सरकारी योजना

Shram Vidya Shaikshanik Karj Yojana श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेविषयी माहिती

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज Shram Vidya Shaikshanik Karj Yojana ह्या योजनेअंतर्गत सहज अणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत शुन्य टक्के इतके व्याजदर आकारून सहकारी बॅकेच्या मदतीने शेतकऱ्यांच्या मुलामुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महाराष्ट्र सरकारच्या ह्या नवीन कर्ज योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना शून्य टक्के इतक्या व्याजदराने आपले उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे.

ही योजना महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक विभागाकडून राबविण्यात येत आहे.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

Who are the beneficiaries of Shram Vidya Shaikshanik Karj Yojana ?

योजनेचे लाभार्थी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले असणार आहेत.म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलेमुली बारावी उत्तीर्ण झाली आहेत.अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना आपले पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करता यावे यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत त्यांना शुन्य टक्के व्याजदराने म्हणजे बिनव्याजी पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ह्या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना पाच लाखापासुन पंधरा लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शुन्य व्याजदरात कर्ज प्राप्त करून देणे.

शेतकऱ्यांच्या मुलामुलींना उच्च शिक्षण प्राप्त करून देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कर्ज हवे आहे त्यांनी आपल्या शहरातील राष्ट्रीयकृत बँकेत जायचे आहे.

अणि बॅकेच्या मार्फत ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा आहे.अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल मग विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

अनुभव पुरस्कार योजना २०२४ विषयी माहिती Anubhav Puraskar Scheme information in Marathi

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे-

  • विद्यार्थ्यांने महाविद्यालयात प्रवेश घेतला असल्याचा पुरावा
  • बारावीचे गुणपत्रक
  • शेतकरी वडिलांचा मृत्यू दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • तसेच विद्यार्थ्यांचे कमीत कमी अठरा वर्षे पूर्ण असायला हवे

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

कर्ज योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे तारण ठेवावे नाही.किंवा जामीन देखील लागत नाही.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पाच ते दहा लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी तारणाची गरज नसेल पण एका जामीनदाराची आवश्यकता असते.

योजनेअंतर्गत दहा ते पंधरा लाखापर्यंतच्या दिल्या जात असलेल्या कर्जावर विद्यार्थ्यांना तारणाची अणि दोन जामीनदारांची आवश्यकता असेल.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क भरावे लागत नाही.

ह्या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी शुन्य टक्के व्याजदराने बिनव्याजी स्वरूपात पाच लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

जे विद्यार्थी ९० टक्के गुण प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतचे बक्षिस ह्या योजनेअंतर्गत दिले जाते.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत आकारले जाणारे व्याजदर –

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते ह्या कर्जावर कुठलेही व्याज आकारण्यात येत नाही.

पण याचठिकाणी विद्यार्थ्याला जर पाच लाखापासुन दहा लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्याच्याकडुन दोन टक्के इतके व्याज घेतले जाते.

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी दहा ते पंधरा लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज हवे आहे अशा विद्यार्थ्यांना चार टक्के व्याजदर आकारून कर्ज दिले जाते.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज ह्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना आपले उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज प्राप्त होईल.

ह्या कर्ज योजनेमुळे विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्राप्त होईल.

शासनाच्या ह्या योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना मोठा आधार प्राप्त होईल.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत प्राप्त होत असलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी –

Shram Vidya Shaikshanik Karj Yojana योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी जे काही कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल त्या कर्जाची परतफेड विद्यार्थ्यांला शिक्षण पुर्ण झाल्यावर बारा महिन्यांनी सुरू करता येईल कर्जाच्या परतफेडीचा एकुण कालावधी दहा वर्ष असणार आहे.

म्हणजे नोकरी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकतात.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड योजना २०२४ विषयी माहिती Sovereign gold bond 2024 scheme information in Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button