ट्रेण्डिंग

शेती कशी करावी याची माहिती

शेती कशी करावी

शेती कशी करावी काय आपण शेती करायचा विचार करत आहात आज आम्ही आपल्यासाठी शेती कशी करावी या बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते. भारत देशांमध्ये 70 टक्के लोक शेती करत असतात तसेच 20 टक्के लोक शेती निगडित व्यवसाय करत असतात.

भारत देश हा विकसनशील देश आहे शेतीमुळे भारताची प्रगती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. भारतामध्ये अनेक राज्य ही वेगवेगळ्या पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण शेती कोण कोणत्या पद्धतीने करू शकतो तसेच शेती करण्याचे कोणकोणत्या पद्धती आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया शेती कशी करावी याबद्दल.

शेतीचे असणारे विविध प्रकार

शेतीमधून काढल्या जाणाऱ्या उत्पादन वरून शेतीचे अनेक प्रकार पडत असतात. आज आपण शेतीचे कोणकोणते प्रकार पडत असतात याची माहिती अगदी सविस्तर येथे जाणून घेणार आहोत.

 मशागत

शेतजमिनीमध्ये पेरणी करण्यापूर्वी शेतीची चांगली मशागत करून घ्यावी लागते.

पेरणीपूर्वी जमिनीची मशागत खालील प्रक्रियेद्वारे केली जाते.

नांगरट करणे

जमिनीची खोलवर नांगरट केल्याने जमीन भुसभीत होते. जमिनीमध्ये पाणी हवा खेळती राहण्यास मदत होते. जमिनीमध्ये टाकलेले सेंद्रिय खत जमिनीत पुर्णपणे मिळस  ले जाते. मातीच्या थरात आदला बदल होऊन जमीन उपजाऊ बनते.

वखरणे (पाळी घालणे)

जमीन वखरल्यामुळे जमिनीतील ढेकळे फुटली जातात व जमीन एक समान होते. जमीन एक समान झाल्यामुळे पिकांना व्यवस्थित पाणी देता येते.

जमीन एक समान झाल्यामुळे पिकांना दिलेले पाणी एका ठिकाणी साठून न राहता एकाच गतीने जमिनीच्या दुसर्‍या टोकापर्यंत सरळ पोहचते व सर्व पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळते.

जमिनीत पाळी(वखरणे) घातल्यामुळे जमीनीत असलेले गवत, छोटी झुडपे, पिकांचे अवशेष, जमीन बाहेर फेकले जातात. ते अवशेष वेचून जमिनीच्या बाहेर फेकता येतात व जमीन स्वच्छ करता येते.

महत्वाचे

नांगरणी केल्यानंतर किंवा वखरणी केल्यानंतर जमिनीतून बाहेर आलेले पूर्वीच्या पिकाचे अवशेष बुडका इत्यादि पुर्णपणे नष्ट करून टाकावेत कारण त्या अवशेषांमध्ये पूर्वीच्या पिकावर पडलेले रोग, कीड हे सुप्त अवस्थेत शिल्लक राहिलेले असतात व ज्यावेळी आपण दुसरे पीक घेतो त्यावेळी ते नवीन पिकावर हल्ला करतात.

जमिनीची मशागत करण्याचे फायदे

बर्‍याच काळ जमिनीची मशागत न केल्यामुळे जमीन कडक व टणक बनते. परिणामी नैसर्गिक हवा व पाणी यांचा जमिनीमध्ये संचार होत नाही. नैसर्गिक हवा व पाणी यांचा जमिनीमध्ये संचार व्हावा याकरिता सुद्धा जमिनीची चांगली मशगत करणे आवश्यक असते.

जमिनीची चांगली मशागत केल्याने पुढील पिकाच्या वाढीसाठी जमीन सुटसुटीत व भुसभुशीत होते. जमिनीमध्ये पडलेला पालापाचोळा, शेणखत जमिनीमध्ये पुर्णपणे मिसळले जाते.

पिकांची निवड कशी कराल

शेतकरी मित्रांनो पेरणी करण्यापूर्वि पिकांची निवड करताना आपणास खालील काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

1. पिकांची निवड ही पिकांच्या हंगामावर सुद्धा अवलंबून असते. खाली पिकांचे हंगाम दिले आहेत त्यांचा अभ्यास करा व कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात हे जाणून घ्या.

2. जमीन बागायत असेल (शेतीसाठी पाणी मुबलक असेल) तर नगदी पिके घेऊन चांगला पैसा मिळवता येतो.

3. जर जमीन जिरायत असेल (शेतीसाठी पाणी पुरवठा कमी असेल) तर कमी पाण्यात येणारी पिके लागवडीसाठी निवडता येतात. यामध्ये उदरनिर्वाहाची पिके गहू, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश होतो.

4. मार्केटमध्ये कोणत्या पिकांना जास्त मागणी आहे यावरून सुद्धा शेतीत कोणते पिक घ्यायचे हे ठरवले जाते. बाजारपेठ पाहून पिक घेतल्यास नेहमी फायदा होतो व शेतमालाला चांगला दर मिळतो. मग यामध्ये फूल पिक, फळ पिक, मसाले पिक व इतर नगदी पिके निवडली जातात.

भारतात पिकाचे मुख्य हंगाम किती आहेत

भारतात पिकांचे मुख्यहंगामदोन आहेत खरीप आणि रब्बी

खरीप हंगामातील पिके

हे पिक जून ते जुले मध्ये पेरले जाते व नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये काढले जाते. यामध्ये तूर, ऊस, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका व तीळ या पिकांचा समावेश होतो.

 रब्बी हंगामातील पिके

हे पिक ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये घेतले जाते व मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये काढले जाते. उदाहरणार्थ बटाटा, जव, सरसो, हरभरा, राई, गहु, मटर इत्यादि.

नगदी पिके

हे पिक व्यापारी पिक आहे. यामध्ये येणारी पिके पैसा मिळवण्याच्या हेतूने घेतली जातात. उदाहरणार्थ कापूस, ऊस, कॉफी, चहा, ताग, तंबाखू, मसाले आणि रबर इत्यादि.

शेतीत लागवड केल्या जाणार्‍या प्रमुख पिकांची नावे

बाजरी, गहू, ज्वारी, मका,ऊस, घेवडा, गवार, भुईमूग, सोयाबीन, कापूस, नाचणी, हरभरा, चवळी, मटकी, वाटाणा, सूर्यफूल, उडीद, मूग, तीळ, मोहरी, लसूण, कांदा इत्यादि.

पेरणी कशी करायची

पूर्वीच्या काळी पेरणी करताना जमिनीतील माती बाजूला काढली जात असे आणि त्यानंतर बियाणे टाकले जात असत व बियाणे टाकून झाल्यावर पुन्हा त्या बियांवर माती टाकली जात असे. सध्या शेतीत पेरणी ही बैलाच्या साह्याने किंवा आधुनिक यंत्राच्या (ट्रॅक्टरने) साह्याने केली जाते.

बैलाच्या साह्याने फार कमी पेरणी केली जाते. आता सर्रास सर्व शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. ट्रॅक्टरने पेरणी केल्याने वेळेची व श्रमाची बचत होते.  

शेतकरी मित्रांनो आपल्या भागात पेरणी ही हंगामानुसार केली जाते. काही विशिष्ट पिकांची लागवड ही विशिष्ट हंगामामध्येच केली जाते कारण विशिष्ट पिकांसाठी विशिष्ट हंगामातील हवामान हे पीक वाढीसाठी उत्तम ठरते.

कोणत्या हंगामामध्ये कोणते पिक घेणे फायद्याचे ठरेल याविषयी माहीती तुम्ही कृषि तज्ञांकडून घेऊ शकता किंवा प्रगतशील शेतकर्‍याची भेट घेऊ शकता.

शेतीसाठी पाणीपुरवठा कसा कराल

शेतीसाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो म्हणजे पाणी होय. शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर शेती करणे खूप फायदेशीर ठरते. शेतीकरण्याअगोदर आपण पाण्याची सोय केली पाहिजे.

जर तुम्ही पैसा कमावण्याच्या हेतूने व्यापारी पिके शेतीत घेणार असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला पाण्याची उत्तम व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी तुमच्या शेतामध्ये पाण्याचा उत्तम स्रोत असणे गरजेचे आहेत. आपण खाली काही पाण्याचे महत्वाचे स्त्रोत पाहणार आहोत.

शेततळे

पाण्याचे प्रमाण कमी असणार्‍या भागांमध्ये शेततळी बांधली जातात. नैसर्गिकरित्या वाहून आलेले पावसाचे पाणी अशा शेततळ्यांमध्ये साठवले जाते.

शेततळे बांधण्यासाठी उंचवटा असलेली जमीन निवडली जाते. ज्यामुळे जमीन खोदण्यासाठी लागणारा खर्च कमी येतो.

कृषि विभागातर्फे शेततळे बांधण्यासाठी शेतकर्‍यांना 100 टके अनुदान दिले जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही संबधित तालुक्याक्या कृषि खात्याशी संपर्क साधू शकता.

विहीर

शेतीसाठी पाणी पुरवठा करणारा विहिर हा एक पाण्याचा उत्तम स्रोत आहे. अजूनही अनेक शेतकरी शेतीसाठी विहीरीतील पाण्याचा वापर करतात.

ज्या प्रदेशात पावसाळ्यात भरपूर पाऊस होतो, शेजारून पाण्याचा कालवा किंवा नदी गेली आहे अशा पाण्याखालच्या भागांमध्ये विहिरीला बारमाही पाणी असते. त्यामुळे त्या परिसरातील शेतकर्‍यांना शेती करण्यास पाण्याची अडचण येत नाही.

कृषि विभागातर्फे ज्या शेतकर्‍यांना शेतीसाठी विहीर उपलब्ध नाही अशा शेतकर्‍यांना नवीन विहीरीसाठी व जुनी विहीर खोदकाम दुरूस्तीसाठी अनुदान दिले जाते.

ठिबक सिंचन

हल्ली प्रत्येक शेतकर्‍याकडील बागायती क्षेत्रात वाढ होत आहे व पाण्याच्या क्षेत्रात घट होत चाललेली आहे. बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे उपलब्ध असलेले पाणी शेतीसाठी कमी पडत आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ठिबक सिंचन होय.

ठिबक सिंचनचा वापर करून उपलब्ध असलेले पाणी वेगवेगळ्या पिकांना पुरवता येते. ठिबक सिंचनचा वापर करून जास्तीत जास्त बागायती क्षेत्रापर्यंत पाणी पोहचवता येते.

ठिबक सिंचन हे शेतकर्‍यासाठी वरदान ठरत आहे. ठिबक सिंचनाच्या वापराने शेतीतील पाणी समस्येवर काही प्रमाणात मात करता येते.

ऊसमळा

उस हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. महाराष्ट्रातील बहुतांश बागांमध्ये उस या पिकाची लागवड केली जाते. ऊस या पिकापासून गूळ व साखर तयार केली जाते आणि ह्याच साखरेचा उपयोग अनेक प्रकारचे गोड खाद्य पदार्थ व पेये बनवण्यासाठी केला जातो.

महाराष्ट्रात उसापासून साखर तयार करणारे अनेक कारखाने आहेत. या साखर तयार करणार्‍या कारखान्यांना कच्चा माल म्हणून आसपासच्या परिसरातून ऊस पिकाचा भरपूर पुरवठा केला जातो. उस लागवडीसाठी लागणारी जमीन ही मध्यम भारी, पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत असावी लागते.

तसेच या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर असावे लागतात. सेंद्रिय पदार्थ कमी असल्यास शेणखत घालून सेंद्रिय पदार्थांची कमी दूर करता येते.

उस लागवडीकरिता जमीन तयार करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जमिनीची नांगरणी करून रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत तयार करावी व नंतर पाच फुटावर सरी पाडून लागवड करावी.

भात शेती

प्रमुख तृणधान्य पीक म्हणून भात या पिकाची ओळख आहे. भारत देशातील बहुतांश लोकांच्या आहारात भात हा अन्न पदार्थ आढळतो. भातातून शरीराला पोषक अन्नघटकांचा पुरवठा होतो. भात शेतीसाठी जमीन ही हलक्या, भारी, खारवट व पाणथळ प्रकारची असावी लागते.

पुरेशा प्रमाणात पाऊस व सिंचंनाची सोय असेल तर भात हे पिक कोणत्याही जमिनीत घेता येते. भात हे पिक उष्ण कटिबंध हवामानातील असल्यामुळे या पिकाला उष्ण व दमट हवामानाची आवश्यकता असते.

पशुधनप्रधान शेती

ज्या शेतीमध्ये पाळीव जनावरांसाठी चारा म्हणून वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते अशा शेतीला पशूधनप्रधान शेती असे म्हटले जाते. देशातील अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कोंबडी पालन, बोकड पालन असे बरेच व्यवसाय करू लागला आहे.

परंतु हे सर्व पशुपालनाचे व्यवसाय करत असताना जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करणे ही पशुपालकांसमोर सर्वात मोठी समस्या ठरते.

दुधाळ जनावरे, मांस उत्पादनासाठी पाळल्या जाणार्‍या जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकरी त्याच्याच शेतामध्ये संकरीत मका, मेथी घास, मारवेल,

मत्स्य शेती

मासे हा आहारातील महत्वाचा अन्नघटक मानला जातो. मासे खाणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अलीकडे प्रत्येक शहरात खास मच्छी फ्राय, मच्छी ताट जेवणाच्या डीशेस बनवणारे हॉटेल्स निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे माशांसाठी स्थानिक स्तरावर सुद्धा खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

शेतीला जोड व्यवसाय व समुद्रातील माशाला पर्याय म्हणून मत्स्य शेतीकडे बघितले जाते. शेतामध्ये सरकारकडून 100 टक्के अनुदानावर शेततळे तयार करून त्यामध्ये वेवेगळ्या प्रकारचे मासे पालन करणे हा शेतकर्‍याचा सर्वात जास्त नफा देणारा जोड व्यवसाय ठरू लागला आहे.

काही शेतकरी खास मत्स्य शेती करण्यासाठी स्व: खर्चाने शेतामध्ये कृत्रिम तलाव बांधतात व त्यामध्ये विहीर किंवा नदीतील पाणी सोडतात व मार्केट मध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या जातीचे मासे पालन करतात.

बागायती शेती

बागायती शेती ही पिकांसाठी भरपूर पाणीसाठा उपलब्ध असणारी शेती असते. बागायती शेतीमध्ये नगदी पिके घेतली जातात. अशी पिके जी व्यापारी दृष्टीने महत्वाची असतात. कापूस, ऊस, कॉफी, चहा, ताग, तंबाखू, मसाले या पिकांचे उत्पादन अशा शेतीमध्ये घेतले जाते.

जिराईत शेती

जिराईत शेती म्हणजे कोरडवाहु शेती होय. जिराईत शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. अशा शेतीमध्ये फक्त उदरनिर्वाहाची पिके घेतली जातात.

शेती कशी करावी निष्कर्ष

भारत देश हा कृषीप्रधान असा असणारा देश आहे म्हणुनच भारताला कृषी विभागाचा खूपच मोठा पुरवठा देखील भारत देशाचा राज्यांना लाभलेला आहे.

तुम्हाला शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती आवडलीच असेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला शेतीचे प्रकार देखील वरील प्रमाणे शेती कशी करावी या लेखांमध्ये दिलेले आहेत.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती शेती कशी करावी या बद्दल हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच आपल्याला शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button