सरकारी योजना

अनुभव पुरस्कार योजना २०२४ विषयी माहिती Anubhav Puraskar Scheme information in Marathi

आपल्या देशातील सरकार येथील नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवित असते. आज आपण शासनाने देशातील सेवानिवृत्त कर्मचारींसाठी सुरू केलेल्या एका महत्वाच्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.ह्या योजनेचे नाव अनुभव पुरस्कार योजना असे आहे.

आजच्या लेखात आपण अनुभव पुरस्कार ह्या केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारींसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अनुभव पुरस्कार योजना काय आहे?

ही केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पेंशनधारक यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली एक विशेष योजना आहे.

ह्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पेंशनधारक यांना केंद्र सरकारसोबत काम करत असताना आलेले आपले वैयक्तिक अनुभव इतरांसोबत शेअर करू शकणार आहेत.

चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा.

अनुभव पोर्टल काय आहे?

जे कर्मचारी केंद्र सरकार अंतर्गत काम करताना निवृत्त होत आहेत किंवा केंद्र सरकारसोबत काम करून सेवानिवृत्त झाले आहेत.

अशा केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारींना केंद्र सरकारसोबत काम करत असताना प्राप्त झालेले आपले वैयक्तिक अनुभव इतरांसोबत देखील सामायिक करता यावे यासाठी मार्च २०१५ मध्ये अनुभव नावाचे एक आॅनलाईन पोर्टल लाॅच करण्यात आले होते.

हे आॅनलाईन पोर्टल डिओपीपी डबलयु म्हणजे पेंशनर अणि पेनशनर्स कल्याण विभागाकडुन सुरु करण्यात आले होते.

पुरस्कार योजनेचे फायदे तसेच वैशिष्ट्य कोणकोणते आहेत?

केंद्र सरकारच्या निवृत वेतन धारकांनी ह्या आॅनलाईन पोर्टलवरून आपले कामातील वैयक्तिक अनुभव इतरांसोबत शेअर केल्याने देशात सुशासन निर्माण होण्यास मदत होईल.

सेवानिवृत्त वेतनधारकांनी काम करत असताना आपल्याला आलेले आपले वैयक्तिक अनुभव इतरांसोबत शेअर केल्याने देशात प्रशासकीय सुधारणांची पायाभरणी होण्यास मदत होईल.

ह्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पेंशनधारक यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

 सेवानिवृत्त कर्मचारी यांनी शासकीय सेवेत असताना आपल्या कार्यकाळात राष्ट्र उभारणीसाठी दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सम्मान केला जाणार आहे.

ही योजना, भारत देशातील सेवानिवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनी लिहिलेल्या कथांद्वारे भारताच्या प्रशासकीय इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे.

योजनेअंतर्गत दरवर्षी पाच पुरस्कार अणि दहा ज्युरी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत असतात.

ह्या योजनेमुळे अनुभवाचे भांडार निर्माण होईल तसेच ही योजना सुशासन तसेच प्रशासकीय सुधारणांचा पाया म्हणून काम करेल.

योजनेमुळे ज्ञानाची देवाणघेवाण होईल तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना इतरांसोबत आपले अनुभव शेअर करता येतील.

ह्या योजनेमुळे आपल्याला सरकारी यंत्रणेतील गायब झालेल्या नायकांचा ओळखुन त्यांचे मनोबल वाढवता येईल.

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ठेवण्यात आलेल्या अटी कोणकोणत्या आहेत?

ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पेंशनधारक यांना सेवानिवृत्त होण्याच्या आठ महिने आधीचा

अणि त्यांच्या निवृत्त झाल्यानंतरचा एक वर्ष इतक्या कालावधीचे अनुभव लेखन सादर करावे लागेल.

यानंतर आपण सादर केलेल्या अनुभव लेखनाचे संबंधित मंत्रालयाकडून तसेच विभागाकडून आपण सादर केलेल्या अनुभव लेखनाचे मुल्यांकन करण्यात येईल.

मग मुल्यांकन करून झाल्यावर हे लेखनाचे लेख प्रकाशित करण्यात येतील.

प्रकाशित करण्यात आलेल्या ह्या सर्व लेखांचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी तसेच परीक्षक प्रमाणपत्रांकरीता निवड करण्यात येईल.

पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ ठेवण्यात आली आहे.

म्हणजे केंद्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पेंशनधारक ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.

योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

आपल्या देशातील राष्ट्र उभारणीसाठी अनमोल योगदान दिलेल्या केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारींचे योगदान जाणुन घेणे त्यांनी सामायिक केलेले त्यांचे अनुभव स्वीकारून त्यांचा सम्मान करणे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button