सरकारी योजना

एल आय सी जीवन तरूण योजनेविषयी माहिती LIC Jeevan Tarun Scheme Information in Marathi

आजच्या ह्या महागाईच्या काळात सर्वसामान्य व्यक्तीला फायनान्शिअल प्लॅनिंग करणे खुपच अवघड होत चालले आहे.

आज आपल्याकडे उत्पन्न कितीही विपुल प्रमाणात असो पण दिवसेंदिवस वाढत्या खर्चामुळे पैशांची गुंतवणूक तसेच बचत आपणास करता येत नाही. ज्यामुळे आपणास आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणासाठी पाहीजे तेवढा पैसा खर्च करता येत नसतो. आजच्या लेखात आपण एल आयसीच्या एका अशा पाॅलिसी विषयी माहिती जाणून घेणार आहोत LIC Jeevan Tarun Scheme ज्यात गुंतवणुक करून पालकांना अधिक परतावा प्राप्त करता येईल तसेच आपल्या मुला मुलींचे भविष्य देखील सुरक्षित करता येईल.

एल आयसीच्या ह्या पाॅलिसीचे नाव आहे जीवन तरूण पाॅलिसी.

एल आयसी जीवन तरूण पाॅलिसी काय आहे ? LIC Jeevan Tarun Scheme ?

एल आयसीच्या जीवन तरूण ह्या पाॅलिसीचा टेबल नंबर ९३४ आहे.

एल आयसी जीवन तरूण ही आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणारी एक महत्वाची योजना आहे.हया योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. एल आयसीच्या ह्या जीवन तरूण योजनेमुळे पालकांना आपल्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उच्च शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी आर्थिक मदत प्राप्त होते.

जीवन तरूण पाॅलिसी अंतर्गत किती वयोगटातील मुलांचा विमा काढता येतो?

एल आयसीच्या जीवन तरूण ह्या पाॅलिसी अंतर्गत ९० दिवस ते १२ वर्षे ह्या वयोगटातील लहान मुलांचा विमा त्याच्या वडिलांना काढता येतो. एल आयसीची जीवन तरूण पाॅलिसी ही पालक फक्त आपल्या लहान मुलामुलींच्या नावावर घेऊ शकतात.अणि ह्या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेली रक्कम फक्त लाभार्थीं मुलाला देण्यात येईल.

जीवन तरूण पाॅलिसीचा मॅच्युरिटी कालावधी –

एल आयसीच्या जीवन तरूण ह्या पाॅलिसीचा मॅच्युरिटी कालावधी २५ वर्षे इतका आहे.म्हणजे ही पाॅलिसी २५ वर्षे झाल्यावर परिपक्व होत असते.

जीवन तरूण पाॅलिसीचे फायदे LIC Jeevan Tarun Scheme Benefits

एल आयसीच्या जीवन तरूण ह्या पाॅलिसी अंतर्गत आपल्याला ७५ हजार रुपये इतकी विम्याची रक्कम प्राप्त होते.

यात विम्याची रक्कम मिळण्यासाठी कुठलीही कमाल मर्यादा निर्धारित करण्यात आली नाहीये.पाॅलिसी खरेदी करत असलेल्या प्रपोजरच्या उत्पन्नावर हे अवलंबून असते की तो किती इन्शुरन्स कव्हर ह्या पाॅलिसी मध्ये घेऊ शकतो.

जीवन तरूण पाॅलिसी ही मुलाच्या भविष्यासाठी असते म्हणजे जसजसे मुलाचे शिक्षण होते तसतसे टप्याटप्याने आपल्याला ह्या पाॅलिसी मध्ये मनीबॅक दिला जातो.

एल आयसी जीवनधारा २ विषयी माहिती LIC Jeevan labh Dhara 2 policy information in Marathi

मनीबॅक करीता येथे चार पर्याय दिलेले आहेत.पहिल्या पर्यायात no survival benefit मध्येच कुठल्याही प्रकारचा सर्वाईव्हल बेनिफिट यात दिला जात नाही.

शंभर टक्के सर्वाईव्हल बेनिफिट हा पाॅलिसी मॅच्युरिटी झाल्यावर दिला जातो.

तसेच दुसरा पर्याय मध्ये जी काही विम्याची रक्कम आहे त्याच्यामधील १० टक्के रक्कम पुढील पाच वर्षांसाठी दिली जाते.

अणि तिसरया पर्यायात जी काही विम्याची रक्कम असेल त्यातील १५ टक्के रक्कम पुढील पाच वर्षे इतक्या कालावधीसाठी दिली जाते.

जीवन तरूण ह्या पाॅलिसी मध्ये पाॅलिसी धारकाला कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हणजे दोन वर्षांचा प्रिमियम भरल्यानंतर पाॅलिसीवर पाॅलिसी धारक कर्ज काढु शकतात.

किंवा घेतलेली पाॅलिसी दोन प्रिमियम भरल्यानंतर सरेंडर देखील करू शकतात.

जीवन तरूण ह्या पाॅलिसी मध्ये under section 80 सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट देखील दिला जातो.यात प्राप्त होत असलेली मॅच्युरिटी रक्कम देखील कर मुक्त असते.

जीवन तरूण पाॅलिसी विषयी जाणुन घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी –

एल आयसीच्या जीवन तरूण ह्या पाॅलिसी मध्ये फक्त मुलाचा इन्शुरन्स कव्हर केला जातो.वडील इथे फक्त मुलाच्या नावावर पाॅलिसी खरेदी करण्यासाठी प्रपोजर राहत असतात.अणि पाॅलिसी ही मुलाच्या नावाने खरेदी केली जात असते.

जीवन तरूण ह्या पाॅलिसी मध्ये प्रिमियम मुलाचे वडिल भरत असतात.

प्रपोजरसाठी किमान वयोमर्यादा १८ अणि कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत जसजसे मुलाचे शिक्षण होते तसतसे अधुन मधुन त्याला विम्याची रक्कमेचा मनीबॅक प्राप्त होत असतो.

मुलाला ज्या पद्धतीने मनीबॅक प्राप्त करायचा आहे पाॅलिसी खरेदी करताना प्रपोजरला त्या पद्धतीचा मनीबॅक पर्याय निवडावा लागेल. ह्या पाॅलिसी मध्ये मॅच्युरिटी सेटलमेंटचा पर्याय देखील देण्यात आला आहे म्हणजे ज्या पाॅलिसी धारकाला पाॅलिसी मॅच्युरिटी झाल्यावर पुर्ण पैसे एकाच वेळी नको आहे ते मॅच्युरिटी सेटलमेंटचा पर्याय निवडुन मॅच्युरिटी रक्कम हप्त्यांमध्ये प्राप्त करू शकतात. ह्या पाॅलिसी मध्ये डेथ बेनिफिट देखील देण्यात आला आहे

म्हणजे याने पाॅलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास पैसे एकाच वेळी न मिळता पाच,दहा पंधरा इत्यादी वर्षाच्या कालावधीत प्राप्त होतात.

जीवन तरूण पाॅलिसी मध्ये दररोज १५० रूपये इतकी गुंतवणुक केली तर आपल्याला वर्षाला ५४ हजार रुपये इतका प्रिमियम भरावा लागतो.

यात जमा करण्यात आलेल्या रक्कमेची गुंतवणुक आठ वर्षांच्या कालावधीत ४,३२००० होईल.यात आपणास कंपनीच्या वतीने २,४७००० पर्यंतचा बोनस दिला जातो.

गुंतवणक कालावधी नंतर लाॅयल्टी बोनस म्हणून आपल्याला ९७ हजार दिले जातात.

जीवन तरूण ह्या पाॅलिसी अंतर्गत पाॅलिसी धारकाला ८,४४,५५० रूपये मिळतात.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button