सरकारी योजना

Indira Gandhi National Widow Pension Yojana इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना विषयी माहिती

केंद्र सरकारच्या अणि राज्य सरकारच्या सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने नेहमी नवनवीन योजनांची आखणी केली जात असते.अणि ह्या योजनांची अंमलबजावणी देखील केली जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन Widow Pension Yojana ही योजना देखील महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन ही सुद्धा एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.

ह्या योजनेचा Widow Pension Yojana मुख्य उद्देश काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना दरमहा पेंशन प्राप्त करून देण्यासाठी शासनाने ही इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे.

ह्या योजनेचा मुख्य हेतु महाराष्ट्र राज्यातील पतीच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती खालावलेल्या गरीब निराधार विधवा महिलांना दरमहा निवृत्तीवेतन प्राप्त करून देणे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांच्या यादीमध्ये नाव असलेल्या ४० ते ७९ ह्या वयोगटातील विधवा स्त्रिया पात्र ठरतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे –

  • विहित नमुन्यातील दिलेला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज
  • वयाचा दाखला(४० ते ७९ दरम्यानचा)
  • मृत पतीचा मृत्यू दाखला तसेच मोठ्या मुलाचा वयाचा दाखला
  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • वोटर आयडी कार्ड
  • बॅक खाते पासबुक झेराॅक्स
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

प्रधानमंत्री सुर्योदय योजना फ्री सोलर पैनल Pm Suryodaya Scheme Free Solar Panel

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी –

अर्जदार महिला पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.

अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे नाव दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांच्या यादीमध्ये असायला हवे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात योजनेच्या दिलेल्या संबंधित विभागात जावे लागते.

अणि संबंधित अधिकारी कडुन योजनेचा अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तिथे जमा करायचा असतो.

अर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थींला मिळणारी रक्कम –

लाभार्थीं महिलेला अर्ज मंजूर झाल्यावर दरमहिन्याला १५०० रुपये इतके निवृत्तीवेतन दिले जाते.याआधी ह्या योजनेअंतर्गत हजार रुपये इतका लाभ दिला जात होता.

पण नवीन शासन निर्णयानुसार आता ह्या लाभात पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

ही योजना सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना लागु होते.म्हणजे ही योजना कुठल्याही एका विशिष्ट प्रवर्गातील महिलांसाठी राबविण्यात येत नसुन सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा महिलांना आपला अणि आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा उदरनिर्वाह करता यावा त्यांच्या दैनंदिन जीवनातील खर्च भागविता यावा यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाते.

ह्या योजनेमुळे समाजातील विधवा महिलांना दरमहा निवृत्तीवेतन प्राप्त होते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन ह्या योजनेमुळे समाजातील विधवा महिलांना जीवन जगण्यासाठी आर्थिक पाठबळ प्राप्त होईल.

शासनाच्या ह्या योजनेमुळे विधवा महिलांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही तसेच कोणाकडे उसणे पैसे देखील मागावे लागत नाही.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button