सरकारी योजना

एल आयसी कन्यादान पाॅलिसी विषयी माहिती LIC Kanyadan Policy information in Marathi

मुलगी जन्माला आल्यावर आईवडिलांच्या पुढे सगळ्यात पहिले एकच प्रश्न निर्माण होतो असतो तो म्हणजे मुलीचे शिक्षण अणि तिचे लग्न कसे करायचे. याचकरीता आईवडील भविष्यात मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे असावे म्हणून आपापल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतात. एल आयसीने सुरू केलेली LIC Kanyadan Policy ही पाॅलिसी आज सर्व आईवडिलांसाठी अणि त्यांच्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाची गुंतवणुक योजना आहे.

आजच्या लेखात आपण एल आयसीच्या ह्या कन्यादान पाॅलिसी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

कन्यादान पाॅलिसी काय आहे LIC Kanyadan Policy ?

कन्यादान पाॅलिसी ही भारतीय जीवन विमा निगमने आईवडिलांना त्यांच्या मुलीच्या नावाने तिच्या भविष्यासाठी म्हणजे शिक्षण तसेच लग्नासाठी गुंतवणुक करता यावी यासाठी आणलेली एक उत्तम पाॅलिसी मानली जाते.

जे व्यक्ती कन्यादान पाॅलिसीचे रोज प्रिमियम भरतील त्यांना १२१ रूपये भरावे लागतील.

पण याचठिकाणी ज्यांना हा प्रिमियम महिन्याला भरायचा आहे त्यांना महिन्याला ३६०० रूपये इतका मासिक प्रिमियम भरावा लागेल.

कन्यादान पाॅलिसीचे उद्दिष्ट काय आहे?

आईवडिलांना आपल्या मुलीच्या शालेय शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी भविष्यात पैसे उभे करता यावेत त्यांच्याकडे आपल्या मुलीच्या शालेय शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी पैसे असावे ह्या साठी एल आयसी आॅफ इंडियाने कन्यादान ही पाॅलिसी सुरू केली आहे.

कन्यादान पाॅलिसीचा लाभ कोणाला घेता येईल?

ज्या आईवडिलांना आपल्या मुलीच्या शालेय शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी पैसे बाजुला टाकायचे आहेत

असे सर्व पालक आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी कन्यादान पाॅलिसीचा लाभ घेऊ शकतात.

पाॅलिसीचा कालावधी किती आहे?

कन्यादान ह्या पाॅलिसीचा एकुण कालावधी २५ वर्षे इतका असतो.

कन्यादान पाॅलिसीमध्ये किती वर्षे पैसे गुंतवायचे आहेत?

ह्या पाॅलिसीचा मॅच्युरिटी कालावधी जरी २५ वर्ष आहे पण गुंतवणुकदाराला ह्या पाॅलिसी मध्ये फक्त २२ वर्षे इतक्या कालावधीसाठी ह्या पाॅलिसी मध्ये पैसे गुंतवायचे आहेत.

अणि २५ वर्षांनंतर गुंतवणुकदारांना २७ लाख इतकी मॅच्युरिटी रक्कम प्राप्त होते.

२७ लाख ही एक फार मोठी रक्कम आहे त्यामुळे हया रक्कमेत आईवडील आपल्या मुलीचे शिक्षण अणि लग्न दोघेही व्यवस्थित पार पाडू शकतात.

सेंद्रिय खताचा व्यवसाय कसा सुरू करावा..?

कन्यादान पाॅलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

कन्यादान ही विमा पॉलिसी एकुण दोन कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही विमा पॉलिसी १ ते १३ वर्षे तसेच १ ते २५ वर्षे ह्या दोन कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एल आयसी कन्यादान पाॅलिसी अंतर्गत आपण जो काही कालावधी निवडतो त्यासाठी आपल्याला शेवटचे तीन वर्षांसाठी कुठलाही प्रिमियम भरावा लागत नाही.

म्हणजे ज्या आईवडिलांनी १ ते १३ वर्षे इतका कालावधी निवडला आहे त्यांना फक्त दहा वर्षे प्रिमियम भरावा लागतो.

यात तीन वर्षांचा प्रिमियम आपल्याला एल आयसी कडुन दिला जातो.

लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी तसेच नियम कोणकोणते आहेत?

कन्यादान पाॅलिसी अंतर्गत पाॅलिसी खरेदी करण्यासाठी वडिलांचे वय कमीत कमी १८ अणि जास्तीत जास्त ५० असावे म्हणजे मुलीच्या वडिलांचे वय १८ ते ५० ह्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

ज्या मुलीच्या वडिलांचे वय ५० पेक्षा जास्त आहे अशी मुलगी ह्या पाॅलिसीचा लाभ घेऊ शकत नाही.

कन्यादान पाॅलिसीचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय कमीत कमी १ असणे आवश्यक आहे

म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली मुलगी किमान वर्षांची झालेली असणे गरजेचे असणार आहे.

आईवडील आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून देऊ शकतात.

वडिलांच्या अणि मुलीच्या वयामध्ये असलेल्या अंतरावर ही कन्यादान पाॅलिसी योजना आधारीत आहे.मुलीच्या अणि तिच्या वडिलांच्या वयामध्ये किती अंतर आहे ह्या नुसार ही पाॅलिसी आपणास दिली जाते.

मुलीच्या वयानुसार ह्या पाॅलिसीची कमाल मर्यादा कमी केली जाते.

ज्या व्यक्तींना कमी किंवा जास्त प्रिमियम भरायचा आहे तो ह्या पाॅलिसी योजनेत सहभागी होऊ शकतो.

पाॅलिसी धारकाने म्हणजेच मुलीच्या वडिलांनी पाॅलिसी खरेदी केल्यानंतर बारा महिन्यांच्या आत आत्महत्या केली तर पाॅलिसी धारकाला ह्या योजनेचा कुठलाही लाभ देण्यात येणार नाही.

कन्यादान पाॅलिसी सुरू झालेल्या तारखेपासून पाॅलिसी धारकाला १५ दिवसांचा एक फ्री लुक कालावधी देण्यात येतो

जर पाॅलिसी धारक कन्यादान पाॅलिसीच्या अटी नियमांनी समाधानी नसेल त्याला ह्या कालावधीत पाॅलिसी रद्द करता येते.

वार्षिक त्रैमासिक पेमेंटच्या बाबतीत ह्या पाॅलिसी अंतर्गत आपल्याला ३० दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो.

हया वाढीव कालावधी मध्ये पाॅलिसी धारकाकडुन कोणतेही विलंब शुल्क घेतले जात नाही.

पण पाॅलिसी धारकाने वाढीव कालावधी संपण्याच्या आधी भरला नाही तर अशावेळी त्याची पाॅलिसी संपुष्टात येऊ शकते.

कन्यादान पाॅलिसी मध्ये तीन वर्षे प्रिमियम भरल्यानंतर पाॅलिसी धारक पाॅलिसी सरेंडर देखील करू शकतो.

पाॅलिसी खरेदी करण्यासाठी वडिलांचे वय किमान ३० वर्षे अणि मुलीचे वय किमान एक वर्ष असणे आवश्यक आहे.

LIC Kanyadan Policy अंतर्गत जर मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत प्रिमियम भरावा लागत नसतो.

लाभार्थींचा अपघाती मृत्यू झाला तर कन्यादान पाॅलिसी अंतर्गत त्याच्या कुटुंबाला १० लाख रुपये अणि नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास कन्यादान पाॅलिसी अंतर्गत त्याच्या कुटुंबाला ५ लाख दिले जातात.

कन्यादान पाॅलिसी खरेदी केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाॅलिसीचा प्रिमियम त्याच्या कुटुंबाला भरण्याची आवश्यकता नसते.

अणि मृत झालेल्या पाॅलिसी धारकाच्या कुटुंबाला एल आयसी कडुन दरवर्षी एक लाख रुपये देण्यात येतात.

कन्यादान पाॅलिसी अंतर्गत दिला जाणारा लाभ –

पाॅलिसी अंतर्गत वडिलांनी जर ७५ रूपये रोज जमा केले तर मासिक प्रिमियम भरून झाल्यावर मुलगी २५ वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नाच्या वेळी ह्या योजनेअंतर्गत १४ लाख इतकी रक्कम दिली जाते.

कन्यादान पाॅलिसी सुरू कशी करायची?

पाॅलिसी खरेदी करण्यासाठी आपल्याला आपल्या शहरातील एल आयसी आॅफिस मध्ये जाऊन एखाद्या एल आयसी एजंटशी संपर्क साधावा लागेल.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button