सरकारी योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना विषयी माहिती Majhi kanya Bhagyashri Yojana Information in Marathi

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील सर्व नागरीकांच्या हितासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना तसेच सेवा राबवल्या जात असतात. आता ह्याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींकरीता राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना Majhi kanya Bhagyashri Yojana ही सुरू केली आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुलींसाठी राबविण्यात आलेली महत्वाची योजना आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या शिक्षणात अणि आरोग्यात सुधारणा केली जाणार आहे.तसेच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था देखील केली जाणार आहे.

ह्या योजनेमुळे समाजात मुलींच्या जन्माविषयी असलेले नकारात्मक विचार दुर होतील अणि समाजात मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजनेत समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी नियम माझी कन्या भाग्यश्री योनजेस देखील लागु होतील.

सुकन्या योजनेत समाविष्ट असलेल्या मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेत देखील समाविष्ट करण्यात आले आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना माता पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.हया योजनेसाठी अर्ज करत असताना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

१ ऑगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

ज्या मातेला एक किंवा दोन कन्या अपत्य आहे तिला ह्या योजनेचा लाभ प्राप्त होईल. पण मातेला तिसरे अपत्य असल्यास ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी सुरू केली आहे म्हणून लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

बालगृहातील मुलींना देखील ह्या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले उत्पन्न १ लाख ते ७.५ लाख असणे किंवा ७.५ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

माता पिता यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली असावी.

योजनेअंतर्गत मातेला दुसरया प्रसुतीच्या वेळी जुळे मुली झाल्या तर त्या ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अठरा वर्षांनी प्राप्त होत असलेली डिपाॅझिट केलेली मुळ रक्कम

अणि त्यावर प्राप्त होत असलेली व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे अठरा वय पुर्ण असणे आवश्यक आहे.

याचसोबत मुलगी किमान दहावी उत्तीर्ण असावी अणि तिचा विवाह झालेला नसावा.

माझी कन्या भाग्यश्री योजना दारिद्र्य रेषेखालील बीपीएल अणि दारिद्र्य रेषेवरील एपीएल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लागु केली जाईल.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

ज्या कुटुंबाने एखाद्या अनाथ मुलीला दत्तक घेतले आहे त्या मुलीला त्या कुटुंबातील प्रथम मुलगी मानुन ह्या योजनेच्या लाभ दिला जाणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभाचे स्वरूप कसे असणार आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एक कन्या असल्यास ५० हजार रुपये दिले जातील तसेच दोन कन्या असल्यास २५ हजार रुपये दिले जातील.

कन्या सहा वर्षांची किंवा बारा वर्षांची झाल्यानंतर ठेवी रकक्मेवरील व्याज दिले जाईल मुलीचे वय अठरा पुर्ण झाल्यावर मुद्दल व व्याज दिले जाईल.

मुलीचे वय अठरा पुर्ण झाल्यावर विम्याची एक लाख रुपये इतकी रक्कम बॅक खात्यात जमा केली जाईल.

एक कन्या अपत्य असलेल्या कुटुंबातील भाग्यश्रीच्या आजी आजोबांना सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे.

लाभार्थीं मुलगी अणि तिची आई यांचे संयुक्त बचत खाते राष्ट्रीय कृत बॅकेत उघडुन दोघांना एक लाख अपघाती विमा अणि पाच हजार ओव्हर ड्राफ्ट ठेवणे आवश्यक आहे.

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेविषयी माहीती Mahila Bachat Gat Drone Subsidy Yojana information in Marathi

माझी कन्या भाग्यश्री योजनेत प्राप्त होणारी रक्कम –

योजनेचा पहिला प्रकार –

 1. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पहिल्या प्रकारात माता पित्याने एक मुलगी झाल्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर त्या कुटुंबाला शासनाकडुन दिली जाणारी अनुज्ञानाची रक्कम ५० हजार रुपये राष्ट्रीयकृत बॅकेत मुदत ठेव योजनेत गुंतवली जाते.
 2. यानंतर बॅकेत कन्येच्या नावावर मुदत ठेवीत गुंतवलेल्या ५० हजार रुपये रक्कमेवर सहा वर्षांत देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येणार आहे.
 3. यानंतर पुन्हा मुद्दल ५० हजार रुपये मुदत ठेवीत गुंतवणुक केल्यावर सहा वर्षांसाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला दिले जाणार आहे.
 4. यानंतर पुन्हा मुद्दल ५० हजार रुपये मुदत ठेवीत गुंतवणुक केल्यावर सहा वर्षांसाठी देय असलेले व्याज प्लस मुदत ठेव दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येणार आहे.
 5. कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर ज्या माता पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.
 6. तसेच शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केले असेल त्यांना ५० हजार रुपये इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येणार आहे.
 7. अशा पद्धतीने बॅकेमध्ये मुदत ठेवीत जमा केलेल्या रक्कमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असणारी व्याजाची रक्कम मुलीला प्राप्त होईल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा दुसरा प्रकार –

 1. योजनेच्या दुसरया प्रकारात परिवारात जर दोन मुलींनंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर शासनाकडून देय असलेली अनुज्ञानाची रक्कम पहिल्या अणि दुसरया मुलीच्या नावाने प्रत्येकी २५ हजार रुपये म्हणजेच दोन्ही मुली मिळुन ५० हजार रुपये इतकी रक्कम दोन्ही मुलींच्या नावाने बॅकेत मुदत ठेव योजनेत गुंतवली जाते.
 2. यानंतर बॅकेत मुलीच्या नावावर मूदत ठेवीत गुंतवणुक केलेल्या २५ हजार रुपये इतक्या रक्कमेवर सहा वर्षांत देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येते.
 3. पुन्हा २५ हजार रुपये मुदत ठेवीत गुंतवणुक केल्यावर सहा वर्षांसाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येते.
 4. पुन्हा २५ हजार रुपये मुदत ठेवीत गुंतवणुक करून सहा वर्षांसाठी देय असलेले व्याज प्लस मुददल दोन्ही रक्कम मुलीला वयाच्या अठराव्या वर्षी दिली जाते.
 5. परिवारात मुलीचा जन्म झाल्यानंतर तसेच कुटुंबाने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर तसेच परिवार नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर २५ हजार रुपये इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा केली जाते.
 6. अशा पद्धतीने बॅकेमध्ये मुदत ठेवीत जमा केलेल्या रक्कमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला दिली जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत?

 • एक किंवा दोन कन्या अपत्य असल्यास शस्त्रक्रिया केल्याचा पुरावा लागेल.
 • बीपीएल तसेच एपीएल श्रेणी रेशन कार्ड झेरॉक्स
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • मुलीचे अणि आईचे बॅक खाते पासबुक झेराॅक्स
 • अपत्याचा जन्म दाखला/मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
 • मुलींच्या पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र
 • दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले सर्टिफिकेट
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 •  मोबाईल नंबर
 • दोन पासपोर्ट साईज फोटो

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

 1. माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे मुलींच्या जन्माच्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल.
 2. समाजात असलेला मुलगा आणि मुलगी हा भेदभाव तसेच नकारात्मक भावना दुर होईल.
 3. जन्मलेल्या मुलींना चांगले शिक्षण प्राप्त होईल.तिच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत कुठलीही हेळसांड होणार नाही.

तरूणांच्या भावनांशी खेळणाऱ्या कंपन्या

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

 1. माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी करावयाचा अर्ज आपल्याला आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागात दिला जाईल.
 2. हा फाॅर्म आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
 3. फाॅममध्ये आपण अर्जदाराचे पुर्ण नाव टाकायचे आहे त्याचे मुलीशी असलेले नाते लिहायचे आहे.
 4. यानंतर आपला सध्याचा पत्ता द्यायचा आहे.मुलीच्या आईचे पुर्ण नाव टाकायचे आहे.
 5. फाॅममध्ये विचारलेली लाभार्थी मुलीची सर्व माहिती भरायची आहे.अणि भरलेला अर्ज महिला व बालविकास विभागात जाऊन सबमिट करायचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button