शेती उद्योगसरकारी योजना

दिव्यांग शेतकरींसाठी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेविषयी माहिती

आज आपल्या देशात असे खूप व्यक्ती आहेत ज्यांना आपल्या अपंगत्वामुळे आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते. शारीरीक दृष्ट्या अपंग असल्याने अपंग व्यक्तींना नोकरी व्यवसाय तसेच इतर कुठलेही काम करताना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असतात. अशा अपंग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपले देशातील सरकार अपंगांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते.जेणेकरून ह्या अपंगांना त्याचा लाभ प्राप्त करता येईल. आज आपण अपंगांसाठी शासनाने सुरू केलेल्या अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव दिव्यांग शेतकरींसाठी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजना असे आहे.

दिव्यांग शेतकरींसाठी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजना काय आहे?

ही योजना शासनाने महाराष्ट्र राज्यातील अपंग शेतकरींसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर ही योजना वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असते.

योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग अपंग शेतकरी बांधवांना स्वताचा फलोत्पादन व्यवसाय सुरू करता यावा तसेच त्यांच्या फलोत्पादन व्यवसायात वाढ करता यावी म्हणून खुप कमी व्याजदराची आकारणी करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा.

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

फलोत्पादन हा कृषी व्यवसायातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.हयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या,फळ,फुले इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

याचसोबत शेतीमधील,बागेमधील छोट्या छोट्या फळबागांची निगा राखली जाते.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकरींना पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते पण बहुतेक दिव्यांग शेतकरींची घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने तसेच ते दिव्यांग अपंग असल्याने त्यांना हा व्यवसाय सुरू करायला भांडवल गोळा करण्यासाठी अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते.

महाराष्ट्र राज्यातील अशा दिव्यांग शेतकरींना स्वताचा फलोत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी

तसेच त्यात वृदधी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरींना आर्थिक साहाय्य प्रदान करणे हे दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेचे उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग शेतकरी बांधवांना दिला जाईल.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

दिव्यांग शेतकरींसाठी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेअंतर्गत दिव्यांग शेतकरींना स्वताचा फलोत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच त्यात वृदधी करण्यासाठी कमी व्याजदर आकारून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

ह्या योजनेत १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी शेतकरीचा सहभाग पाच टक्के, राज्य महामंडळाचा सहभाग हा पाच टक्के,अणि राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९० टक्के इतका असणार आहे.

यात पाच लाखासाठी पुरूषांसाठी वार्षिक व्याजदर सहा टक्के अणि महिलांसाठी ५ टक्के इतके असणार आहे.

पाच लाखाच्या पुढील कर्जावर सात टक्के इतके व्याज आकारण्यात येईल.

कर्ज परतफेड करण्याचा कालावधी –

कर्ज परतफेड करण्याचा कालावधी यात पाच वर्षे इतका ठेवण्यात आला आहे.अणि मंजुरी अधिकार एन एच एफडीसीकडे असणार आहे.

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरींना आर्थिकदृष्ट्या मजबुत करून त्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करण्यात येणार आहे.

ह्या योजनेमुळे दिव्यांग शेतकरी बांधवांच्या जीवनमानात सुधारणा घडून येईल.

ह्या योजनेमुळे दिव्यांग शेतकरींना शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याची खात्री होईल ज्यामुळे त्यांना आर्थिक पाठिंबा प्राप्त होईल.

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकरी आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी बनतील त्यांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणाकडेही उसने पैसे मागण्याची गरज पडणार नाही.

दिव्यांग शेतकरींसाठी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार शेतकरी अपंग तसेच दिव्यांग असावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील दिव्यांग शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.

अर्जदार व्यक्तीकडे तो दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्जदाराच्या प्रकल्पाची मर्यादा ही किमान १० लाख असणे गरजेचे आहे.

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हाॅर्टिकल्चर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला योजनेच्या अधिकृत कार्यालयात जायचे आहे.

मग कार्यालयात जाऊन योजनेचा अधिकृत फाॅम घेऊन तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तो कार्यालयात जमा करायचा आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button