाही, कोणत्या मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळणार नाही याबद्दल माहिती पाहणार आहोत.
वडिलांकडून मुला-मुलींना मिळालेल्या संपत्तीवर अनेक वाद होत असतात यामुळे वडिलांच्या संपत्तीवर किंवा Property rights वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा हक्क असतो का नसतो यावर सुद्धा अनेक वेळा वाद होताना दिसून येतात. वडिलांच्या संपत्तीवर कोणत्या परिस्थितीमध्ये मुलींचा अधिकार राहत नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला खाली दिलेले आहे.
कोणत्या परिस्थितीमध्ये वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क राहत नाही
यामध्ये आपल्याला अनेक बाबींचा विचार करावा लागेल हा विचार केल्यानंतर जर एखाद्या प्रसंगी Property rights मुलींनी स्वतः तिचा हक्क त्याग केला किंवा मागितला नाही तर तर तिला वडिलांच्या संपत्ती मध्ये हक्क मिळत नाही. पण त्यामध्ये सुद्धा स्वतः वडिलांनी कमवलेली संपत्ती आणि वडिलोपार्जित संपत्ती या दोन्ही पण बाबतीत हा नियम लागू होतो.
आपण आणखी पाहायला गेले तर मुला मुलींच्या वडिलांनी स्वतःच्या मृत्युपत्र तयार करून त्यामध्ये वडिलांची सर्व संपत्ती मुलाच्या नावे केली असेल तर त्यावेळेस सुद्धा मुलीचा हक्क राहत नाही, पण यामध्ये सुद्धा काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात कारण की वडिलोपार्जित संपत्ती असेल तर मुलीला हक्क मिळू शकतो.