BlogMarathi News

Watermelon Cultivation : टरबूज आणि खरबुज सुधारित लागवड तंत्रज्ञान

Watermelon Cultivation खरबूजाचा गर फिकट पिवळसर तांबूस किंवा फिकट हिरवा असतो. टरबूज प्रमाणेच बिया संबंध गरात पसरलेल्या असून त्या मध्यभागीच असतात. यामध्ये चुना फॉस्फरस ही खनिजे तसेच अ, ब आणि क जीवनसत्वे आढळतात गर सारक असल्याने बुद्धकोष्ठतेवर फारच उपयुक्त आहे.
टरबूज आणि खरबुज हे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचे आवडते व परवडणारे फळ आहे. रखरखत्या कडक उन्हाळ्यात तहानतेने हैराण झालेल्या प्रवाशांना त्यांचा थंडगार गोड आणि स्वादिष्ट गर म्हणजे निसर्गाने बहाल केलेली देणगीच आहे.
कमी क्षेत्रात, कमी श्रमात, कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि फळाचा टिकाऊपणा ह्या गुणवैशिष्ट्येमुळेच तसेच उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या मागणीमुळे शेतकरी या पिकाकडे व्यापारीदृष्ट्या पाहु लागला आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी टरबूजची आणि खरबुजाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली पाहिजे.

पोषकद्रव्ये व आहारातील महत्त्व Watermelon Cultivation

टरबूजच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण पाणी ९६ %, शर्करा पदार्थ ३.३ %, साखरेचे प्रमाण ९-१२ %, प्रथिने ०.२ %, फॅटस ०.२ %, तंतुमय पदार्थ ०.२ %, खनिजे ०.३ %, कार्बोहायड्रेडस ३.३ %, कॅलरी उष्मांक १६ %, चुना ०.०१ %, स्फुरद ०.०९ %, लोह ०.००८ %, जीवनसत्त्व-२३५ आय यू (‘क’-०.००१ मि. ग्रॅ., ‘ब’-१२ मि. ग्रॅ., ‘ई’-१ मि. ग्रॅ.) तसेच लायकोपीन व अॅन्थेसायानिन यांचे प्रमाण फळामध्ये जास्त असते.

खरबूजाचा गर फिकट पिवळसर तांबूस किंवा फिकट हिरवा असतो. टरबूज प्रमाणेच बिया संबंध गरात पसरलेल्या असून त्या मध्यभागीच असतात. यामध्ये चुना फॉस्फरस ही खनिजे तसेच अ, ब आणि क जीवनसत्वे आढळतात गर सारक असल्याने बुद्धकोष्ठतेवर फारच उपयुक्त आहे.
जमीन Watermelon Cultivation
•रेताड मध्यम काळी पोयट्याची किंवा गाळाची आणि चांगला निचरा होणारी जमिनीत यांची वाढ चांगली होते. जमिनीची सामू विमलता ६.५ ते ७.० दरम्यान असावा.
•भारी जमिनीत लागवड केल्यास वेलींची वाढ जास्त होते आणि जमीन आणि पाणी यांचा समतोलपणा न ठेवल्यास फळांना भेगा पडतात.
•करल, चिबड, चोपण जमिनीत लागवड करू नये. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणाऱ्या सोडियम, कॅल्शियम कार्बोनेट व बायकार्बोनेट, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, सारख्या विद्राव्य क्षारांमुळे फळावर डाग पडण्याची शक्यता असते.
•नविन लागवड केलेल्या फळबागातील रिकाम्या भागात या फळांची लागवड फायदेशीर ठरते.
•जमिनीची निवड करताना शक्यतो आधीच्या वर्षी भोपळ्यासारखी वेलवर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत या फळांची लागवड करू नये. अत्यंत हलक्या जमिनीत फळे पोसत नाहीत.

पूर्वमशागत

लागवडीपूर्वी जमीन उभी आडवी नांगरावी.
नंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देवून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी.
कुळव्याच्या पाळीच्या वेळी हेक्‍टरी ३० ते ४० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत सारख्या प्रमाणात मिसळावे.Watermelon Cultivation

लागवडीचा वेळ

लागवड शक्यतो तापमान वाढू लागल्यावर करावी.
या पिकाचा कालावधी जातीपरत्वे ९०-११० दिवसांचा असतो.
या पिकाची लागवड साधारण: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.

लागवड पद्धत

•या पिकाची लागवड आळ्या पद्धतीने २.० x ०.५ मीटर वर करावी. टरबूजच्या लागवडीसाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो (एकरी १ ते १.२५ किलो) बियाणे वापरावे. तसेच खरबूजाच्या लागवडीसाठी हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे वापरावे.
•बी लावण्यापूर्वी १२ तास कोमट पाण्यात भिजवावे नंतर रात्रभर बियाणे ओल्या बारदाण्यात बांधून ठेवावे यामुळे उगवण चांगली होते.
•लागवडीपूर्वी कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. लागवड करण्यापूर्वी पाणी द्यावे. वापसा आल्यानंतर आळ्यामध्ये तीन ते चार बिया १.५ ते २ से.मी. खोल लावाव्यात.

टरबूज काढणी Watermelon Cultivation

टरबूज देठाजवळची बाळी सुकली की, ते तयार झाले असे समजावे.
तयार फळ हे हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो.
टरबूजत जमिनीला स्पर्श करण्याच्या भागाचा पांढरट रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे.
फळे तयार असल्यास देठावर लव अजिबात दिसत नाही.
देठ अगदी गुळगुळीत दिसते. पूर्णगळ अवस्थेत फळ पिकल्यानंतर ते आपोआप गळते आणि त्याठिकाणी फळावर वर्तुळाकार खाच तयार होते.

खरबुजाची काढणी

जाळीदार खरबुजामध्ये जाळीमधील हिरवा रंग हा पिवळा होतो
आणि हे जाळे मळकट पांढरे होते. लांबच्या मार्केटसाठी ३/४ गळअवस्थेत फळ काढणी करावी.
फळांची काढणी ही ४ ते ५ दिवसांच्या अंतराने करावी लागवडीपासुन सुमारे ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरू होते
व त्यानंतर ३ ते ४ आठवड्यात पूर्ण होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button