सरकारी योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेविषयी माहिती

आपल्या देशातील सरकार येथील नागरिकांच्या भल्यासाठी नेहमी नवनवीन उपक्रम योजना राबवित असते. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन ही योजना महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक साहाय्य प्राप्त करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन प्रदान केले जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन ही योजना सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असते.

ही योजना महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना पेंशन प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.

वेतन योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

ह्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत ज्यांच्या नावाची नोंद आहे असे अपंग व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ज्या लाभार्थींचे वय अठरा ते ७९ ह्या वयोगटादरम्यान आहे अशा ८० टक्के पेक्षा अधिक अपंग असलेल्या एका पेक्षा जास्त अपंग असलेल्या तसेच बहुअपंगत्व असलेल्या व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे.

एल आयसी जीवनधारा २ विषयी माहिती LIC Jeevan labh Dhara 2 policy information in Marathi

लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे पुढील काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे-

  • योजनेचा भरलेला लिहित नमुन्यातील अर्ज
  • अर्जदाराचा अपंगत्वाचा दाखला
  • दारिद्य्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • वोटर आयडी कार्ड
  • बॅक खाते पासबुक झेराॅक्स
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • रेशनकार्ड
  • उत्पन्न दाखला

लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात संबंधित विभागात जिथे ही योजना राबविण्यात येत आहे तिथे जावे लागेल.

तिथुन संबंधित अधिकारींकडुन योजनेचा फाॅम घ्यावा लागेल अणि मग योजनेचा फाॅम भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तिथे जमा करावा लागेल.

अर्ज मंजूर झाल्यावर मिळणारा लाभ –

योजनेअंतर्गत अर्जदाराचा अर्ज मंजूर झाल्यावर अर्जदार लाभार्थींला दरमहा १५०० रुपये इतके दरमहा पेंशन प्राप्त होते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

वय अठरा ते ६९ दरम्यान असायला हवे.

अर्जदार किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवा.

कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे.

अर्जदार ८० टक्के पेक्षा अधिक अपंग किंवा बहुअपंग असायला हवा.

अर्जदाराजवळ तो अपंग असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र असायला हवे.

योजनेचा लाभार्थीं सरकारच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसावा.

वेतन योजनेचा मुख्य उद्देश

महाराष्ट्र राज्यातील सर्व अपंग व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन प्राप्त करून देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दिव्यांग अपंग व्यक्तींना आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक गरजा पुर्ण करता याव्यात आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागु नये यासाठी शासनाने ही इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे.

वेतन योजनेचे फायदे-

ह्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होईल.त्यांच्या जीवनमानात देखील सुधारणा घडुन येईल.

अपंग व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे वैशिष्ट्य –

ही योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागु होते म्हणजे कोणत्याही जातीतील अपंग व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button