सरकारी योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेविषयी माहिती

आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वृद्ध लोकांना पाठबळ तसेच आर्थिक मदत प्राप्त व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने नेहमी नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन ही देखील अशीच एक महत्वाची योजना आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजना ही सामाजिक न्याय तसेच विशेष साहाय्य विभागाकडून राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे.

योजनेअंतर्गत लाभार्थीं व्यक्तींना केंद्र सरकारकडुन २०० रूपये प्रति महिना प्रति लाभार्थी इतके निवृत्तीवेतन दिले जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभार्थींना प्राप्त होणारा एकूण लाभ –

योजनेच्या लाभार्थ्यांनाच राज्य सरकारच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून ४०० दरमहिन्याला निवृत्ती वेतन दिले जाते.

त्यामुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार कडुन २०० रूपये प्रति महिना अणि राज्य सरकार कडुन दिले जाणारे ४०० रूपये प्रति महिना असे ऐकून ६०० रूपये लाभार्थींना दरमहिन्याला निवृत्ती वेतन दिले जातात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत?

योजनेचा लाभ ६५ वर्षे पूर्ण झालेल्या निराधार व्यक्तींना तसेच ६५ वर्षे पेक्षा अधिक वय असलेल्या दारिद्रय रेषेखालील निराधार व्यक्तींना दिला जातो.

निवृत्तीवेतन योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

योजने अंतर्गत दरमहिन्याला प्रति लाभार्थी ६०० रूपये इतके निवृत्तीवेतन दिले जात होते.

पण आता ह्या योजनेच्या मानधनात वाढ करण्यात आली असुन दरमहा योजनेच्या लाभार्थ्यांना १५०० रूपये आता देण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री सुर्योदय योजना फ्री सोलर पैनल Pm Suryodaya Scheme Free Solar Panel

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जावे लागेल.

मग तिथे गेल्यावर आपल्याला योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज फाॅम घेऊन तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.अणि त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयापैकी ज्या कुठल्याही कार्यालयातून आपण योजनेचा अर्ज घेतला आहे तिथे तो जमा करायचा आहे.

अर्ज मंजूर झाल्यावर प्राप्त होणारी लाभाची रक्कम –

आपला अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दरमहिन्याला १५०० रुपये इतके निवृत्तीवेतन शासनाकडून प्राप्त होते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –

  • विहित नमुन्यातील भरलेला योजनेचा अर्ज
  • अर्जदाराचा वयाचा दाखला
  • अर्जदाराचा दारिद्य्र रेषेखालील दाखला

लाभ घेण्यासाठी नियम तसेच पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ६५ वर्षे पूर्ण झालेले तसेच ६५ वर्षांवरील अर्जदार पात्र ठरतील

म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय ६५ असणे आवश्यक आहे)

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे नाव शहरी किंवा ग्रामीण भागातील दारिद्य्र रेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार किमान पंधरा वर्ष इतक्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवा.

निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पुढील महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बीपीएल रेशनकार्ड
  • अर्जदाराचे मतदान ओळखपत्र
  • अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे बॅक खाते पासबुक झेराॅक्स
  • अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत?

ह्या योजनेमुळे ६५ वर्षांवरील प्रत्येक घराघरातील निराधार वृद्ध आजी आजोबांना शासनाकडून दरमहा पेंशन प्राप्त होते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधालपकाळ निवृत्तीवेतन योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आजी आजोबांना वृदध व्यक्तींना पेंशन देऊन त्यांच्या जीवनात आर्थिक हातभार लावणे.त्यांना आर्थिक साहाय्य प्रदान करणे.

ज्या वृद्ध आजी आजोबांना म्हतारपणात काम करता येत नाही कामाला जाऊन पैसे कमवता येत नाही त्यांना देखील वृदधालपकाळात आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button