सरकारी योजना

Pm Yashasvi Scholarship 2024 Scheme पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती

Pm Yashasvi Scholarship 2024 Scheme चा फुलफाॅम prime minister young achievers scholarship award scheme for vibrant India असा आहे.

पीएम यशस्वी योजना काय आहे?

Pm Yashasvi Scholarship 2024

पीएम यशस्वी ही एक शिष्यवृत्ती योजना आहे.पीएम यशस्वी ही राज्य सरकारची योजना आहे.

जिच्याअंतर्गत ७५ हजार पासुन १२५००० इतकी शिष्यवृत्ती नववी दहावी ते अकरावी बारावी इयत्तेतील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दिली जाते.

जे विद्यार्थी २०२४ मध्ये नववी दहावी आणि अकरावी बारावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी शासनाकडुन ७५ हजार पासुन १२५००० हजार इतकी शिष्यवृत्ती प्राप्त करू शकतात.

ह्या योजनेअंतर्गत दरवर्षी १५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी निवडले जाते.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल?

ह्या योजनेअंतर्गत नववी दहावी तसेच अकरावी बारावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

म्हणजे ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील नववी दहावी पासुन अकरावी बारावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल.

पीएम यशस्वी ही शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता नववी ते अकरावी इयत्तेतील शिकत असलेल्या विमुक्त भटक्या अर्धभटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

एल आयसी कन्यादान पाॅलिसी विषयी माहिती LIC Kanyadan Policy information in Marathi

तसेच ह्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आय आयटी, एम्स,एन आयटी,एन आय एफटी,एन आयडी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट,नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, तसेच केंद्र सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या इतर संस्थेतील विद्यार्थी देखील पात्र ठरतील.

पीएम यशस्वी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २५०००० रूपये पेक्षा कमी आहे.

योजनेअंतर्गत जवळपास ३८५ करोड रुपये इतके आर्थिक साहाय्य विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती दिली जाईल?

योजनेअंतर्गत नववीत दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ७५ हजार इतकी शिष्यवृत्ती देण्यात येईल.ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या कालावधीकरीता दिली जाणार आहे.

अणि जे विद्यार्थी अकरावी बारावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत १ लाख २५ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल?

योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी नववी ते अकरावी इयत्तेतील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल ही प्रवेश परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी घेतली जाते.

ह्या प्रवेश परीक्षा मध्ये एक प्रश्न विचारला जाईल ज्यासाठी विद्यार्थ्यांना एकुण चार पर्याय दिलेले असतील.हया चार पर्याय पैकी एक अचुक पर्याय विद्यार्थ्यांना निवडावा लागतो.

पण नवीन अपडेटनुसार आता पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांची निवड मेरीट लिस्टच्या आधारे करण्यात येणार आहे.

कारण ह्या शिष्यवृत्तीसाठी घेतल्या जात असलेल्या परीक्षेमुळे विद्यार्थीवर अतिरीक्त अभ्यासाचे ओझे पडत होते.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत नववी इयत्तेच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड त्याच्या आठवी इयत्तेतील मार्क अणि टक्क्यांच्या आधारावर करण्यात येणार आहे.

अणि अकरावी इयत्तेतील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड त्याच्या दहावी इयत्तेतील मार्क अणि टक्क्यांच्या आधारावर करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड नॅशनल स्काॅलरशिप ह्या पोर्टल द्वारे करण्यात येणार आहे.

पीएम यशस्वी योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

पीएम यशस्वी ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हे आहे.

आर्थिकदृष्ट्या गरीबीची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत असते.

विद्यार्थ्यांच्या ह्याच मुख्य अडचणीला दुर करण्यासाठी दुर करण्यासाठी ही पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

ह्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ओबीसी,ईबीसी,डीबीटी,एस एनटी इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा लाभ

पीएम यशस्वी ह्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला ४५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.

पुस्तके तसेच आवश्यक स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षी एका विद्यार्थ्याला ५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खर्च देखील ३ हजार रुपये इतका खर्च दरमहा दिला जातो.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी –

योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी भारतातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.

पीएम यशस्वी ह्या योजनेअंतर्गत ओबीसी,ईबीसी डीएनटी ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

ह्या योजनेचा लाभ मोठ्या नामांकित शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील घेता येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा किमान आठवी तसेच दहावी उत्तीर्ण असायला हवा.

त्याला आठवी तसेच दहावी मध्ये किमान ६० टक्के असायला हवे.

अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २५०००० पेक्षा जास्त असु नये.

पीएम यशस्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला
  • आठवी तसेच दहावी इयतेचे शैक्षणिक प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button