सरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विषयी माहिती Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारने २०१६ -२०१७ मध्ये सुरू केलेली शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी,बारावी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक तसेच इतर बिगर व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेश प्राप्त झालेल्या.

ह्या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो ?

  1. पण कुठल्याही शासकीय तसेच महाविद्यालयीन वसतीगृहात प्रवेश प्राप्त न झालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार ह्या योजनेचा लाभ दिला जातो.
  2. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्राप्त केला आहे.
  3. अशा तसेच पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील ह्या योजनेचा लाभ दिला जातो.
  4. फक्त ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाची अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांने कुठल्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेला नसावा.

आजच्या लेखात आपण डाॅ,बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

स्वाधार योजनेच्या लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रमुख अटी कोणकोणत्या आहेत?

  1. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी,बारावी पदवी तसेच पदविका परीक्षेत विद्यार्थ्यांने ६० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
  2. अनुसुचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग, अपंग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के इतकी ठेवण्यात आली आहे.
  3. स्वाधार योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असु नये.
  4. म्हणजे त्याच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख तसेच अडीच लाखापेक्षा कमी असायला हवे.
  5. ह्या योजनेचा लाभ स्थानिक विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही ह्या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा.
  6. जे विद्यार्थी खेड्यातील आहेत पण शिक्षणासाठी शहरात गेले आहेत अशाच बाहेरगावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  7. स्वाधार योजनेसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतील मग सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे.
  8. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठयक्रमाशी प्रोफेशनल कोर्सशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  9. विद्यार्थ्यांचे बॅक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्या राष्ट्रीयकृत बॅकेत खाते आहे त्या खात्याशी आधार क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
  10. योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  11. विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अकरावी तसेच बारावी मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना

  1. विद्यार्थी अकरावी बारावी तसेच त्यानंतरच्या दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा नसावा.
  2. अकरावी तसेच बारावी मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  3. तसेच बारावी नंतरच्या दोन वर्षांकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
  4. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी नसलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी ६० टक्के किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन सीजीपीएचे गुण असणे आवश्यक आहे.
  5. बारावीनंतर पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा हा दोन वर्षांपेक्षा अणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी देखील दोन वर्षांपेक्षा कमी असु नये. 
  6. विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने राज्य शासन,आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद,वैद्यकीय परिषद,फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद,कृषी परिषद,महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद,तत्सम सक्षम प्राप्तीकारी यांच्या मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालया तसेच मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
  7. ह्या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे म्हणजे ह्या योजनेसाठी पात्र व्हायला त्यांना किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  8. योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच पात्र असणार आहे.
  9. प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्र निकालाची प्रत निकाल लागल्यापासून १५ दिवसांच्या आत नेमुन दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक असणार आहे.
  10. ह्या योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंत देय असणार आहे.हया योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत घेता येईल.
  11. एखाद्या विद्यार्थ्याने खोटी माहिती कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास,नोकरी व्यवसाय करत असल्यास,इतर मार्गाने ह्या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो विद्यार्थी कारवाईस पात्र ठरेल.
  12. तसेच त्या विद्यार्थ्यांला दिलेल्या रक्कमेची बारा टक्के व्याजाची वसुली करण्यात येईल.
  13. योजनेचा लाभ मंजुर झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांस प्रत्येकी वर्षी ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे अन्यथा तो ह्या योजनेसाठी अपात्र ठरेल.

स्वाधार योजनेच्या लाभाचे स्वरूप –

योजनेसाठी अ,ब,क अशा तीन भागात शहरांची विभागणी केली गेली आहे.

अ-मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर ह्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे असणार आहे –

  • भोजन भत्ता -३२ हजार
  • निवास भत्ता -२० हजार
  • निर्वाह भत्ता -८ हजार
  • असे एकुण ६० हजार रुपये विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत.
  1. उर्वरित महसुल विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग मनपा क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २८ हजार,निवास भत्ता १५ हजार,अणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये दिला जाईल.म्हणजे एकुण ५१ हजार रुपये त्यांना प्राप्त होणार आहे.
  2. उर्वरित ठिकाणी म्हणजे मोठे शहर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना २५ हजार भोजन भत्ता, १२ हजार निवास भत्ता, ६ हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाईल.
  3. असे एकुण ४३ हजार रुपये दिले जाणार आहेत.
  4. वरील रक्मेव्यतीरीक्त वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये अणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येणार आहे.

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –

  • महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला/वय अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जन्म तारखेचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक
  • जातीचा दाखला
  • रेशनकार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बॅक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स/बॅक स्टेटमेंट झेरॉक्स, रद्द केलेला चेकची छायांकित प्रत
  • तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसुल अधिकारीने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडील नोकरीवर असल्यास फाॅम नंबर १६
  • विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक
  • महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्यीनीचे लग्न झाले असेल तर पतीच्या उत्पन्नाचा पुरावा
  • बॅक खाते आधार क्रमांकाशी लिंक केल्याचा पुरावा
  • विद्यार्थ्यांने कुठल्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेला नसल्याचे प्रमाणपत्र
  • स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र
  • विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा वसतिगृह भाडे करारनामा
  • महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र
  • सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत

पीएम किसान सम्मान निधी योजने विषयी माहीती Pm Kisan Samman Nidhi Yojana Information in Marathi

स्वाधार योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा ?

  1. विद्यार्थ्यांने तो ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहे ज्या जिल्ह्यात स्वाधार योजनेसाठी त्याला अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात हा अर्ज आपणास उपलब्ध होऊन जाईल.
  2. मग फाॅममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन आपण समाज कल्याण कार्यालयात हा अर्ज जमा करायचा आहे.
  3. स्वाधार योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्यासाठी आपल्याला आपल्या रहिवासी असलेल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
  4. तिथे आपल्याला योजनेशी संबंधित सर्व माहिती प्राप्त होईल.

Smallest EV Car 2024 : बाजारपेठेतील टाटा नॅनोपेक्षा लहान EV कार लॉन्च , पहा तिचे दमदार फिचर्स !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button