सरकारी योजना

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० विषयी माहीती PM Mantri Vandana yojana 2.o information in Marathi

आपल्या देशातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या महिलांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कुठल्याही अवस्थेत असताना देखील मोलमजुरी करावी लागते. PM Mantri Vandana yojana

ज्या महिला गर्भवती असतात त्यांना गरोदरपणातील शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुती झाल्यानंतर शारीरिक क्षमता नसताना देखील स्वताचे पोट भरण्यासाठी मोलमजुरीचे काम करावे लागते.

त्यामुळे अशा गरोदर महिलांना अणि त्यांच्या पोटात असलेल्या बाळाला योग्य तो आहार गरोदरपणात प्राप्त होत नाही. त्याची योग्यरीत्या काळजी घेतली जात नाही म्हणून त्या नवजात बालकाच्या अणि मातेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना आपणास दिसून येतात.

आपल्या देशात मातेचा अणि तिच्या गर्भातील नवजात बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढत आहे.

प्रसुतीनंतर शारीरिक क्षमता नसताना देखील मातेला काम करावे लागते ज्यामुळे तिचे शरीर पुर्णपणे बरे होत नाही. पहिल्या सहा महिन्यांत लहान बाळाला फक्त स्तनपान देण्याच्या क्षमतेत देखील अडथळा निर्माण होताना दिसुन येतो.

मातेपर्यत सकस आहार न पोहोचल्याने मातेला व्यवस्थित स्तनपान करता येत नाही.

ह्याच करीता गर्भवती स्थनदा मातेचे तिच्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी अणि जन्माला येणारया नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे.

गर्भवती माता बालक यांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची सुरुवात केली आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

  1. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आता गरोदर महिलांना ११ हजार रुपये इतके आर्थिक मानधन देण्यात येणार आहे.
  2. यामध्ये महिलेला पहिले अपत्य मुलगा किंवा मुलगी यापैकी काहीही झाले तरी देखील पाच हजार रुपये तीन हजार अणि दोन हजार अशा दोन टप्प्यांत आपणास दिले जातात.
  3. तसेच दुसरयांदा जर आपणास मुलगी झाली तर आपल्याला मुलीच्या जन्मानंतर एकाच वेळी सहा हजार रुपये इतके मानधन ह्या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
  4. म्हणजेच एकुण अकरा हजार रुपये आपणास ह्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० योजनेअंतर्गत प्राप्त होणार आहे.
  5. ह्या योजनेचे पैसे आपल्या आधार संलग्न बॅक खात्यात तसेच आपल्या पोस्ट आॅफिस मधील खात्यात डीबीटी दवारे जमा केले जातील.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० ह्या योजनेसाठी आॅनलाईन अर्ज करायला सुरुवात देखील झाली आहे.

आजच्या लेखात आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० काय आहे?

प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही शासनाची गरोदर महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे.हया योजनेअंतर्गत गरोदर महिलांना अकरा हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मानधन देण्यात येते.

राज्य शासनाने अधिसुचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये गर्भधारणा नोंदणी किंवा अखेरच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत. किमान एक प्रसुतीपुर्व तपासणी केलेली असेल अशा महिलेला पहिल्या अपत्यासाठी पहिला हप्ता तीन हजार रुपये दिला जाईल.

मातृवंदना योजनेच्या दुसरया हप्त्यासाठी अटी –

  1. बालकाची जन्म नोंदणी झाल्यानंतर बालकास बीसीजी,ओपीव्हीझिरो,ओपीवी ३ मात्रा,पेन्टा व्हॅलेंट लसीच्या तीन मात्रा अथवा समतुल्य पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पुर्ण केले असेल तेव्हा दोन हजार रूपये इतका दुसरा हप्ता देण्यात येईल.
  2. अणि त्याच महिलेला दुसरे अपत्य मुलगी झाली तर मुलीच्या जन्मानंतर एकत्रितपणे सहा हजार रुपये इतके अनुदान त्या महिलेच्या बॅक संलग्न खात्यात किंवा पोस्ट आॅफिस मधील खात्यात डीबीटी दवारे जमा केले जाईल.

चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा.

योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

मातृवंदना योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत-

  1. माता अणि बालकाचे आरोग्य सुधारणे.
  2. जन्माला आलेल्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे.
  3. माता मृत्यू तसेच बालमृत्यू दरात घट घडवून आणने.
  4. नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणी प्रमाणात वाढ व्हावी हे देखील ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  5. जन्मलेल्या बालकास कुपोषित होण्यापासून वाचवणे हा देखील ह्या योजनेचा मुख्य हेतु आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

  1. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास काही महत्वाच्या अटी पुर्ण करणे आवश्यक आहे.
  2. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा महिला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
  3. अनुसुचित जाती जमातीच्या महिला देखील ह्या लाभासाठी पात्र असणार आहे.
  4. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग महिला देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतात.
  5. बीपीएल शिधापत्रिका धारक महिला देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.
  6. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी महिला देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.
  7. ई श्रम कार्ड धारक महिला लाभार्थी तसेच किसान सम्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी,मनरेगा जाॅब कार्ड धारक महिला शेतकरी, गर्भवती तसेच स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्त्या देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

वरील नमुद केलेल्या किमान एका कागदपत्रासोबत खालील कागदपत्रे तपशील देणे महिलांसाठी आवश्यक आहे.

  • लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स किंवा आधार नोंदणी कागदपत्रे त्यासोबत विहित केलेली कागदपत्रे
  • परिपूर्ण भरलेले माता अणि बालसंरक्षण कार्ड ज्यात शेवटच्या मासिक पाळीची तारीख,गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपुर्व तपासणीच्या नोंदी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थींच्या बॅक पासबुकची झेरॉक्स
  • बाळाच्या जन्मनोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स
  • माता अणि बालसंरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची झेरॉक्स
  • गरोदरपणाची नोंदणी केलेला आरसीएच पोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक
  • लाभार्थीचा स्वताचा किंवा त्याच्या कुटु़ंबातील सभासदाचा मोबाईल क्रमांक
  • वेळोवेळी विहित केलेली अन्य कागदपत्रे

लाभार्थीकडे आधार कार्ड नसल्यास आधार नोंदणी कागदपत्रांसोबत खालील पैकी एक कुठल्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे-

  • बॅक किंवा पोस्ट आॅफिस फोटो पासबुक
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • किसान फोटो पासबुक
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पॅनकार्ड
  • मनरेगा जाॅब कार्ड
  • सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेले तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?

  1. सर्व लाभार्थी ज्यांची मासिक पाळीची अखेरची तारीख एल एमपी मिशन शक्ती मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झाल्याच्या तारखेनंतर आहे त्यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या २० च्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार लाभ प्राप्त होणार आहे.
  2. एखाद्या महिलेने आधीच प्रधानमंत्री मातृवंदना योजना १.० अंतर्गत मातृत्व लाभाचा पहिला हप्ता प्राप्त केला असेल व प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० अंतर्गत मंजुर केलेल्या निकषांनुसार रोख प्रोत्साहन मिळवण्यासाठी पात्र असेल.
  3. जर त्या महिलेला प्रधानमंत्री मातृवंदना योजना १.० अंतर्गत पहिला अणि दुसरा हप्ता मिळाला असेल तर त्या महिलेला प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० अंतर्गत मार्गदर्शक तत्वानुसार उर्वरित लाभ प्राप्त होऊ शकतात.

मातृवंदना योजनेसाठी लाभ देण्याची कालमर्यादा काय ठेवण्यात आली आहे?

  1. पहिल्या अपत्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून पुर्वी असणारा ७३५ दिवसांचा कालावधी कमी करून तो ५१० दिवसांवर आणण्यात आला आहे.
  2. तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून २१० दिवसांपर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे हा लाभ दिला जाईल.
  3. सर्व लाभार्थ्यांनी विहित कालावधीत लाभ घेण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे कालावधी निघून गेल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  4. लाभार्थींनी हस्तलिखित फाॅम जमा केलेला असेल पण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या नवीन संगणक प्रणाली दवारे कोणत्याही कारणाने आॅनलाईन पदधतीने अर्ज स्वीकारले जात नसल्यास अशा लाभार्थीना लाभ देय नसेल.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे वय किती असणे आवश्यक आहे?

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० चा लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे वय किमान १८ वर्षे ते कमाल ५५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

येथे भरा अर्ज

पीएम मातृ वंदना योजना: अब दो किस्तों में मिलेंगे पांच हजार रुपये, पिता के  आधार कार्ड की अनिवार्यता समाप्त - Pradhan Mantri Matru Vandana Yojana: Rs  Five Thousand Will ...

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० इतर महत्त्वाच्या बाबी-

एखाद्या लाभार्थी महिलेला तिच्या दुसऱ्या बाळंतपणात एकापेक्षा जास्त अपत्य झाली अणि त्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक मुली असतील चार तिळे जुळे असतील तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० नियमानुसार दुसरे अपत्य मुलगी असल्याचा लाभ मिळणार आहे.

लाभार्थींने विहित कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button