सरकारी योजना

एल आयसी जीवन लक्ष्य पाॅलिसी विषयी माहिती LIC Jeevan Lakshya Policy Information in Marathi

एल आयसीची जीवन लक्ष्य LIC Jeevan Lakshya ही पाॅलिसी एल आयसी दवारे १ फेब्रुवारी २०२० रोजी लाॅच करण्यात आली होती. हया पाॅलिसीचा प्लॅन नंबर ९३३ आहे.

जीवन लक्ष्य पाॅलिसी काय आहे? What is LIC Jeevan Lakshya Policy

एल आयसीची जीवन लक्ष्य ही पाॅलिसी सुरक्षा अणि बचत ह्या दोन्हींचे संयोजन मानली जाते म्हणजे ह्या पाॅलिसी मुळे आपली पैशांची बचत तर होईलच शिवाय आपल्या पैशाला आर्थिक सुरक्षा देखील प्राप्त होते. आपल्या दैनंदिन जीवनातील कौटुंबिक गरजांचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जीवन लक्ष्य ही पाॅलिसी अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच जीवन लक्ष्य पाॅलिसी मध्ये मॅच्युरिटी पिरीअड संपण्याच्या आधी जर पाॅलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देखील ह्या योजनेअंतर्गत प्राप्त होत असते.

जीवन लक्ष्य पाॅलिसीचे वैशिष्ट्य काय आहे?

पाॅलिसी धारकाचा पाॅलिसी दरम्यान मृत्यू झाल्यास जीवन लक्ष्य पाॅलिसी मध्ये त्याच्या कुटुंबाला डेथ बेनिफिट दिला जातो.

तसेच पाॅलिसी धारक संपूर्ण टर्म कालावधी मध्ये जिवंत राहिल्यास त्याला मॅच्युरिटी बेनिफिटच्या माध्यमातून लंपसम रक्कम देखील दिली जाते.

एल आयसीच्या होत असलेल्या नफ्यातील हिस्सा साधा प्रत्यावर्तन बोनस शेवटचा अतिरीक्त हिस्सा म्हणुन पाॅलिसी धारकाला दिला जातो.

जीवन लक्ष्य पाॅलिसी मध्ये अतिरिक्त प्रिमियम भरून आपणास अपघाती मृत्यू तसेच अपंगत्व लाभ देखील प्राप्त करता येतो.

याचसोबत आपणास अपघात लाभ, नवीन टर्म अॅशुरन्स, नवीन गंभीर आजाराचा लाभ देखील घेता येईल.

Aam Aadmi Bima Yojana आम आदमी विमा योजनेविषयी माहिती

ज्या पाॅलिसी धारकाला डेथ बेनिफिट अणि मॅच्युरिटी बेनिफिट एकरकमी नको आहे त्यांना पाच दहा तसेच पंधरा वर्षे इतक्या कालावधीत इंस्टॉलमेंट मध्ये पैसे घेता येतील.

यासाठी कमीत कमी पाच हजार रुपये महिना, पंधरा हजार रुपये तिमाही,पंचवीस हजार रुपये सहामाही अणि पन्नास हजार रुपये वार्षिक इतकी हप्त्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

एल आयसीच्या जीवन लक्ष्य ह्या पाॅलिसी करीता प्रिमियम हा पाॅलिसी धारकाला मासिक, तिमाही, सहामाही वार्षिक इत्यादी स्वरूपात भरता येईल.

मासिक स्वरूपात प्रिमियम भरताना आपणास उशीर झाला तर १५ दिवसांचा ग्रेस पिरीअड दिला जातो.

अणि तिमाही सहामाही तसेच वार्षिक स्वरुपात प्रिमियम भरताना उशीर झाल्यास ३० दिवस इतका ग्रेस पिरीअड दिला जातो.

प्रिमियमवर पाॅलिसी धारकाला सवलत

जितकी जास्त विम्याची रक्कम त्यानुसार ठाराविक दराने प्रिमियमवर पाॅलिसी धारकाला सवलत देखील दिली जाते.

दोन लाख ते चार लाख नव्वद हजार रक्कमेच्या दोन टक्के अणि पाच लाखावरील विमा रक्कमेवर तीन टक्के इतकी सवलत दिली जाते.

एल आयसीच्या जीवन लक्ष्य ह्या पाॅलिसीवर दोन वर्षांचा लाॅक इन पिरीअड देण्यात आला आहे.म्हणजे पाॅलिसी धारकाने दोन वर्षांत सर्व प्रिमियम भरले असल्यास त्याला त्याची पाॅलिसी सरेंडर देखील करता येते.

जीवन लक्ष्य ह्या पाॅलिसीवर पाॅलिसी धारकाला कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.कर्जाची रक्कम ही पाॅलिसी सरेंडर किंमतीच्या ९० टक्के इतकी असते.

पाॅलिसी खरेदी केल्यानंतर ज्या पाॅलिसी धारकांना पाॅलिसी मधील अटी शर्ती मान्य नाहीत जे पाॅलिसी बाबद समाधानी नाही अशा विमा पाॅलिसी धारकांना १५ दिवसांचा फ्री लुक पिरीअड देखील जीवन लक्ष्य पाॅलिसी मध्ये दिला जातो.

ह्या फ्री लूक पिरीअड मध्ये पाॅलिसी धारकाला खरेदी केलेली पाॅलिसी परत करता येते.

एल आयसीच्या जीवन लक्ष्य पाॅलिसीचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी –

ही पाॅलिसी खरेदी करण्यासाठी पाॅलिसी धारकाचे वय किमान १८ ठेवण्यात आली आहे

म्हणजे किमान अठरा वय असताना जास्तीत ५० वय होईपर्यंत ही पाॅलिसी पाॅलिसी धारकाला खरेदी करता येते.

पाॅलिसी पुर्ण होताना म्हणजे मॅच्युरिटी वय जास्तीत जास्त ६५ वर्ष ठेवण्यात आले आहे.त्यानुसार पाॅलिसी जारी करण्यात येत असते.

किमान पाॅलिसीचा १३ वर्षे अणि जास्तीत जास्त २५ वर्ष इतका ठेवण्यात आला आहे.

यापैकी जो टर्म पाॅलिसी धारक निवडेल त्यातील तीन वर्षे वजा करून बाकीची वर्षे पाॅलिसी धारकाला प्रिमियम भरावा लागतो.

तोच पाॅलिसी धारकाचा प्रिमियम भरण्याचा कालावधी असतो.

पाॅलिसी खरेदी करण्यासाठी कमीत कमी एक लाख रुपये इतकी बेसिक विम्याची मुळ रक्कम घ्यावी लागेल.

पण जास्तीत जास्त विम्याची रक्कम भरण्यासाठी कुठलीही मर्यादा ठेवण्यात आली नाहीये.

दहा हजार रूपये यांच्या पटीने कितीही रक्कम आपणास निवडता येईल.

एक लाख विम्याच्या रक्कमेसाठी किती प्रीमियम भरावा लागेल?

समजा पाॅलिसी धारकाचे वय २० वर्ष आहे अणि त्याने तेरा वर्ष हा पाॅलिसी टर्म निवडला तर दहा वर्षांसाठी त्याला ९ हजार ८७३ रुपये वार्षिक प्रिमियम भरावा लागेल.

याचठिकाणी पाॅलिसी टर्म १५ वर्ष असेल तर बारा वर्षांसाठी ८११४ रूपये इतका वार्षिक प्रिमियम भरावा लागेल.

२० वर्षाच्या पाॅलिसी टर्म साठी १७ वर्ष ५ हजार ६४५ रूपये इतका वार्षिक प्रिमियम भरावा लागेल.

२५ वर्षाच्या पाॅलिसी टर्म साठी २२ वर्ष ४ हजार २५३ रुपये इतका वार्षिक प्रिमियम भरावा लागेल.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button