सरकारी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना विषयी माहिती

आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो कारण येथील अधिकतम लोक शेती हाच व्यवसाय करतात. महाराष्ट्र सरकार आपल्या देशातील शेतकरी बांधवांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत असते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अशीच एक योजना आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी.

  1. ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे.
  2. २७ आॅक्टोंबर २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
  3. शिर्डी येथील दौरयावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हस्ते अनेक मोठ्या विकासकामांचे उद्घाटन केले होते.यानंतरच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
  4. पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकरयांना दरवर्षी सहा हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य प्रदान केले जात होते.
  5. पण आता ह्या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरयांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे.
  6. ज्यामुळे आता शेतकरी बांधवांना जिथे चार महिन्याला दोन हजार रूपये भेटत होते तिथे आता त्यांना चार हजार रुपये इतकी आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.
  7. ह्यामुळे आता शेतकरी बांधवांना दरवर्षी बारा हजार रुपये इतकी रक्कम आपल्या खात्यावर प्राप्त होणार आहे.
  8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका क्लिकवर ८५ लाख साठ हजार इतक्या शेतकरयांच्या खात्यावर १७१२.०२ कोटी रूपये पाठवत ह्या योजनेचा शुभारंभ केला होता.
  9. सरकारच्या हया योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना लाभ प्राप्त होणार आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० विषयी माहीती PM Mantri Vandana yojana 2.o information in Marathi

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी ?

  1. नमो शेतकरी महासन्मान निधी ही राज्य सरकारने पीएम किसान सम्मान योजनेच्या धर्तीवर शेतकरींसाठी सुरू केलेली एक लाभदायक योजना आहे ज्याद्वारे दरवर्षी शेतकरी बांधवांना आपल्या खात्यात सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.
  2. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ह्या योजनेमुळे दरवर्षी शेतकरींना केंद्र अणि राज्य सरकार दोघांकडुन प्रत्येकी सहा हजार रुपये प्राप्त होणार आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

  1. पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ प्राप्त करता येईल.
  2. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ फक्त शेतकरी बांधवांना दिला जाईल.जे व्यक्ती शासकीय सेवेत आहेत किंवा सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  3. याचसोबत आयकर भरणारे डाॅक्टर, इंजिनिअर वकिल इत्यादींना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  4. पी एम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकरींनी ज्या बॅक खात्याचा तपशील दिला होता त्याच बॅक खात्याचा तपशील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांना द्यावा लागतो.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत?

  1. योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवा.
  2. जे शेतकरी महाराष्ट्र राज्यातील नाहीयेत त्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  3. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती शेतकरीच असणे आवश्यक आहे.
  4. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वताची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  5. अर्जदार शेतकरीचे बॅकेत खाते देखील असायला हवे.तसेच ते खाते त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  6. ज्यांची दोन हेक्टर पर्यंत जमीन आहे असे छोटे शेतकरी तसेच ज्यांची एक हेक्टर पर्यंत जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
  7. शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत ते सर्व शेतकरी बांधव ह्या योजनेसाठी पात्र ठरतात.

शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे पुढील महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे –

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा दाखला
  • उत्पन्न दाखला
  • जमिनीची कागदपत्रे सातबारा तसेच आठ अ उतारा
  • बॅक अकाऊंट डिटेल्स
  • रेशन कार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आॅनलाईन अणि आॅफलाईन ह्या दोघे पदधतीने अर्ज करू शकतो.

आॅफलाईन अर्ज कसा करायचा?

सगळ्यात पहिले आपल्याला जिल्हा कार्यालय मधील कृषी विभागात जावे लागते.तिथुन ह्या योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागतो.

अर्ज प्राप्त केल्यानंतर तो व्यवस्थित भरावा लागेल त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल.मग भरलेल्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तो अर्ज जिल्हा कृषी विभागात जमा करावा लागतो.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्याला अर्ज करायला योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईटवर सर्वप्रथम जावे लागते.

यानंतर आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल तिथे दिलेल्या नवीन अर्जदार नोंदणी ह्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपल्याला आपली विचारलेली सर्व वैयक्तीक माहिती भरावी लागते.

माहीती पुर्णपणे भरून झाल्यावर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे.

शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ किती शेतकरयांना होणार आहे?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना प्राप्त होणार असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते.

यासाठी सहा हजार ९९० कोटी रूपये इतक्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या गरजा पूर्ण करता याव्यात तसेच आपले जीवनमान सुधारता यावे म्हणून आर्थिक साहाय्य करणे हा आहे.

महासन्मान निधी योजनेचे फायदे तसेच वैशिष्ट्य कोणकोणते आहेत?

योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिला जातो.

योजनेमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबुत होतील अणि त्यांचे जीवन उज्वल होण्यास मदत होईल.शेतकरी स्वावलंबी अणि आत्मनिर्भर सक्षम होतील.

योजनेमध्ये दर तीन महिन्यांनी शेतकरींच्या बॅक अकाऊंट वर पैसे जमा केले जातात.

शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे तपासायचे ?

सर्वप्रथम आपणास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nsmny.mahait.org वर जावे लागते.

वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला बेनिफिशरी स्टेटस नावाचे एक option दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.

बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होते इथे आपल्याला आपला पीएम किसान योजनेशी जोडलेला मोबाईल नंबर इंटर करायचा आहे.अणि गेट डेटा ह्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर आपले नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे बेनिफिशरी स्टेटस ओपन होईल.

याचसोबत आपण नोंदणी क्रमांक टाकुन देखील आपले बेनिफिशरी स्टेटस जाणुन घेऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button