सरकारी योजना

एल आयसी जीवनधारा २ विषयी माहिती LIC Jeevan labh Dhara 2 policy information in Marathi

२२ जानेवारी २०२४ रोजी म्हणजेच राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी एल आयसीने भारतातील नागरिकांसाठी आपला एक नवीन प्लॅन लाॅच केला आहे. मागील आर्थिक वर्षात एल आयसीने आपले वेगवेगळे प्लॅन लाॅच केले होते अणि त्यांची भरपूर प्रमाणात विक्री देखील होताना आपणास पाहावयास मिळाले. आता २०२४ मध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या शुभ दिनी एल आयसीने आपला एक नवीन प्लॅन लाॅच केला आहे. हया नवीन प्लॅनचे नाव एल आयसी जीवनधारा २ LIC Jeevan labh असे आहे.

एल आयसीच्या जीवनधारा ह्या नवीन प्लॅनचा क्रमांक ८७२ असा आहे.याआधी देखील एल आयसीने आपल्या एल आयसी जीवनधारा ह्या पाॅलिसीला लाॅच केले आहे आता ही एल आयसीची जीवनधारा पाॅलिसी २ आहे.

एल आयसी जीवनधारा २ काय आहे ?

हा एक गॅरेंटेड पेंशन प्लॅन आहे. एल आयसीच्या ह्या नवीन प्लॅन मध्ये आपणास आयुष्यभर गॅरेंटेड इन्कम उपलब्ध करून देण्यात येते.

ज्यांना आपल्यासाठी अणि आपल्या कुटुंबासाठी गॅरेंटेड पेंशन हवी आहे ते व्यक्ती एल आयसीचा हा प्लॅन खरेदी करू शकतात.

एल आयसीचा हा प्लॅन आपण सिंगल प्रिमियमच्या माध्यमातून देखील खरेदी करू शकतो.

पाॅलिसी मध्ये आपणास पेंशन घेण्यासाठी एकुण अकरा पर्याय देण्यात आले आहेत.

यात रेग्युलर प्रिमियम मध्ये आपणास एकुण ९ पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हया ९ पर्यायांना देखील २ वर्गात विभाजित करण्यात आले आहे.

ज्यात आपणास सिंगल लाईफ पेंशन मध्ये सात पर्याय उपलब्ध आहेत यात आपल्याला सिंगल लाईफ सोबत जाॅईण्ट लाईफ पेंशन देखील निवडता येईल.

म्हणजे यात आपल्या मृत्यूनंतर आपल्या जोडीदाराला देखील पेंशन प्राप्त होणार आहे.

चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा.

एल आयसी जीवनधारा २ प्लॅनचे वैशिष्ट्य काय आहे LIC Jeevan labh ?

ह्या मध्ये आपणास रेग्युलर प्रिमियम पेमेंट आॅप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याचसोबत इथे आपणास सिंगल प्रिमियम पेमेंटचे आॅप्शन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

म्हणजे हा प्लॅन खरेदी करण्यासाठी आपण हप्त्यांमध्ये पेमेंट करू शकतो किंवा एकाचवेळी सर्व पेमेंट भरून देखील ह्या प्लॅन खरेदी करू शकतो.

ज्यांना एकाचवेळी प्रिमियमचे पैसे भरायचे असतील ते single premium payment option निवडु शकतात

अणि ज्यांना टप्याटप्याने हप्त्याच्या स्वरूपात पैसे भरायचे आहे ते regular premium payment option निवडु शकतात.

एल आयसी जीवनधारा मध्ये रेग्युलर प्रिमियम करीता स्थगिती कालावधी ५ वर्षे ते १५ वर्षे इतका आहे.

अणि सिंगल प्रिमियम करीता स्थगिती कालावधी १ वर्ष ते १५ वर्ष इतका असेल.

हा प्लॅन खरेदी करण्यासाठी आपले वय किमान २० असणे आवश्यक आहे.

ह्या प्लॅन मध्ये पेंशन धारकाला त्याची पेंशन वार्षिक, सहामाही अर्धवार्षिक,मासिक,तिमाही अशा चार पदधतीने प्राप्त करता येईल.

पण किमान पेंशन रक्कम महिन्याला हजार रुपये,तिमाही सहा हजार, सहामाही ६ हजार अणि वार्षिक बारा हजार रुपये असणे आवश्यक आहे.

यात विमा धारकाला पाॅलिसीवर कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.यात पाॅलिसी कुठल्याही क्षणी सरेंडर देखील करता येते.

डेथ क्लेम मध्ये विमाधारक आपल्या वारसदाराला क्लेम रक्कम लंपसम तसेच इंस्टॉलमेंट मध्ये प्राप्त करून देऊ शकतो.

फायदे कोणकोणते आहेत?

एल आयसीच्या जीवन अक्षय,जीवन शक्ती,एल आयसी सरळ पेंशन प्लॅन इत्यादी मध्ये आपणास फक्त सिंगल प्रिमियम पेमेंटचे आॅप्शन देण्यात येते.

पण एल आयसीच्या ह्या जीवनधारा २ मध्ये आपणास सिंगल सोबत रेग्युलर प्रिमियम पेमेंट पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एल आयसी जीवनधारा २ मध्ये आपणास गॅरेंटेड पेंशन दिली जाते.

ह्या मध्ये आपल्याला deferment period option देण्यात आला आहे.म्हणजे ज्यांची इच्छा आहे की त्यांचे पेंशन काही वर्षांच्या कालावधीनंतर सुरू व्हावे त्यांच्यासाठी स्थगिती कालावधी पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इथे आपणास पाच ते सहा वर्षांचा स्थगिती पर्याय देखील निवडता येईल.

एल आयसीच्या जीवनधारा २ मध्ये आपल्याला सिंगल लाईफ पेंशन सोबत जाॅईण्ट लाईफ पेंशन देखील घेता येते.

ज्यांची इच्छा आहे की जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांना पेंशन प्राप्त व्हावी याचसोबत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदाराला देखील पेंशन प्राप्त व्हावी असे व्यक्ती जाॅईण्ट लाईफ पेंशन निवडु शकतात.

एलायसीचा जीवनधारा प्लॅन खरेदी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यातील काही पर्यायांची निवड करून पाॅलिसी खरेदी करू शकतात.

एल आयसी जीवनधारा २ प्लॅन खरेदी कसा करायचा?

प्लॅन खरेदी करण्यासाठी आपण आपल्या शहरातील एल आयसी एजंटशी संपर्क साधू शकतात किंवा licindia.in ह्या वेबसाईटवर जाऊन आॅनलाईन देखील हा प्लॅन खरेदी करू शकतात.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button