BlogMarathi NewsSSC AND HSC EXAM

SSC AND HSC EXAM दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पॅटर्न बदलला; नवीन पॅटर्न असा असणार

SSC AND HSC EXAM विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेले आहे कारण दहावी आणि बारावी परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

 

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी हा नवीन बद्दल करण्यात आला आहे. नवीन पॅटर्न मध्ये कोणकोणते बदल होणार याबद्दल माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

दहावी आणि बारावीला आता सेमिस्टर पॅटर्न लागू होणार आहे हा पॅटर्न 2024-25 किंवा 2025-26 नव्या पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येऊ शकते. या बदलामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताण कमी होणार आहे. नवीन बदलाबद्दल आणखी माहिती पाहिली तर दिवाळीच्या आधी पहिले सत्र असणार आणि दिवाळीनंतर दुसरे सत्र मार्च महिन्यात असणार आणि या दोन्ही सत्रांचे गुण एकत्रित करण्यात येतील नंतर बोर्डाचा निकाल लागेल,

 

पहिले सत्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येतील जर काही विद्यार्थी पहिल्या सत्रामध्ये नापास झाले असतील तर त्यांना पुढील सहा महिन्यातच परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण कमी होणार आहे कारण आता त्यांना दोन सत्रांमध्ये परीक्षा द्याव्या लागतील आणि पहिल्या सत्रामध्ये नापास झाले तरी लगेचच सहा महिन्यानंतर त्यांना परीक्षा देता येणार आहे यामुळे मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल.

 

त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेला आहे

 

येथे क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button