सरकारी योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ विषयी माहिती Free Tablet Yojana 2024

दहावी पास झाल्यानंतर सर्व विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग अशा उच्च शिक्षणाकडे वळत असतात.पण घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना क्लासेसची फी भरून महागडे कोंचिग क्लासेस लावता येत नसतात.अशा गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना टॅबलेटच्या आॅनलाईन पदधतीने आपले शिक्षण पूर्ण करता यावे ह्यासाठी महाज्योती कडुन ह्या फ्री टॅबलेट उपक्रमा Free Tablet Yojana चा आरंभ करण्यात आला आहे.

आजच्या लेखात आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना काय आहे?

ही योजना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना घरी बसुन आॅनलाईन पदधतीने आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महाज्योती फ्री टॅबलेट योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेसोबत मिळुन दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा मुख्य हेतु –

महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत अणि आता ते पुढील शिक्षणासाठी अकरावी सायन्सला प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना आॅनलाईन पदधतीने आपला कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी त्यांना फ्री मध्ये टॅबलेट वितरीत करणे.त्यांना त्यांचे आॅनलाईन शिक्षण घेण्यासाठी मदत करणे

जेणेकरून त्यांना टॅबलेटच्या साहाय्याने आपला कोचिंग क्लासेसचा अभ्यासक्रम पुर्ण करता येईल.

आर्थिक परिस्थिती गरीबीची असलेल्या विद्यार्थ्यांना देखील आॅनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन प्राप्त व्हावे यासाठी महाज्योती कडुन ही योजना सुरू केली गेली आहे.

महाज्योती योजनेची इतर उद्दीष्टे –

 • विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर तसेच सक्षम बनवणे
 • आर्थिक परिस्थिती गरीबीची असलेल्या मुलांना टॅबलेट देऊन त्यांना डिजीटल शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना डिजीटल युगासोबत जोडण्याचा प्रयत्न करणे.
 • विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन पदधतीने आपला कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करता यावा

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील दहावी पास होऊन अकरावी सायन्ससाठी प्रवेश घेणार असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी ओबीसी, एसबीसी व्हीजे एनटी ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल

Free Tablet Yojana योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाज्योती संस्थेकडून आॅनलाईन कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोफत मध्ये टॅबलेट देण्यात येते.

योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

महाज्योती फ्री टॅबलेट ह्या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने महाज्योती संस्थेसोबत मिळुन केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी सायन्सला अॅडमिशन घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट,सहा जिबी इंटरनेट सुविधा फ्री मध्ये देण्यात येते.

विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली महत्वाची प्रशिक्षण पुस्तके देखील मोफत मध्ये वितरीत केली जातात.

महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या टॅबलेट मोफत इंटरनेट डेटा इत्यादी सोयी सुविधेसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.हया सर्व सुविधा विद्यार्थ्यांना निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात.

योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३० लाख गरजु विद्यार्थ्यांना मोफत मध्ये टॅबलेट देण्यात येणार आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोघांनाही घेता येईल.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांला किती गुण असणे आवश्यक आहे?

महाज्योती ह्या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी भागातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला दहावी मध्ये किमान ७० टक्के तसेच त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.

ह्या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला दहावी मध्ये किमान ६० टक्के तसेच त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी नियम कोणकोणते आहेत?

विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवासी असावा.

अर्जदार विद्यार्थीचे दहावी उत्तीर्ण झाले असावे.

विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कुठल्याही योजनेद्वारे मोफत टॅबलेट प्राप्त केला असेल तर त्याला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक सरकारी नोकरी करत नसावे

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत

 • रहिवासी पुरावा
 • लाईटबील
 • रेशनकार्ड
 • आधार कार्ड
 • दहावी पास मार्कशीट
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • नाॅन क्रिमिलेअर
 • अकरावी सायन्सला अॅडमिशन घेतल्याची पावती
 • दोन पासपोर्ट साईज फोटो
 • ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

सर्वप्रथम आपणास mahajyoti.og.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

होमपेजवर गेल्यावर आपल्याला अपकमिंग इव्हेंट खाली असलेल्या एम सीईटी जेईई नीट नोंदणीखाली अजुन वाचा असे एक बटण दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर अजुन एक नवीन पेज ओपन होईल तिथे click here for registration वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर एक अर्ज येईल त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे अणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज केल्यानंतर सात आठ दिवसांत महाज्योती कडुन विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जातो.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button