ट्रेण्डिंग

Arogya Yojana : Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana महात्मा फुले जन आरोग्य योजना विषयी माहिती

Arogya Yojana : आज आपल्या महाराष्ट्र राज्यात अशी अनेक गरीब कुटुंब आहेत.ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांना मोठ्या हाॅस्पिटल मध्ये भरती होऊन दर्जेदार उपचाराची सुविधा प्राप्त करता येत नाही.

देशातील हीच परिस्थिती लक्षात घेऊन गरीब कुटुंबांना देखील दर्जेदार उपचाराची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले ह्या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला दीड लाखापर्यंतचे विमा संरक्षण कवच दिले जाते.

ह्या योजनेअंतर्गत गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी पुर्णपणे निशुल्क अणि गुणवत्तापूर्ण सुविधेचा लाभ आपणास दिला जातो.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य ह्या योजनेच्या नावात बदल करून हया योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नाव देण्यात आले होते.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आपल्या देशातील सर्व पात्र नागरिकांना योजनेसाठी सुचीबदध करण्यात आलेल्या रूग्णालयात मोफत वैद्यकीय सुविधा प्राप्त करता येते.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची ऐनवेळी कुठलेही धावपळ होऊ‌ नये यासाठी त्याच्याकडे काही महत्वाचे कागदपत्रे देखील असणे आवश्यक आहे.

२०२०/२०२१ ह्या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२० पर्यंत ९३८८४ इतक्या लाभार्थींना ह्या योजनेचा लाभ दिला गेला आहे.

योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील काही शासकीय रूग्णालयांची निवड करण्यात आली आहे.हया शासकीय रूग्णालयात जाऊन आपणास ह्या योजनेचा लाभ घेता येईल.

महात्मा ज्योतीराव फुले जन Arogya Yojana काय आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकारने देशातील गरीब जनतेसाठी सुरू केलेली एक महत्वाची हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब जनतेला गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी पुर्णतः निःशुल्क अणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेसकरीता अंगीकृत रूग्णालयातुन उपलब्ध करून देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आज आपल्या महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एकत्रितपणे राबविण्यात येत आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे त्यासाठी ही मर्यादा २.५० लाख इतकी ठेवण्यात आली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?

ह्या योजनेचा लाभ पिवळी शिधापत्रिका धारकांना,अंत्योदय अन्न पुर्ण योजना शिधा पत्रिका धारक तसेच एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबाना दिला जाणार आहे.

औरंगाबाद अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपुर विभागातील वर्धा ह्या सर्व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तसेच शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थी, शासकीय आश्रमशाळेतील महिला, शासकीय आश्रमशाळेतील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक देखील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

माहीती तसेच जनसंपर्क कार्यालयाच्या निकषानुसार पत्रकार अणि त्यांचे कुटुंब,कामगार विभागाने निश्चित केलेले इतर बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येते.हया योजनेत महाराष्ट्र राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रूग्णालयात असलेल्या आरोग्य मित्रांचे साहाय्य प्राप्त करायचे.
  • ह्या योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या सर्व रूग्णालयात रूग्णांची मदत करण्यासाठी आरोग्य मित्रांची सुविधा उपलब्ध असते.
  • दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रूग्णाची नोंदणी देखील हे आरोग्यमित्र करत असतात.रूग्णालयात उपचार घेत असताना योग्य ते साहाय्य देखील करतात.
  • रूग्ण नोंदणी करत असताना रूग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र बघून करण्यात येत असते.ओळखपत्र म्हणुन ग्राह्य धरण्यात येत असलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in ह्या संकेतस्थळावर आपण पाहु शकतो.
  • ओळखपत्र म्हणून आपण महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले ओळखपत्र,असंघटीत कामगार ओळखपत्र दाखवू शकतो.
  • अणि आपल्याकडे हे ओळखपत्र उपलब्ध नसेल तर रेशनकार्ड अणि फोटोसह असणारे ओळखपत्र जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड,वाहन चालक परवाना, आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील असलेली कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका,सातबारा उतारा असणे गरजेचे आहे.
  • राज्य सरकारच्या वतीने निर्धारित करण्यात आलेले ओळखपत्र आश्रमशाळेतील विदयार्थी वर्गासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

योजनेअंतर्गत लाभार्थींना कोणकोणत्या सेवा सुविधांचा लाभ घेता येईल?

महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या योजनेअंतर्गत लाभार्थींना ३.४ निवडक विशेष सेवा अंतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर

अणि खर्चिक शस्त्रक्रिया १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेता येईल.

ह्या योजनेत कोरोनावरील उपचार देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे –

आरोग्य योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब परिस्थिती असलेल्या गरीब कुटुंबांना रूग्णालयात दर्जेदार उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

ह्या योजनेत लाभार्थीकडे कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असले तरी देखील त्याला उपचार सुविधेचा लाभ घेता येईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या ठेवण्यात आल्या आहेत?

Arogya Yojana ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

देशातील ज्या नागरिकांकडे पिवळे तसेच केशरी रेशनकार्ड आहेत.अशा नागरिकांना ह्या योजनेचा विशेष लाभ दिला जाईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

Arogya Yojana लाभ घेण्यासाठी अर्जदाराला योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा लागेल.हया अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतील.

● रेशनकार्ड झेरॉक्स

● आधार कार्ड

● वय प्रमाणपत्र

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● उत्पन्न प्रमाणपत्र

● वैद्यकीय अधिकारीने दिलेले आजाराचे प्रमाणपत्र

अस्मिता योजनेविषयी माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button