सरकारी योजना

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेविषयी माहीती

आवडेल तेथे कोठेही प्रवास ही एसटी महामंडळाने महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना ११०० रूपये मध्ये संपूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती करता येते.

म्हणजे महाराष्ट्र राज्यात बसने कोठेही प्रवास करता येतो.

योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एसटी बसने प्रवास करत असलेल्या नागरिकांना चार ते सात दिवस इतक्या कालावधीचा एक पास देण्यात येतो.

ही योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १९८८ पासुन एसटी बसने प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली होती.

हा पास पहिल्या दिवशीच्या रात्रीच्या बारा वाजेपासून शेवटच्या दिवशीच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत वैध असणार आहे.

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कमी पैसे खर्च करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फिरता यावे त्यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना धार्मिक स्थळांना भेट देता यावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कमीत कमी पैसे खर्च करून प्रवास करण्याचा लाभ प्राप्त करून देण्यासाठी तसेच एसटी बसने प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना प्रोत्साहित करणे हे देखील ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरीक असणार आहेत.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना प्रवासासाठी पास देऊन कमीत कमी पैशात एसटी बसने फिरण्याचा लाभ दिला जातो.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कमीत कमी पैसे खर्च करून महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना धार्मिक स्थळांना भेट देता येईल.

एसटी बसने फिरत असलेल्या नागरिकांना कमी पैसे खर्च करून संपूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती करता येईल.

योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील एसटी बसने प्रवास करत असलेल्या नागरीकांच्या पैशांची बचत होण्यास मदत होईल.

ह्या योजनेअंतर्गत दिला जाणारा एसटी बसचा पास घेऊन एसटी बसने प्रवास करत असलेल्या नागरिकांना महाराष्ट्र राज्यात जिथपर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जाईल तिथपर्यंत कमी पैशात एसटी बसने प्रवास करता येतो.

योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरीक कुठल्याही बसने कमी पैसे देऊन प्रवास करता येतो.

योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

ही योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्र राज्यातील एसटी बसने फिरत असलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत नागरिकांना एसटी बसने प्रवास करण्यासाठी देण्यात येणाऱे पासेस नियमित बस, जादा बसेस, यात्रेसाठी सोडण्यात येत असलेल्या बसेस मध्ये देखील ग्राह्य धरले जाणार आहेत.

दिले जाणारे पासेस दहा दिवस आधी इतक्या कालावधी पर्यंत देता येईल.

योजनेअंतर्गत एसटी बसने प्रवास करण्यासाठी आकारण्यात येत असलेले पासशुल्क –

साधी बस,साधी जलद बस, रात्रसेवा शहरी यशवंती बस आंतरराज्य बसने सात दिवसाचा पास घेऊन प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रौढ नागरिकांना २०४० रूपये लागतील तर तरूण मुलामुलींना १०२५ रूपये लागतील.

तसेच साधी बस, जलद बस,रात्रसेवा शहरी यशवंती आंतरराज्यीय बसने चार दिवसांचा पास घेऊन प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रौढ नागरिकांना ११७० रूपये लागतील तर मुला मुलींना ५८५ रूपये लागतील.

शिवशाही आसनी आंतरराज्य बसने एसटी बसने सात दिवसाचा पास घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रौढ नागरिकांना ३०३० रूपये लागतील तर तरूण मुलामुलींना १५२० रूपये लागतात. शिवशाही आसनी आंतरराज्य बसने एसटी बसने चार दिवसांचा पास घेऊन प्रवास करण्यासाठी

महाराष्ट्र राज्यातील प्रौढ नागरिकांना १५२० रूपये लागतील तर तरूण मुलामुलींना ७६५ रूपये लागतात.

वर दर्शविले गेलेले पासचे दर पाच वर्षांपेक्षा जास्त अणि बारा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी असतील.

सुधारीत पासेसचे दर ५/१/२०२२ पासुन लागु करण्यात आले आहेत.

योजनेचे नियम तसेच अटी कोणकोणत्या आहेत?

ज्या महाराष्ट्र राज्यातील नागरीक असलेल्या विशिष्ट व्यक्तींनी,

तसेच एसटी बस प्रवाशांनी योजनेअंतर्गत बसने प्रवास करण्यासाठी पास काढला आहे फक्त त्यांनाच ह्या योजनेअंतर्गत पासचा वापर करून प्रवास करता येणार आहे.

योजनेच्या पासची वैधता संपुष्टात आल्यानंतर देखील एखादा पासधारक प्रवासी

त्या पासचा वापर करून एसटी बसने प्रवास करताना आढळल्यास त्याच्याकडुन तिकिटाचे संपूर्ण दर घेतले जाईल.

समजा एखाद्या व्यक्तीने आपला पास हरविला तर त्याला दुसरा पास दिला जाणार नाही.

अणि हरवलेल्या पासावर कोणताही देखील देण्यात येणार नाही.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेविषयी माहिती

एखादा पासधारक त्याला देण्यात आलेल्या पासचा गैरवापर करतो आहे असे निदर्शनास आल्यास त्याच्याकडून पास जप्त करण्यात येईल.

ह्या योजनेअंतर्गत फक्त चार दिवस तसेच सात दिवस इतक्या कालावधीसाठी पास दिले जातील.

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पासदवारे प्रवाशी फक्त एसटी बसने प्रवास करू शकतात.

इतर कुठल्याही वाहनाने फिरण्यासाठी प्रवाशी ह्या पासचा वापर करू शकत नाही.

ह्या योजनेअंतर्गत पासधारक प्रौढ एसटी बस प्रवाशांना ३० किलो

अणि बारा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लहान मुलांना पंधरा किलो इतके प्रवासी सामान विना शुल्क आकारता घेऊन जाऊ शकतात.

योजनेअंतर्गत एसटी बसने फिरताना प्रवाशांची कुठलीही वस्तू गहाळ झाली तर त्यास एसटी महामंडळ जबाबदार नसेल.

एसटी बसेसचा संप आंदोलन इत्यादी मुळे वाहतूक बंद असल्याने पासधारक पासावर प्रवास करू शकले नाही तर प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा प्रवाशास दिला जाणार.

सदरची मुदतवाढ तसेच परतावा वाहतूकीस आरंभ झाल्यापासून पासधारकास तीन महिने पर्यंतच्या कालावधीत दिला जाईल.

योजनेअंतर्गत पास दिल्या जाणाऱ्या पासधारकांना बसमधील आसन देण्यासाठी कुठलीही हमी दिली जात नाही पण पासधारक आरक्षण भरून आपले आसन आरक्षित करू शकतील.

स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वरील सर्व सुचना लागु असणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • आधार कार्ड
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर जावे लागेल.

अणि सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेचा अर्ज भरायचा आहे अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून त्या अर्जाला

आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो जोडुन आवश्यक ती फी भरून तो अर्ज जमा करायचा आहे.

यानंतर आपल्याला बसचा पास दिला जाईल.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button