सरकारी योजना

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेविषयी माहीती Mahila Bachat Gat Drone Subsidy Yojana information in Marathi

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या वतीने महिला बचतगट ड्रोन सबसिडी पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मान्यता प्राप्त झाली आहे. याचकरीता २०२४-२०२५ ते २०२५-२०२६ ह्या कालावधीसाठी १२६१ रूपये इतका निधी देखील मंजुर करण्यात आला आहे.

आजच्या लेखात आपण महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजना काय आहे?

  1. महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेअंतर्गत महिलांना फ्री मध्ये ड्रोन तसेच ड्रोन कॅमेरा प्राप्त होणार आहे.
  2. महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेअंतर्गत ड्रोन खरेदी करण्यासाठी आठ लाखापर्यंतचे अनुदान शासन बचत गटातील महिलांना उपलब्ध करून देणार आहे.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे,?

  1. २०२३-२०२४ ते २०२५-२०२६ ह्या कालावधीत शेतकरयांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी १५ हजार निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  2. म्हणजे ज्यांचा महिला बचत गट आहे अशा स्त्रियांना ह्या योजनेअंतर्गत हा ड्रोन प्राप्त होणार आहे.
  3. अणि महिला बचत गट असलेल्या स्त्रिया शेतकरयांना शेतीसाठी भाड्याने हा ड्रोन वापरण्यासाठी उपलब्ध करून देतील.यातुन जे काही उत्पन्न निघेल ते महिला बचत गटांना प्राप्त होणार आहे.
  4. ही योजना महिला बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे.

महिला बचत गट ड्रोन योजना कोणी सुरू केली आहे?

  1. महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजना महाराष्ट्र सरकारने २०२३ मध्ये सुरू केलेली योजना आहे.

लाभ कोणाला मिळणार आहे?

  1. महिला बचत गट ड्रोन योजनेचा लाभ सर्व महिला स्वयंसहाय्यता गटांना होणार आहे.

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?

  1. महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजना कृषी अणि शेतकरी कल्याण विभाग,ग्रामीण विकास विभाग,खते विभाग, महिला स्वयंसहाय्यता गट,प्रमुख खत कंपन्या यांची खते.
  2. आणि प्रयत्नांची सांगड घालून चालणा देणारी योजना आहे.
  3. ह्या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर शोधून काढले जाईल अणि वेगवेगळ्या राज्यातील अशा क्लस्टर मधील प्रगतशील पंधरा हजार महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडण्यात येणार आहे.
  4. ड्रोनच्या किंमतीच्या ८० टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक साहाय्य अणि इतर साधने अनुषांगिक शुल्क इत्यादींसाठी म्हणजे दहा लाखाचे ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त आठ लाख रुपये इतकी रक्कम महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिली जाईल.
  5. यासाठी एआय एफ कर्जावर तीन टक्के दराने व्याजाची सवलत देखील पुरविण्यात येणार आहे.अनुदानाच्या माध्यमातून ड्रोन वरील तीन टक्के इतके व्याज केंद्र सरकार स्वता भरणार आहे.
  6. त्यामुळे कृषी पायाभुत सुविधेअंतर्गत ‌बॅकेकडुन कमी व्याजदरात कर्ज घेण्याची परवानगी महिला बचत गटांना आता सरकार देणार आहे.
  7. ह्या ड्रोनदवारे फवारणीच नव्हे तर इतर कामे देखील केली जाणार आहेत.
  8. किटकनाशकांची फवारणी करणे बियाणे पेरणे पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे यासाठी हा ड्रोन खुप प्रभावी यंत्र ठरणार आहे.
  9. अहर्ताप्राप्त १८ अणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिला बचत गटातील एका सभासदाची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान,अणि एल एफसी द्वारे पंधरा दिवसांच्या ट्रेनिंगसाठी केली जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विषयी माहिती Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Information in Marathi

पाच दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण

Subsidy on Drone: खुशखबरी! किसानों को इस योजना मे मिलेगी 10 लाख रुपए की  सब्सिडी,फटाफट करें आवेदन
  1. त्यात पाच दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण अणि अतिरिक्त किटकनाशक फवारणीच्या दहा दिवस इतक्या कालावधीचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
  2. स्वयंसहाय्यता गटातील इतर सभासद ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तुंची दुरूस्ती, फिटिंग तसेच इतर यांत्रिक कामे करण्याची ईच्छा आहे.त्यांची निवड ग्रामीण राज्य उपजिविका विभागाच्या तसेच एल एफसीच्या वतीने केली जाणार आहे.
  3. त्यांना ड्रोन तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठयासोबत पॅकेज म्हणून देण्यात येणार आहे.
  4. ड्रोन कंपनीकडून ड्रोनची खरेदी करण्यात त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात बचत गटांना येत असलेल्या समस्या लक्षात घेऊन ड्रोन पुरवठादार कंपन्या.
  5. अणि बचतगट यांच्यातील मदतनीस तसेच मध्यस्थी म्हणून एल एफसी द्वारे काम केले जाईल.
  6. स्वयंसहाय्यता गट शेतकरयांना नॅनो खतासाठी अणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देणार आहेत.
  7. महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेअंतर्गत मंजुर केलेल्या उपक्रमामुळे जवळपास पंधरा हजार बचत गटांना शाश्वत व्यवसाय प्राप्त होईल.
  8. अणि उपजिवीकेची सोय होऊन आर्थिक आधार प्राप्त होणार आहे.
  9. ह्या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना वर्षाला एक लाखापर्यंतचे उपन्न प्राप्त करता येईल.

Electric Tractor : सोनालिकाचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च, शेतीच्या खर्चात 80 टक्के बचत, 10 वर्षे चालणार बॅटरी, जाणून घ्या त्याची किंमत.

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेचे फायदे –

  1. महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेमुळे कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर होईल.
  2. पीक उत्पादन वाढेल शेतीच्या कामांचा खर्च देखील कमी होण्यास मदत होईल.
  3. ड्रोनमुळे शेतकरयांचे काम अधिक सोपे होणार आहे.याआधी एक एकर वर फवारणी करायला शेतकरयांना २ तास लागायचे.
  4. पण आता ड्रोनच्या साहाय्याने अवघ्या सात मिनिटात हे काम शेतकरी करू शकतील.
  5. अणि याने पिकाचे नुकसान देखील कमी होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button