सरकारी योजना

Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Karjmukti Yojana छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेविषयी माहिती

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच शेतकरींच्या वाढत्या आत्महत्यांना आळा बसविण्यासाठी सरकारने Chhatrapati Shivaji Maharaj शेतकरी सम्मान ही योजना सुरू केली आहे. आपला भारत देश हा संपूर्ण जगभरात एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.कारण येथील बहुतांश नागरिक शेती हाच परंपरागत चालत आलेला एकमेव व्यवसाय करतात. पण आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला,आपल्या देशातील शेतकरी बांधवांना आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने शेतीसाठी लागणारी महत्वाची अवजारे,तसेच सामग्री खते,बी बियाणे, कीटकनाशके इत्यादी खरेदी करण्यासाठी पाहिजे तितके पैसे जवळ नसतात.

त्यातच दिवसेंदिवस शेतीसाठी उपयुक्त साहित्यांची किंमत अधिकच वाढत आहे.हया अवाढव्य किंमतीमध्ये शेतीसाठी उपयुक्त साहित्य सामग्रीची खरेदी करणे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसते. म्हणून हतबल तसेच निरूपाय होऊन शेतकरी शेतीसाठी लागणारी अवजारे, कीटकनाशके खते बियाणे इत्यादी खरेदी करण्यासाठी आपली जमीन घर सावकाराकडे गहाण ठेवत असतो.

अनुभव पुरस्कार योजना २०२४ विषयी माहिती Anubhav Puraskar Scheme information in Marathi

ह्या गहाण ठेवलेल्या जमिनीवर घरावर सावकार काही विशिष्ट टक्के नुसार व्याजाची आकारणी देखील करत असतो.

अशातच अवकाळी पाऊस, दुष्काळ,गारपीट,पुर मोकाट जनावरांमुळे पिकांचे झालेले नुकसान तसेच कमी बाजार भाव इत्यादी कारणांमुळे शेतकरींना शेतीमध्ये मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते.

त्यातच शेतीसाठी जमीन तसेच घर गहाण ठेवून घेतलेले कर्ज देखील आर्थिक तंगीमुळे फेडता न आल्याने निर्धारित वेळेत घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने शेतकरीच्या शेतजमिनीचा तसेच घराचा ताबा सावकार घेत असतो.

एकीकडे झालेले शेतीतील मोठे आर्थिक नुकसान त्यात घर अणि जमिन देखील हातातुन गेल्याने हतबल झालेला गरीब शेतकरी आत्महत्या करतो आत्महत्या करून स्वताची जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करतो.

आज शेतीमध्ये वारंवार होत असलेल्या आर्थिक नुकसानामुळे अनेक शेतकरी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवू लागले आहेत.ज्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.

देशात शेती व्यवसाय बंद झाला तर देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल देशातील नागरिकांना धान्य प्राप्त होणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेलाच शेतकरी सम्मान योजना असे देखील म्हटले गेले आहे.

कारण ह्या योजनेमुळे आपल्या देशातील उन्हातान्हात कष्ट करून धान्य पिकवित असलेल्या बळीराजाचा शेतकरींचा सम्मान केला जाणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj शेतकरी सम्मान योजना काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान ही योजना महाराष्ट्र सरकारने देशातील गरीब कष्टकरी शेतकरी बांधवांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे.

ही योजना महाराष्ट्र सरकारने देशातील गरीब शेतकरी बांधवांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे.

योजनेअंतर्गत शेतकरींना दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थीं शेतकरीच्या बॅक खात्यात थेट जमा केली जाते.

शेतकरी सम्मान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी असणार आहेत.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य प्रदान करत शासनाच्या वतीने आर्थिक पाठबळ प्राप्त करून देणे

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान ह्या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात येईल.

देशात अवकाळी पाऊस,गारपीट,अतिवृष्टी, पुर वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे जर एखाद्या शेतकरीच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले तर ह्या योजनेअंतर्गत त्या शेतकरीला शासनाकडून झालेल्या नुकसानाची नुकसानभरपाई देण्यात येत असते.

ह्या योजनेअंतर्गत शेतकरींनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करू नये यासाठी ह्या योजनेअंतर्गत शेतकरींनी घेतलेले कर्ज देखील शासनाच्या वतीने माफ केले जाते.

शेतकरी सम्मान योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवा.

ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिला जातो.महाराष्ट राज्याच्या बाहेरील शेतकरी तसेच शासकीय कर्मचारी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत कर्ज माफी प्राप्त करण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करावा लागेल.

अर्जदार शेतकरीचे बॅकेत खाते असावे तसेच ते त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj शेतकरी सम्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीची आवश्यक कागदपत्रे जसे की सातबारा आठ अ उतारा
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर

योजनेअंतर्गत कर्ज माफी प्राप्त करण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

अर्जदार शेतकरीला सगळ्यात पहिले शासनाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर व्हिझिट करावे लागेल.

योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर होमपेजवर दिलेल्या नवीन अर्जदार नोंदणी ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी अर्ज उघडेल तो अर्ज अणि त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.

अर्जदार नोंदणी करून झाल्यावर पुन्हा आपला आयडी पासवर्ड प्रविष्ट करून लाॅग इन करून घ्यायचे आहे.

यानंतर योजनेचा अर्ज आपल्यासमोर ओपन होईल तो अर्ज भरायचा आहे.

त्यात विचारलेली सर्व माहिती अचुकपणे भरून झाल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेचे फायदे –

सरकारच्या ह्या कल्याणकारी योजनेमुळे देशातील शेतकरी स्वताच्या पायावर उभे राहुन अधिक आत्मनिर्भर अणि सक्षम बनतील.

देशातील गरीब शेतकरींचा आर्थिक तसेच सामाजिक विकास घडुन येईल.त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडुन येईल.

देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य प्राप्त होईल.

आपल्या अडीअडचणीच्या संकटाच्या काळात आपल्या देशातील सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी आधाराची भावना शेतकरींच्या मनात निर्माण होईल.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत शेतकरींना पिकांचे नुकसान झाल्यावर नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते

याने अधिकाधिक शेतकरी नुकसानाची भीती सोडुन शेती व्यवसायाकडे वळतील तसेच त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देखील प्राप्त होईल.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Karjmukti Yojana ह्या योजनेचा लाभ देशातील सर्व प्रवर्गातील शेतकरींना घेता येतो.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज देखील आॅनलाईन करायचा असतो याने शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या चकरा देखील माराव्या लागत नाही.याने त्यांचा अमुल्य वेळ अणि पैसा दोघे वाचतात.

जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत असतील त्यांना कर्जाच्या २५ टक्के इतकी रक्कम परत करण्यात येते.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button