Blog

Side Effects Of Worms:तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन कसे करतात जाणून घ्या

 

Side Effects Of Worms अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, अचुकव्यापा बरोबरच दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरकामुळे तुरीवरील किडींना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तूर पीक फुले आणि शेंगा परिपक्व होणाच्या अवस्थेत आहे.

कळी ते फुलोरा अवस्थेत या पिकात मुख्यतः शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंगमाशीचा प्रादुर्भाव सुरू होतो. सध्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

किडीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

नुकसानीचा प्रकार Side Effects Of Worms

प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलांवर होतो. नंतरच्या अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव शेंगावर होतो. शेंगेमधील दाणे खात असताना अळ्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान होते. एक अळी साधारणतः २० ते २५ शेंगांचे नुकसान करत असल्याचे दिसून आले आहे.

अदानींनाया गावातून एक थेंबही पाणी भेटले नाही काय आहे कारण जाणून घ्या

 

तुरीवरील शेंगमाशी Side Effects Of Worms

या माशीची अळी बारीक पांढऱ्या रंगाची गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात. पूर्ण विकसित अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते, त्यातून प्रौढ माशी बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. कोष तपकिरी रंगाचा असतो.

नुकसानीचा प्रकार कोवळ्या शेंगेच्या आत माशी अंडी

 

अंड्यातून अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या दाण्यांचा पृष्ठभाग कुरतडून खातात.

त्यामुळे दाण्यावर नाग मोडी खाचा तयार होतात व दाण्यांची मुकणी होते.

त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. कीडग्रस्त दाणे खाण्यासाठी अथवा बियाण्यासाठी उपयोगी ठरत नाहीत.

प्रादुर्भावग्रस्त बियाण्यांची लवकर उगवण होत नाही. अशा बियाण्यास बाजारात दरसुद्धा कमी मिळतो.Side Effects Of Worms

उत्पादनात १० ते ४० टक्के घट आढळून येते.

शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात हरभरा घाटी वरील आळी नियंत्रण कसे करायचे व त्यावरचे उपाय
काय ते जाणून घ्या..

 

सर्वेक्षण

 

Side Effects Of Worms पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आठवड्यातून किमान १ वेळा हेक्टरी २० ते २५ झाडांचे निरीक्षण करावे. कारण याच अवस्थेत तूर पिकाचे खरे आर्थिक नुकसान होते. शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या १ फूट उंचीवर लावावेत. सापळ्यामध्ये सतत ३ दिवस जर नर पतंगाची संख्या ८ ते १० इतकी आढळली किंवा १-२ अळी प्रति झाड किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास त्वरित पीक संरक्षणाचे उपाय योजावेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button